रस्ता आणि मी.

Submitted by ashokkabade67@g... on 23 April, 2021 - 08:53

आजही मी आणि मोती तेथेच आहोत,त्याच रस्त्यावर, नेहमीच माणूस आणि वहाने यांनी गजबजलेला रस्ता मात्र आज निर्मनुष्य आहे,बहुतेक लाँकडाउनचा परिणाम असावा किंवा मरणाच्या भितीन आणि रुग्णवाहिकेच्या सायरनच्या कर्कश आवाजाने तोही आमच्या सारखाच भयभीत झाला असावा.रस्त्याला खेटुनच असलेल्या महाबली हनुमानाच मंदिरही आता कुलुपबंद आहे ,बहुतेक म्रुत्युच तांडव बघायला लागु नये म्हणून त्यानेही स्वताला कुलुपात बंद करून घेतल असाव .जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात आताही धावपळ सुरुच होती .रुग्णवाहिकेच्या सतत फेऱ्या सुरुच होत्यारुग्णांची संख्या सारखी वाढतच होती,आणि शववाहिणी प्रेतांना स्मशानभूमीत ना तच होती .अंधार पडायला सुरवात झाली होती रसत्यावरचे लाईटही लागले होते पण त्यांचाही प्रकाश आज जाणवतच नव्हता ,नेहमी आनंद देणारा आणि भय पळवून लावणारा प्रकाशच जणूकाय भयभीत झाला होता.मंदिराबाहेरील दिवा लावण्याच खर तर माझ रोजचच किम पण मंदिर परिसरात अंधार पडला तरीही मी दिव
याचे बटण दाबलेच नाही ,जणूकिय आज मला अंधारच बरा वाटत होता ,मोतीही अस्वस्थ असावा ,त्यालाही हिलचाल करावीशी वाटत नसावे बहुतेक म्हणून मान दोन पायांवर ठेवून तोही डोळे बंद करुन बसला होता .आज अंधार आणि शांतता हवीहवीशी वाटत होती पण समोरच्या बेकरीतला मुलगा नेहमीप्रमाणे आपली वळकटी आणि पावाच्या लाद्या घेऊन मंदिरात पथारी पसरण्यासाठी आला ,आणि अंधार पाहुन क्षणभर चकीत झाला,आणि भयभितही .चाचा तबियत तो ठीक है ना?त्यान काळजीपोटी विचारल आणि बटन दाबून लाईट लावला नेहमीप्रमाणे मोतीपुढे लादीतिल पाव ठेवला, पण बहुतेख मोतीही अस्वस्थ असावा त्यान पावाकडे मान उचलुनही पाहिले नाही .बहुतेक मोतीच वागण आणि नेहमीच बडबडणारा पण आज मुका झालेल्या मला पाहुनतोही अस्वस्थ झाला तोच पुन्हा सायरनचा आवाज ऐकु आला पण ती रुग्णवाहिका मंदिरासमोरच बंद पडली आणि त्यातुन एक तरुण उतरला आणि बंद असलेल्या महाबली मारोती च्या मंदिराच्या दारासमोर नतमस्तक झाला .देवा तुच वाचवलस माझ्या बाळाला आणि त्याच्या आईला डाँक्टरांनी तर आशाच सोडली होती पण तुझ्या क्रुपेने रस्त्यातच तु तीची सुखरूप सुटका केलीस .मोतीसकट आम्ही कान टवकारुन ऐकत होतो ,आणि अँम्बुलन्समधील टेपरेकाँर्डवर गाण चालू होत वक्त का पहिया चलता है चलता आहे .क्षणात जादुची कांडी फिरावी आणि चमत्कार व्हावा तसा मी,मोती आणि बेकरीतला मुलगा उत्साहाने न्हाऊन नीघिलो आणि इतकावेळ दुर्लक्षित असलेल्या पावाच्या लाद्या फस्त झाल्यात .बहुतेक हेच जीवन असेल।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults