श्री राम

Submitted by चंदन सोनाये on 21 April, 2021 - 10:43

-----------
श्री राम
-----------

कौसल्येचा ज्येष्ठ पुत्र, त्रिलोकात श्रेष्ठ,
मर्यादा पुरुषोत्तम, राम रघुनंदन...

श्यामल वर्ण, मुखी मंद स्मित,
हाती धनुर्धर, शोभे रघुत्तम...

तेजस्वी गंभीर ध्यान, संयम झळके डोळ्यात,
बोलण्यात मार्दव, निर्मोही विचारात...

न्यायाचा मापदंड, हृदय करुणा सागर,
वचन शब्द-तीर, त्रिलोकात श्रेष्ठ नर...

दशरथाचा अभिमान, सीतेचा अतीव विश्वास,
प्रजेचा आदर्श नरेश, सद्गुणांचा निवास...

त्यागमुर्ती, पराक्रमी, निगर्वी, सत्यवचनी,
स्नेहरूपी, निर्धारी, शोभे राममूर्ती अवनी...

राम हृदयात, राम आचरणात,
राम जीवनात, राम रोम रोमात...

राम नाम ओठात, प्रसन्नता मनात,
गोडवा गाण्यात, श्रीराम स्तुती सुमनात...

पुण्य राम पूजनात, पुण्य राम जपण्यात,
मुक्ती देई रावणास, सामर्थ्य राम नामात...

@ चंदन सोनाये
२१ एप्रिल, २०२१

Group content visibility: 
Use group defaults