If you want your children to be intelligent, read them fairy tales. If you want them to be more intelligent, read them more fairy tales.
Albert Einstein
आपल्या घरच्यांना हे माहिती होतं की काय!once upon a time..पासून सुरुवात होऊन and they lived happily ever after किंवा आटपाटनगर ते त्यानंतर ते सुखाने नांदू लागलेपर्यंतचा प्रवास ह्या कथांमधून आपण ऐकला होता.लहानपणी आपण सगळ्यांनीच परीकथा ऐकल्या आहेत,म्हणजे ते ते त्या त्या वयात जवळजवळ अनिवार्यच होतं म्हणा ना!खूप परीकथा आठवल्या मग! रपुंझेल म्हणजे आपल्या मराठीतली सोनेरी केसांची राजकन्या, स्नो व्हाइट म्हणजे हिमगौरी आणि सात बुटके,बिनस्टॉक, रेड रायडिंगहूड आणि इतर अनेक..
त्यातलीच एक गोष्ट होती, राजकन्या आणि वाटाणा... princess and the pea.एका राजवाड्यात एक मुलगी भिजून येते आणि ती स्वतः एक राजकन्या आहे असं सांगते ,आता हे सिद्ध कसं करायचं असा प्रश्न राजघराण्याला पडतो.मग रात्री तिच्या शेवरीच्या गादीखाली (ही गादी शेवरीची बरं का! परीकथा सगळ्या घडणार युरोपात पण कापूस आपल्या शेवरीचा)तर तिच्या गादीखाली एक वाटाणा ठेवला जातो,ती बिचारी रात्रभर काहीतरी टोचतं आहे म्हणून तळमळते.राणीला अजून खात्री पटत नाही मग दुसऱ्या दिवशी दोन गाद्या, तरीही तेच,तिसऱ्या दिवशी तीन असं करत करत सात गाद्या,(काही ठिकाणी हीच गोष्ट वीस गाद्यांचीसुद्धा आहे) अगदी शेवटची पिसाचीदेखील होते(हे सगळं सांगणाऱ्याच्या कसबानुसार बदलत जातं)पण राजकन्येला वाटाणा टोचत राहतोच! मग सगळ्यांची खात्री पटते की ही खरोखरीची राजकन्या आहे!तिचं राजकन्यत्व(!)सिद्ध होतं आणि मग पुढे तिचं त्या राजपुत्राशी लग्न होतं आणि मग ते सुखानं नांदू लागतात.अशा अनेक परीकथा आपल्या आवडत्या होत्या आणि त्यातल्या राजकन्येसारखं होण्याचा प्रयत्न आपणही केला आहे म्हणजे अगदी प्रियांकासारखं हातावर dad's lil girl!असं गोंदवून घेतलं नाही,तरी आपण आपल्या वडिलांच्या 'आंखोंका नूर' होतोच होतो, लाडकी राजकन्या! आणि रपुंझेल व्हायचं पण केस लांब नाहीत तर पंचा गुंडाळून पार टाचेपर्यंत आणायचा प्रयत्न करायचा किंवा स्नो व्हाइट होण्यासाठी पावडर तोंडाला फासायची किंवा उन्हाळ्यात खूप पाहुणे आलेले असताना, किंवा लग्नघरी गाद्यांची थप्पी लागली असताना त्यावर महत्प्रयासाने चढून झोपून बघितलं पण कधी कुठला वाटाणा टोचला नाही पण म्हणून अर्थात आपण राजकन्या आहोत ह्यावरचा विश्वास तेंव्हा ढळला नाही.घरी पार दुसऱ्या मजल्यापर्यंत चढलेल्या वेलावरून एखादा राजपुत्र येईल असा विश्वास होताच की मनात!
असावाच तो मनात! एक मोहरलेपण झुलू द्यावं कायम आत!
हीच गोष्ट नंतर जेंव्हा मी लेकीला तिच्या लहानपणी सांगितली तेंव्हा अर्थातच काही छोटे बदल करुन सांगितली !ती त्यावेळी परीकथा आवडायच्या वयात होती त्यामुळे तिलाही ही गोष्ट फार आवडली.
आता आमची राजकन्या परीकथांमधून पुढे मिल्स अँड बून्समधल्या TDH म्हणजे tall,dark and handsome असा राजपुत्र खरा मानायच्या प्रक्रियेत आहे.
मी तर ही सगळी गोड स्टेशन्स कधीच मागे सोडली आहेत पण तरीही काही सिनेमे मला अजून त्या परीकथेच्या प्रदेशात नेतात. पण मोठेपणी आवडलेली एकमेव परीकथा म्हणजे रोमन हॉलिडे हा सिनेमा ! लग्नानंतर नवऱ्यानं मुद्दाम विडिओ कॅसेट आणून दाखवला होता.एक युरोपीय राजकन्या त्या सगळ्या राजशिष्टाचाराला आणि वातावरणाला कंटाळून पळून जाते पण तिच्या डॉक्टरांनी दिलेल्या तिला शांत करायच्या झोपेच्या औषधानं ती एका बागेत बाकावर झोपून जाते आणि एक अमेरिकन पत्रकार तिला घरी आणतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की ही ती राजकन्या आहे आणि मग तो ती cover story किंवा सनसनीखेज बातमी करायच्या मागे लागतो.तिच्या वेगवेगळ्या छबी टिपायला त्याच्या फोटोग्राफर मित्राला बोलावतो.ह्या सगळ्यामध्ये ती राजकन्या एक सामान्य आयुष्य एक दिवस जगते, केस मनासारखे कापते, आईस्क्रीम खाते, धडाकून स्कूटर चालवते, रोम फिरते आणि कोणालाही ही राजकन्या आहे हे समजत नाही! तो पत्रकार आणि ती ह्या अगदी छोट्या प्रवासात एकमेकांच्या प्रेमात पडतात. शेवटी ती कर्तव्याखातर आपल्या वाटेनी जाते पण दोघांच्या मनात आयुष्यभरासाठी प्रेम ठेवून ते दोघे अलग होतात आणि ती परीकथा एका अतीव भावुक वळणावर संपते.आपण एक आवंढा गिळतो,डोळे पुसतो तरी मनात एक मोहक भावना राहतेच..
ऑड्री हेपबर्न आणि ग्रेगरी पेक ह्यांच्या अभिनयाने नव्हे तर नैसर्गिक वावर यांनी फुलून आलेली ही परीकथा.ह्यातला mouth of truth हा प्रसंग म्हणजे बहार आहे आणि तो तिला राजवाड्याजवळ सोडून जातो तोही आणि त्यांची शेवटची भेट तिच्या चेहऱ्यावर अतीव दुःख आणि एक स्मितरेषा ह्याचं मिश्रण!खरेखुरे रोमँटिक..ती अगदी निरागस सुंदर,गोड स्वभावाची आणि तो मिश्किल,देखणा आणि सत्प्रवृत्त! They lived ever after पेक्षा they loved each other forever,साथ नसलो तरीही सदैव प्रेम करत राहू हे सांगणारी ही कथा!
आजकाल का नाही बनत असे गोड चित्रपट.मोठ्या माणसांसाठी परीकथाही हव्यात ना! ही परीकथा एका खरोखरीच्या आयुष्यावर बेतलेली होती असं म्हणतात.!वास्तवाला धरुन तरीही गोड आणि प्रेमळ.
नुकत्यात princess and the pea गोष्ट परत वाचली तेंव्हा त्यावर लोकांनी गंमतशीर टिप्पण्या केल्या होत्या अर्थातच ही सर्व माणसं परीकथेची वयं दूर दूर सोडून आलेली असणार नक्कीच. त्यांच्या टिप्पण्या ह्या बहुतेक राजकन्येच्या समस्येवर होत्या. तर राजकन्येला झोपेचा प्रॉब्लेम होता का, तिला restless leg syndrome होता की काय मग तिला काही त्यासंबंधी उपाय सुचवलेत,तिला fibromylgia होता का अशाही प्रकारच्या होत्या! असो!अशा नव्हे पण हे खरं की लेकीला गोष्ट सांगताना,आणि आता त्या गोष्टीबद्दल आठवताना माझ्याही मनात खूप वेगळे विचार आले .तिला अनेक कर्तबगार राजकन्या आणि राण्यांचे दाखलेही दिले,त्यांच्या सत्यकथाही पुढच्या ओघात सांगितल्या. नाजूक असणं ही बाईपणाच्या सौन्दर्याची परिसीमा आहे असं तिला वाटू नये, यासाठी फार खटपट करावी लागली मला.कारण माझं ते परीकथेचं वय निघून जाऊन मी वास्तवात जगत होते.आता विचार करताना माझ्या मनात आलं म्हणजे ही राजकन्या उठून खडखडून स्वच्छ गादी झटकू शकली नाही का, आपण त्या जागी असतो तर भराभर गादी उलटपालट करुन, वाटाणा शोधून पार झाडून काढला असता पण झोप मुळीच वाया घालवली नसती हे नक्की आणि एवढ्याश्या वाटाण्यापायी तर नाहीच नाही आणि सात दिवस आपण केवळ राजकन्या आहोत हे सिद्ध करण्यासाठीची ही धडपड आपल्या आकलनापलीकडेच आहे. पण आपण पडलो सामान्य त्यामुळे हे सगळं केलं असतं, ती राजकन्या होती म्हणून तिनं केलं नाही हे नक्की!पण निदान टाळी वाजवून "कोण आहे रे तिकडे म्हणावं "आणि शोधावं तेही नाही.किती हे कष्ट राजकन्या असण्याचे आणि राजकन्या बनून राहण्याचे.पण तिला का बोला आपणही पण अशा कित्येक गोष्टी अगदी राजकन्यत्व नाही पण आपण अष्टभुजा आहोत किंवा फार थोर आहोत हे सिद्ध करायच्या अट्टहासानी केल्या आहे.खराखरा गॅसचा सिलेंडर ओढण्यापासून ते खसाखसा गाद्या उचलणे, दळण किंवा किराणा किंवा भाजीच्या पिशव्या वाहणे ही कामे आत्यंतिक प्रेमानं केली आहेत. स्वतःच्या घरचं कुठलंही काम करताना शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य कधीही जाणवलं नाहीये.घरची अनभिषिक्त राणी असूनही सर्व कामं मनापासून केली आहेत!त्यात गोडवाही टिकला त्या त्या वेळी! ही कामं करताना कधीही वाटाणे टोचले नाहीत सिद्ध करायला.पण हेही तितकंच खरं की आयुष्यात बरेच वाटाणे टोचायचे राहिलेले नाहीत.
आज परीकथेची आठवण का झाली म्हणजे परत एखादा वाटाणा टोचला की काय!कधी हा वाटाणा शाब्दिक असतो कधी कृतीतून असतो आणि
राजकुमारी व्हायच्या किंवा सिद्ध करण्याच्या नादात टोचणारा वाटाणा सहन करत झोप न घेणारी मीसुद्धा असते बरेचदा आणि एकेकदा सगळं चांगलं असूनही कसलातरी वाटाणा टोचत राहतो.कधी आर्थिक,शारीरिक, कधी भौतिक अपयशाचा.कधी कोणाच्या बोलण्याचा, वागण्याचा..कधी मनाविरुद्ध घडण्याचा आणि क्वचित आपल्याला काहीतरी कमी मिळल्याचाही, कमीपणाचाही असतो.वाटाणा टोचत राहतो,राजकन्येची झोप उडत राहते.कधीतरी खरंतर झोप न येण्यासारखं काही नसतं तरीही.वाटाणे आपोआप येतात मनात!
खरंतर राजकन्या आणि वाटाणा ही दोन्ही रुपकं आहेत किंवा मिथकं. ह्याला स्त्री पुरुष असा भेद काही नसतो बरं!फक्त सिद्ध करायची खुमखुमी बायकांमध्ये जास्त असते किंचित इतकंच! पण राजकन्या आणि वाटाणा ह्या दोन्हीत कायम द्वंद्व होत राहतात.
अनेक परीकथांमधून खूप काळापूर्वी बघितलेली डायनावरची documentry, तीन चार वर्षांपूर्वी पाहिलेली The crown ही मालिका आणि नुकतीच ओप्रा विनफ्रेनी घेतलेली मेगन मार्केलची मुलाखत बघितली आणि राजे राण्या राजकन्या ह्यांची आयुष्य थोडीफार उलगडली.केवढे आकृतिबंध! एत्तदेशीय अनेक राण्या/राजकन्या ह्यांनाही सुखासीन आयुष्य किंवा संघर्षाला, युद्धाला सामोरं जायला लागलं नाहीतर जोहाराला!इतकं नक्की लक्षात आलं की राजकन्या किंवा राणी होणं सोपं नसतं, ते कधी नव्हतंच सोपं!त्यामुळे ते परीकथेतच बरं!तसंही प्रत्येक परीकथेत एक सत्याची किनार असतेच की.आपल्याही वाट्याला कधीतरी सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी येतात.पण त्यांच्याशीही खुबीनं दोन हात करता येतात सवयीनं!
Chin up Princess or the crown will fall ह्या नादात राजकन्यांना धड पायाखालची वाटही दिसत नाही.त्यापेक्षा साधं माणूस म्हणून जगणं जास्त चांगलं नाही का! जगणं जितकं साधं सरळ, तितकं सोपं नाही का!
पण म्हणून परीकथांमधलं सौन्दर्य का कमी होणारे! ते शुभ्र घोळदार गाऊन्स, हिऱ्याचे चमकणारे मुकुट, लांब सोनेरी केस,काचेचे बूट हे मुलींना मोहवणार आणि वेलावरून चढून,राक्षसाशी दोन हात करणारा , सिल्कच्या शर्टवर जॅकेट घातलेला, बरेचदा एकदम गंमतशीर आणि चलाख राजपुत्र त्या वयाच्या मुलांना भुलवणार!असू दे बापडा!परीकथा प्रत्यक्षात घडत नसल्या तरी त्याचा गोडवा घोळत रहावा मनात!पण नंतर वाटतं की आणि आपोआप त्याची जाण येते की राजा राणी ही तिथेच रहावी.एकतर पत्तेनगरीत, नाहीतर परीकथेत आणि इथे आपण माणूस म्हणून आनंदानं जगावं.कष्ट,प्रेम,आनंद ह्या सकस साध्या गोष्टी याव्यात आपल्या वाट्याला.keep it simple stupid हे सतत बजावत रहावं स्वतःला.गुंतागुंत न करता, स्वतःला सदैव सिद्ध न करता जगावं निश्चित.
भलतेच वाटणे टोचून घेऊच नयेत, आलाच एखादा वाटाणा वाट्याला तर चांगला झाडून काढावा आणि मग पिसाच्या गादीवर शेवरीची उशी घ्यावी डोक्याला.हेच तर शिकवलं घरच्या राण्यांनी आपल्याला!
परीकथा आणि त्यातल्या राजकन्या जशा शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या रेंगाळल्या ते शक्य नसलं तरी आपल्या कुटुंबासाठी आपल्या पणजी,आजी आणि आईसारखं,आपण एक चांगली कथा म्हणून पुढच्या पिढीच्या मनात चांगल्या कारणांसाठी रेंगाळत रहावं!शेवटी...
she who leaves a trail of glitter is never forgotten... आणखी काय पाहिजे राजकन्येला!
©ज्येष्ठागौरी
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
she who leaves a trail of
she who leaves a trail of glitter is never forgotten... आणखी काय पाहिजे राजकन्येला!
अप्रतिम....
आवडलं लेखन
आवडलं लेखन
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
सुरेख! तुम्ही फार सुरेख
सुरेख! तुम्ही फार सुरेख लिहिता.
लेखानिमित्ताने ऐकलेल्या,वाचलेल्या परीकथा मनात तरळून गेल्या.
कै.सुधा करमरकरांच्या "लिटिल थियेटर की रंगभूमी" नी प्रस्तुत केलेल्या बालनाट्यांनी लहानपण, भारून टाकलेले आठवते.रापुंझेल ऐवजी मधुमंजिरी!
आवडले लिखाण
आवडले लिखाण
लेख गंडलेला आहे. नक्की काय
लेख गंडलेला आहे. नक्की काय म्हणायचे आहे.?
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
मिल्स अँड बून मधले हिरो आणि त्यांना नाईलाजाने उचलून आणाव्या लागलेल्या हिरॉईनी यांची भुरळ तर होतीच.
ती वाटाणा वाली राजकन्या पण आठवतेय. आम्ही सध्या तिचा उपयोग अनेक ऑनसाईट, प्रमोशन्स मिळूनही रडत असलेल्या मित्र मैत्रिणींसाठी उपमा म्हणून करतो
मुलीला रत्नाकर मतकरींची फाटक्या कपड्यातली राजकन्या ही गोष्ट नक्की वाचायला द्या.
आता आमची टीन पुतणी या वयात आहे.हृतिक ला हृतकू म्हणते, त्याच्या अफेअर्स बद्दल एक शब्दही ऐकून घेत नाही, कंगनाने त्याच्यावर निव्वळ कुभांड रचलंय म्हणून आमच्याशी तावातावाने भांडते. हृतीक बद्दल खूप वेडंवाकडं बोललं तर तिला रडू येतं.
मग तिला सिमॉन बेकर, जेस स्पेन्सर, बेनेडिक्ट, जेरेमी ब्रेट वगैरे अजून राजकुमार दाखवून तिच्या स्वप्नांचे क्षितीज रुंदावले
अनु
अनु
आधीचा लेख जास्त अपिलिंग होता.
आधीचा लेख जास्त अपिलिंग होता.
अप्रतीम चिंतन....
अप्रतीम चिंतन....
<<तसंही प्रत्येक परीकथेत एक सत्याची किनार असतेच की>> क्या कहने !
माझ्या वडिलानी जुन्या वेस्ट एंड मधे रोमन हॉलिडे नेऊन दाखवला होता... तेव्हा सातवी आठवी मधे असेन कदाचित... इंग्रजी कळणे दुरापास्त होते. पण तरीही काही तरी फार अलौकिक सुंदर पहातोय ही जाणीव होत होती.. त्याचे मोरपंखी सावट कित्येक दिवस टिकले होते.
परीकथांंचा आणि संस्कार , मनाची जडणघडण यातला रेशमी तलम धाग्यांचा गुंता किती अलगदपणे सोडवून दाखवलात !
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
Sahiye
Sahiye
छान लिहिलयं...
छान लिहिलयं...
छान लिहिले आहे!
छान लिहिले आहे!
खूप सुंदर लिहिलंय!
खूप सुंदर लिहिलंय!
सुंदर.....
सुंदर.....
लेख मुखपृष्ठावर आला म्हणून
लेख मुखपृष्ठावर आला म्हणून उत्सुकतेनं वाचायला घेतला. पण विशेष काही कळलं नाही काय म्हणायचंय
खूप खूप सुंदर लिहिलंय!
खूप खूप सुंदर लिहिलंय!
"एकेकदा सगळं चांगलं असूनही कसलातरी वाटाणा टोचत राहतो.कधी आर्थिक,शारीरिक, कधी भौतिक अपयशाचा.कधी कोणाच्या बोलण्याचा, वागण्याचा..कधी मनाविरुद्ध घडण्याचा आणि क्वचित आपल्याला काहीतरी कमी मिळल्याचाही, कमीपणाचाही असतो.वाटाणा टोचत राहतो,राजकन्येची झोप उडत राहते.कधीतरी खरंतर झोप न येण्यासारखं काही नसतं तरीही.वाटाणे आपोआप येतात मनात!">>
अगदीच पटलं!!
छान लिहिलेय .
छान लिहिलेय .
खूप सुंदर लेख!
खूप सुंदर लेख!
छान लिहिलयं !
छान लिहिलयं !
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
केवळ अप्रतिम आणि सहज
केवळ अप्रतिम आणि सहज relatable
आपण त्या जागी असतो तर भराभर
आपण त्या जागी असतो तर भराभर गादी उलटपालट करुन, वाटाणा शोधून पार झाडून काढला असता पण झोप मुळीच वाया घालवली नसती हे नक्की >> आपल्याला तर बाबा झोपेत वाटाणा टोचलाच नसता.
खूपच सुंदर लिहलय.
हा इतका सरभरलेला लेख प्रमुख
हा इतका सरभरलेला लेख प्रमुख पानावर का आहे? लेखात उगीच ओढून ताणून आणलेले मुद्दे आहेत. कशाचा कशाशी मेळ नाही पण काहीतर भलतं दिलखेचक आहे, अशी लोकांची समजूत करून देण्यात लेख यशस्वी झाला आहे, हे प्रतिक्रियांमधून दिसतंय. उगीच आपण राजकन्या आहोत्/नाहीत, अष्टभुजा दाखवायला जाणे...अशी उलट सुलट विधाने करून नुस्ता गुंता केलेला लेख आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापायी ट ला फ जोडून काहीतरी लिहीण्याचा भलता अट्टाहास आढळून आला.