४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>> एखाद्या १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला व ती गर्भवती झाली तरी तिने बाळ जन्माला घतलेच पाहिजे, अन्यथा तिच्यावर खटला दाखल करायचा बलात्कार्‍याला अधिकार ! Rofl

टेक्सास मध्ये आलेला नवा कायदा वाचलेला दिसत नाही. तिथे कुणीही तिर्हाईत कुणावरही आबोर्शन केले म्हणून खटला भरून १०००० डोलर्स जिंकू शकतो. म्हातार्‍या रिपब्लिकन पुरुषांना स्त्रियांच्या गर्भाशयात डोकावून बघायची काय हौस असते अनाकलनीय आहे.

टेक्सास मध्ये आलेला नवा कायदा वाचलेला दिसत नाही. >> विकु उजव्या गटांच्या माध्यमांमधे ह्याबद्दल बोलले जात नाही. टेक्सास पेक्षाही मिसिसीपी मधला लॉ जो सध्या होल्ड वर आहे तो आहे ज्यात रेपसाठीही १५ वीक नंतर परवानगी नाही . स्त्रियांच्या हक्काबद्दल जागरुक असणारे उजवे ह्याला शांतपणे बगल देऊन जात असतात.

'स्त्रियांचे गर्भाशय' असा शब्द वापरू नये. ते ट्रान्सफोबिक आहे. मुळात स्त्री अशी काही definite species अस्तित्वातच नाही. सुप्रीम कोर्टच्या जजला पण माहीत नाही. Woman हा एक अमूर्त काल्पनिक concept आहे.
तर persons with uterus असं म्हणावं.

बरं ती फ्लोरिडा मधली गणिताची पुस्तके बॅन्/रद्द करायची भानगड काय आहे? नुसतीच बातमी आहे बहुतेक ठिकाणी उदाहरणे नाही. एक दोन ठिकाणी मिसुरी मधली उदाहरणे आहेत. ती क्रेझी आहेत पण क्रिटिकल रेस थिअरीचा त्याच्याशी काय संबंध माहीत नाही.

रिपब्लिकनांचे एकंदर गणिताशी असलेले वाकडे हे कारण असावे Wink - बघ ओबामाचे शेवटचे वर्ष म्हणजे पूर्ण वर्ष नाही पण ट्रंपचे सहा महिने म्हणजे चार वर्षे (रेफरन्स : गेरिक नि एमी कोहेन ह्यांचे नॉमिनेशन)

अहो पण बलात्कारी ऑफ ऑल द पीपल कशाला जाईल खटला दाखल करायला! दहा हजार डॉलरसाठी आयुष्यभर चाईल्ड सपोर्टचं झेंगट बिचार्‍याच्या गळ्यात पडणार. वर परत साताठ वर्षं जेलमध्ये जायचा छोटासा त्रास आहेच!
गर्भपात हा आपल्यासाठी नसला तरी समाजाच्या एका मोठ्या गटासाठी संवेदनशील विषय आहे, त्यात स्त्रिया देखील मोठ्या संख्येने आहेत, आणि त्या लोकांनी म्हातार्‍या रिपब्लिकनना आपल्या वतीने स्त्रियांच्या गर्भाशयात डोकावून पहाण्याचा अधिकार दिला आहे. जसा काही लोकांनी म्हातारबाला गॅस पाईपलाईन्स बंद पाडण्याचा, इल्लिगल्स साठी पायघड्या पसरण्याचा अधिकार दिला तसा. प्रत्येक इश्श्यु पुरुष वि. स्त्रिया, गोरे वि. काळे, थोडक्यात सो-कॉल्ड ‘प्रिव्हिलिज’ च्या स्ट्रॉ मॅन ला नेऊन भिडवण्याच्या प्रकारामुळेच आजचं लिबरलिझम म्हणजे विनोदाचं भांडवल झालं आहे.

>>कोणत्या निकषांमध्ये जज ब्राऊन कमी पडतात हे माहित असेल तर नक्की सांगा.
<<
शाळकरी पोराला सांगता येईल इतक्या सोप्या प्रश्नाला वोक च्या हव्यासापायी उत्तर न देणे. आपण डॉक्टर नसल्यामुळे स्त्री म्हणजे काय हे सांगता न येणे हे अत्यंत घातक आहे. त्या कसोटीवर बाई सपशेल नापास आहेत! बाकी काय काय क्वालिफिकेशन शोधून त्यावर आधारित केतान्जी ब्राऊन म्हणजे न्यायव्यवस्थेला मिळालेली दैवी देणगी कशी आहे ह्यावर अनेक परिच्छेद पाडता येतीलच. पण न्यायाधीश पदाकरता विम्बल्डन वा १०० मी पोहणे वा धावणे अशी स्पर्धा नसते की निर्विवाद अमुक एक माणूस सुवर्णपदक विजेता म्हणून घोषित केला जातो.
मुळात बायडनने लावलेली कसोटी हीच संशयास्पद आहे. अशा प्रकारे कसोट्या लावून व्यक्ती नेमत जाण्याचा पायंडा पडला तर हे वाढतच जाणार. पुढच्या खेपेला लॅटिनो वंशाची व्यक्ती आणि ट्रान्स जेन्डर असली तरच त्या व्यक्तीचा न्यायाधीश म्हणून विचार होईल असे कुणी म्हणेल. जिथे निव्वळ गुणवत्ता हा निकष असला पाहिजे तिथे असला भेदभाव आणणे घातक आहे. असो. म्हातारबाने हवी ती व्यक्ती नेमली आहे. आता त्याच्या चाहत्यांनी आनंदोत्सव करायला हरकत नाही. निवडणुकीत ह्या मुद्द्याचा कितपत फायदा होतो ते काळच सांगेल!

म्हातारबा बाईडनच्या भ्रमिष्टपणाचे अजून एक उदाहरण. इस्टर निमित्त व्हाईट हाऊस मुक्कामी मोठा सोहळा चालू होता. जमलेल्या तमासगीर लोकांनी म्हातारबाला अफगाणिस्तानविषयी काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. म्हातारबाला अर्थातच नीट काही कळले नाही मग तो थोडा जवळ जाऊन विचारपूस करू लागला. काही क्षणात इस्टरच्या सशाच्या वेष परिधान केलेला व्हाईटहाऊसच्या स्टाफचा माणूस धावत आला. बायडनची जवळजवळ बखोट पकडून त्याला त्या प्रश्न विचारणार्या लोकांपासून दूर फरफटत घेऊन गेला!
जगातील महासत्तेचा सर्वोच्च नेत्याला एका इस्टर बनीने गचांडी पकडून जाताना पाहून अन्य राष्ट्राचे प्रमुख काय समजतील?

https://pbs.twimg.com/media/FQgoNDgXEAQCwF2?format=jpg&name=large

क्रिटिकल रेस थियरी गणितात मिसळून जे काही दिव्य मिश्रण बनते त्याचा एक गाळीव नमुना!
simultaneous linear equations ह्या विषयाचे प्रश्न आणि माया आन्जेलू हिच्या आयुष्याबद्दलचे प्रश्न मिसळून. काय पण दिव्य कल्पना आहे!
त्यातही त्या बाईंचा वेश्या, वेश्यांचा दलाल आणि नाईट क्लब डान्सर असण्याचा अनुभव प्रश्नपत्रिका बनवणार्‍यांना फार महत्त्वाचा वाटलेला दिसतो!

खरोखर असे प्रश्न विचारले जात असतील तर अमेरिकन मुले गणितात कच्ची रहात असल्यास नवल नाही!

परमेश्वरा!
कोणत्या ग्रेडसाठी आहे हे? फक्त फ्लॉरिडात की आता देशभर असंच शिकवणार आहेत?

फक्त थियरीच शिकवणार आहेत की मुलांकडून प्रॅक्टिकलही करून घेणार आहेत नाईट क्लब डान्सिंग आणि पिंपिंगचं?
लिबरटांच्या राज्यात काहीही अशक्य नाही.

आणि असल्या बीभत्स प्रकाराला विरोध करणारे वर्णद्वेषी समजले जातात. मेरिक गारलंड नामक अटॉर्नी जनरल तर सी आर टी ला विरोध करणारे दहशतवादी (डोमेस्टिक टेररिस्ट) आहेत असे मानतो!
इथले बायडन समर्थक ह्याविषयी काय मत बाळगून आहेत ह्याची उत्सुकता आहे. त्यांना त्यांच्या पोराबाळांना असे गणित शिकवले जावे असे वाटते का?
का श्वेत वर्णद्वेषी लोकांपासून वाचण्याकरता केलेली ही एक किरकोळ तडजोड आहे?

>>>>>केतान्जी ब्राऊन म्हणजे न्यायव्यवस्थेला मिळालेली दैवी देणगी कशी आहे ह्यावर अनेक परिच्छेद पाडता येतीलच. पण न्यायाधीश पदाकरता विम्बल्डन वा १०० मी पोहणे वा धावणे अशी स्पर्धा नसते की निर्विवाद अमुक एक माणूस सुवर्णपदक विजेता म्हणून घोषित केला जातो.

लॉल. तुम्हाला मुद्दे सुचले नाहीत म्हणून दुसऱ्यांचे मुद्दे ट्रिव्हियलाईज करताय, ठिके. ऑब्जेक्टिव्ह निकष नसतातच असे तुमचे म्हणणे दिसते आहे, एक सगळ्यात चांगला असा कोणी नसतोच..

मग तक्रार कशाबद्दल करत आहात ?

>>>>शाळकरी पोराला सांगता येईल इतक्या सोप्या प्रश्नाला वोक च्या हव्यासापायी उत्तर न देणे.
....सर्क्युलर होतंय त्यामुळे थांबतो आता.का उत्तर नाही दिलं आणि ते योग्य आहे असे माझे मत वर मांडले आहेत. पण असल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे हा तुमचा क्रायटेरिया असेल तर विनोदी आहे अगदी.

We apologize to anyone who was offended by the content of the assignment and have taken steps to avoid such occurrences in the future,' Rattigan went on to say, adding the district had received complaints from parents and members of the community.

२०१७ च्या पेपरवर, ज्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेतली आहे, त्याबद्दल काय काम आहे रडायचे ?
https://www.google.com/amp/s/www.dailymail.co.uk/news/article-4116902/am...

मुळात अश्या घटना होतात त्या किती प्रमाणात होतात ? एका इंटरनेटवरच्या फोटोवरून लगेच कसा निष्कर्ष काढता ?

फ्लोरिडा मधील नमुना मिळायचा आहे. तोवर हे सँपल म्हणून ठीक आहे. बोंब ठोकल्यावर बंदी घातली. खूप उपकार झाले! २०१७ साली हा मजकूर खूप छान होता का? मुख्य मुद्दा सी आर टी ह्या नावाखाली जो वोक धुडगूस घालून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला जात आहे तो आहे.
वर्जिनिया सारखे निळे राज्य ह्या CRT मुळे लाल झाले. आता डेमॉक्रॅटिक पक्षाला काहीही किंमत द्यावी लागली तरी आम्ही असेच CRT लोकांच्या गळी उतरवणार च असे काही ठरवले असेल तर आनंद आहे. नोव्हेंबर जवळ आहे!

खालील माहिती मला जी समजली ती लिहीतो. या विषयावर माझे काहीहि मत नाही, कारण आज मला असल्या विषयांशी काहीहि देणे घेणे नाही. तरी पण तुमचा आवडता छंद की आपले मत पटले नाही की द्या त्याला शिव्या, त्याप्रमाणे वैयक्तिक शिव्या दिल्या तरी चालेल.

तो गणिताचा शिक्षक माया अ‍ॅन्जोलू च्या चरित्राने, तिच्या कवितांनी भारला होता. आपल्याला जे आवडले ते सर्वांनी वाचावे या उद्देशाने ते गणिताच्या प्रश्नपत्रिकेत त्याची जाहिरात केली!!! सीआरटी शी त्याचा काही संबंध होता की नाही माहित नाही. तेहि त्याच्या शाळेत फक्त. नंतर कुणितरी ते उचलून कट अँड पेस्ट करून सर्व शिक्षकांच्या वेब साईटवर टाकले! कुणिही आपण काय करतो आहोत याचा विचार न करता काहीहि करावे.
तो शिक्षक हि धन्य नि ते कट अँड पेस्ट करणारे धन्य!!
मूर्खपणाचा कारभार चालू आहे.

सीडीसी, WHO, फॉची या सर्वांवर विश्वास न ठेवणार्‍या लोकांना आनंदाची बातमी - मास्क घालण्याची सक्ति कायदेशीर नाही.
तर अश्या रीतीने हा शास्त्रीय प्रश्न आर्थिक नि राजकीय विचाराने सुटला आहे.
देशात साथी पसरून लोक मरू नये याची जबाबदारी सरकारवर थोडीफार असते. त्या अन्वये मागे, १०० वर्षांपूर्वी कुठलेतरी वॅक्सिन घेण्याची जबरदस्ती केली होती नि तेंव्हा ते कायदेशीर होते - कारण लोकांचा सरकारवर नि सरकारातल्या शास्त्रीय लोकांवर विश्वास होता.

आजकाल कुणावरहि विश्वास ठेवणे कठिण - कारण कुठल्याहि विषयाचा फक्त आर्थिक नि राजकीय विचार करायचा - शास्त्र गेले खड्ड्यात.

आता फक्त माझे मत असे नि तुला प्रश्न असेल तर तुला वैयक्तिक शिव्यागाळी.

रिपब्लिकन सिनेटर बातमी देतात "अमुक लाख इलिगल मायग्रन्ट्स बॉर्डर वर पकडले गेले !"
खाली टिप्पणी करतात हा बायडनच्या ओपन बॉर्डर पॉलिसीचा परिणाम आहे असे म्हणतात.

काय गंमत आहे, बातमीत म्हणलंय "पकडले गेले" आणि हे बोलतात ओपन बॉर्डर पॉलिसीबद्दल.

भ्रमिष्ट, मतीभ्रष्ट बायडन डोके ठिकाणावर असलेला माणूस वाटावा ह्या उद्देशाने नेमलेल्या कमलाबाईने पुन्हा एक बिनडोक भाषण केले. त्यात बाईंनी स्पेस ही कशी महान गोष्ट आहे हे घोळून घोळून सांगितले. Space is what brings us together. असे एक अजब विधान होते. अवकाश हे लोकांना एकत्र आणते? ग्रहगोलांच्या मधे असलेली निर्वात पोकळी म्हणजे स्पेस वा अवकाश. हे लोकांना एकत्र कसें आणणार? बाईंच्या दोन कानांच्या मधे अशीच एक निर्वात पोकळी आहे बहुधा त्याबद्दलची ही कृतज्ञता असेल!
एकंदरीत कुठलेही भाषण हे ४-५ वर्षाच्या सुमार बुद्धीच्या शाळकरी मुलांसमोर आहे अशी आगाऊ समजूत करून काहीही आचरट, बिनडोक भाषणं करायचा पण कमलाबाईने उचलला असावा. आजवर तिच्या हाताखालच्या डझनभर स्टाफ ने राजीनामे दिले आहेत. अशा दिव्य भाषणाचा लेखक/लेखिका आपण आहोत असा संशय देखील येऊ नये म्हणून आपले चंबुगबाळे गुंडाळून बाहेर निघावे हे त्या स्टाफला वाटत असावे बहुधा!

विमानात मास्क घालण्याची सक्ती एका कोर्टाच्या जजाने उठवली. लगेच पुरोगामी लोक बोंबाबोंब करू लागले आहेत.
खरोखर वाट्टेल ते, वाट्टेल तसे मास्क घातल्याने रोग होणे वा दुसऱ्याला रोग देणे कमी होते का? एकंदरीत सी डी सी, विज्ञान प्रेषित फौची यांच्यावरील श्रद्धा जवळपास लयाला गेली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. एकंदरीत हा विज्ञानावर आधारित नियम नसून सामान्य लोकांना वेसण घालायचा, त्यांना नियंत्रणात ठेवायचा प्रकार आहे असे वाटते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले जाते का आणि कोर्ट काय निवाडा देते ते पाहिले पाहिजे.

<< भ्रमिष्ट, मतीभ्रष्ट बायडन डोके ठिकाणावर असलेला माणूस वाटावा ह्या उद्देशाने नेमलेल्या कमलाबाईने पुन्हा एक बिनडोक भाषण केले. त्यात बाईंनी स्पेस ही कशी महान गोष्ट आहे हे घोळून घोळून सांगितले. Space is what brings us together. असे एक अजब विधान होते. अवकाश हे लोकांना एकत्र आणते? ग्रहगोलांच्या मधे असलेली निर्वात पोकळी म्हणजे स्पेस वा अवकाश. हे लोकांना एकत्र कसें आणणार? बाईंच्या दोन कानांच्या मधे अशीच एक निर्वात पोकळी आहे बहुधा त्याबद्दलची ही कृतज्ञता असेल!
एकंदरीत कुठलेही भाषण हे ४-५ वर्षाच्या सुमार बुद्धीच्या शाळकरी मुलांसमोर आहे अशी आगाऊ समजूत करून काहीही आचरट, बिनडोक भाषणं करायचा पण कमलाबाईने उचलला असावा. आजवर तिच्या हाताखालच्या डझनभर स्टाफ ने राजीनामे दिले आहेत. अशा दिव्य भाषणाचा लेखक/लेखिका आपण आहोत असा संशय देखील येऊ नये म्हणून आपले चंबुगबाळे गुंडाळून बाहेर निघावे हे त्या स्टाफला वाटत असावे बहुधा!
Submitted by shendenaxatra on 23 April, 2022 - 14:20 >>

------- Space is what brings us together हे अगदी खरे आहे.
आंतरराष्ट्रिय सहकार्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचा असा International Space Station (ISS) प्रकल्प. तब्बल १५ देश सोबत काम करत आहेत, यात अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा, UK, EU मधिल देश आहेत. रशिया, अमेरिका हे दोन टोकाचे विचार प्रवाह / देश सहकार्याने एकत्र काम करत आहेत याचे ISS पेक्षा चांगले दुसरे उदाहरण सापडणार नाही. अनेक देशांना या संशोधनाचा फायदा मिळतो, विविध १९ देशांच्या अंतराळवीरांनी ISS ला भेट दिली आहे.

युक्रेन मधे हल्ले केल्यावर अनेक आघाड्यांवर रशियासोबतचे संबंध तोडले आहेत, अनेक कंपन्यांनी रशियामधून आपले बस्तान गुंडाळले आहे. अपवाद ISS मधिल सहभागाचा.

Space research खूप खर्चिक आहे , कोणा एका देशाला परवडणारे नाही आहे आणि सहकार्याशिवाय पर्याय नाही म्हणून Space is what brings us together हे विधान पटते.

<< खरोखर वाट्टेल ते, वाट्टेल तसे मास्क घातल्याने रोग होणे वा दुसऱ्याला रोग देणे कमी होते का? >>

------ मास्क व्यावस्थित रितीने नाका तोंडावर लावले असेल , hand hygiene ची काळजी घेतली तर कोरोना होण्याची शक्यता कमी आहे हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. दोन व्यक्तींनी व्यावस्थित रितीने मास्क वापरला तर अशी शक्यता अजूनच कमी होते.

उदय +१

उगाच काहीपण विधान घेऊन मतिभ्रष्ट वैगेरे म्हणणे म्हणजे..

उदय +१.
<<वाट्टेल तसे मास्क घातल्याने>>

वाट्टेल तसे केले तर ते बरोबर असण्याची शक्यता तुमच्या बुद्धिमत्तेवर, कौशल्यावर अवलंबून आहे.
बंदूक घ्यायचा हक्क आहे म्हणून बंदुक घेऊन वाट्टेल तश्या गोळ्या मारल्या तर स्वतःच्या आई बापाला, बायकोमुलांना गोळ्या घालून ठार माराल!!
तर जे करायचे आहे ते नीट करायचे, उगाच दुसर्‍याला खोटे पाडायसाठी नका करू!!!

शेंडेनक्षत्र,
खरोखरच बायडेन, कमला हॅरीस यांच्या भाषणांपेक्षा पुनः एकदा ट्रंपची भाषणे, त्याचे आण्विक शक्तीवरील भाषण अगदी परत परत ऐकावेसे वाटते.

>>
Space research खूप खर्चिक आहे , कोणा एका देशाला परवडणारे नाही आहे आणि सहकार्याशिवाय पर्याय नाही म्हणून Space is what brings us together हे विधान पटते.
<<
ज्याप्रमाणे एक कोकिळ ओरडल्यामुळे लगेच वसंत ऋतुचे आगमन होत नाही तसे एका स्पेस स्टेशनमुळे स्पेस तंत्रज्ञान हे मानवजातीला एकत्र आणणारे ठरत नाही. ७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते सोव्हिएट पतनापर्यंत स्पेस ही एका जीवघेण्या, खर्चिक स्पर्धेचे मैदान होते. स्टार वॉर्स, स्पेस डिफेन्स इनिशिएटिव्ह असल्या नावाने अनेक उपक्रम अमेरिकेच्या संरक्षण खात्याने हाती घेतले. त्यात अनेक अब्ज डॉलर्स खर्च झाले. तोच प्रकार सोव्हिएटच्या बाजूनेही झाला.
आजही टेहळणी करणारे उपग्रह, ड्रोन वगैरे तंत्रज्ञाने स्पेसशी निगडित आहेत आणि ती हजारो मैलावरून खर्या वा खोट्या शत्रूला ड्रोनद्वारा बाँब टाकून मारायला वापरली जातात. भ्रमिष्ट बायडनने अफगाणिस्तानातून बाडबिस्तरा गुंडाळून पलायन केले तेव्हा एका आत्मघातकी इस्लामी अतिरेक्याने विमानतळावर बाँब फोडुन शेकडो लोक मारले. त्याचे उत्तर म्हणुन बायडन सरकारने ड्रोन पाठवून अफगाणिस्तानात काही "अतिरेकी' मारले आणि नंतर असे कबूल केले की एका लग्न समारंभावर बाँब टाकून त्या हल्ल्याशी काहीही संबंध नसणार्‍या निरपराधी अफगाण लोकांना मारले.
तेव्हा एका स्पेस स्टेशनमुळे स्पेस ही लोकांना एकत्र आणणारे तंत्रज्ञान वगैरे काही ठरत नाही. तसेही अगदी सद्भावना निर्माण व्हावी म्हणून केलेले हे स्पेस स्टेशन असले तरी त्यात सहभागी असणारे लोक जमिनीवर किती प्रेम, स्नेह, आपुलकी बाळगून आहेत ते रशियाच्या युक्रेन आक्रमणावरून दिसतेच आहे!
आग किंवा अग्नी हा कसा पवित्र आणि महान आहे असे एखाद्या सैबेरिया वा अलास्कातील घराला उबदार ठेवणार्‍या शेकोटीकडे बोट दाखवून म्हटले तरी अनेक ठिकाणी कुणी डोकेफिरू अग्निचा वापर करून एखादे दुकान, एखादे घर, एखादे जंगल भस्मसात करू शकतो ज्यात अनेक लोक, प्राणी, झाडे, मालमत्त्तांची राखरांगोळी होते हे नाकारता येत नाही. तसेच स्पेसचे आहे. किती प्रमाणात स्पेसमुळे एकत्र येत आहेत आणि किती प्रमाणात युद्ध, हिंसा, दुफळी माजत आहेत ह्याचे मोजमाप करुन निष्कर्ष काढला पाहिजे.
स्पेस ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ हा पोकळी असाच आहे तेव्हा त्याअर्थानेही स्पेस लोकांना एकत्र आणते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे.
ह्या बाईंच्या लोकप्रियतेचे अफाट आकडे बघता बहुतेक लोकांचे असेच मत होऊ लागले आहे की बाई बिनडोक आहेत. अगदी डेमोक्रॅट पक्षाचे तळवे चाटणारी माध्यमेही हळूहळू हे कबूल करत आहेत की कमलाबाई २०२४ च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मागे पडत आहेत.
https://www.southbendtribune.com/story/opinion/columns/2022/04/24/top-10...

>>
------ मास्क व्यावस्थित रितीने नाका तोंडावर लावले असेल , hand hygiene ची काळजी घेतली तर कोरोना होण्याची शक्यता कमी आहे हे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. दोन व्यक्तींनी व्यावस्थित रितीने मास्क वापरला तर अशी शक्यता अजूनच कमी होते.
<<
बहुतेक ठिकाणी असणारी बंधने ही निव्वळ मास्क लावा इतकीच आहेत. तो नीट आहे का नाही, मास्क योग्य दर्जाचा आहे की नाही ह्यावर काहीही नियंत्रण नाही. खातापिताना मास्क काढून ठेवायची सवलत आहे. कोविडचे जंतु इतके समजूतदार आहेत का की माणूस खातपीत असताना त्यावर रोगजंतू हल्ला करणार नाहीत वा त्याच्या शरीरातील जंतू अन्य शरीरात जाणे तहकूब करतात? एखादा मास्कला वैतागलेला माणूस आपले पाणी १ तास पुरवून पुरवून पितो आणि मास्क बाजूला ठेवण्याचा एक बहाणा मिळवतो. एकंदरीत हा सगळा फार्स आहे, शो आहे. विज्ञानाचा काडीचाही संबंध नाही.
मुळात कोव्हिड तोंडावाटे नाकावाटे फेकल्या जाणार्या द्रव्यावाटे पसरतो का निव्वळ हवेतून पसरतो ह्याबद्दल काही माहिती नाही. कापडी मास्कचा काहीहीहीही उपयोग नाही ह्याबद्दल अनेक पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
विमानातील हवा जमिनीवरील हवेपेक्षा जास्त शुद्ध केली जाते. विमानातून प्रवास केल्याने (मास्क विरहित) रोग संसर्ग वाढतो असे कुठलेही संशोधन वाचनात आलेले नाही.
तेव्हा ही सगळी बंधने ही लोकांना वेसण घालण्याकरता आहेत. रोग प्रतिबंध हा उद्देशच नाही. लोकांना मुठीत ठेवून हवे तसे वागवणे, लोकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणे हाच उद्देश असावा असे दिसते आहे.
मास्कच्या वाईट परिणामांचे काय? लहान मुले, वृद्ध ह्यांना मास्कची सक्ती असल्यामुळे ७-८ तास विमानप्रवास असला तरी नीट झोपता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य खराब होत नसेल का? त्याचा विचार का नाही करायचा? मुळात विमानाच्या सिटा काही फार आरामदायी नसतात, त्यात खाण्यापिण्याचे हाल, जेटलॅगसारखी समस्या, वेळोवेळी होणारे विलंब आणि हे सगळे कमी आहे म्हणून वरती कायम लावायला लागणारा मास्क!
हे कोविड प्रकरण जर आणि जेव्हा संपेल तेव्हा ह्या तथाकथित आरोग्य खात्याच्या दंडेलीला, दादागिरीला, हुकुमशाहीला प्रतिबंध करणारा कायदा पास होईल अशी आशा करू.

बायडन हा भ्रमिष्ट, बुद्धीभ्रष्ट नाही. त्याचा मेंदू आजही तल्लख आणि सर्व आव्हाने पेलू शकेल इतका तयार आहे असे ज्यांना वाटते त्यांना माझा कोपरापासून प्रणाम. ( हवा तर म्हातारबासारखा हवेतला शेक हॅण्ड स्विकारावा!)
हवेशी शेक हॅण्ड करणे, भाषणात निरर्थक वाक्ये म्हणणे, विचारलेल्या प्रश्नाला त्याचा अर्थ न समजता तिसऱ्याच विषयाचे उत्तर देणे, अकारण संतापणे, व्हाईट हाऊस स्टाफ कडून म्हातारबाच्या गचांड्या पकडून त्याला प्रश्र्नकर्त्यापासून दूर फरफटत नेणें, अ को ब्र ना ओबामांकडून त्याचा अपमान होणे, अ को ब्र ना साठी दिलेल्या पार्टीत म्हातारबाला एखाद्या तुच्छ, क्षुद्र, किरकोळ व्यक्तीसारखे दुर्लक्षित ठेवणे हे तो ठणठणीत असल्याचे लक्षण असेल तर असा ठणठणीत माणूस पुन्हा राष्ट्रपती होऊ नये अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना करतो!

Pages