येत्या आर्थिक वाढीचा कसा फायदा करून घेता येईल?

Submitted by अजय on 2 April, 2021 - 11:45
nasdaq chart

येत्या काही महिन्यात अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक वाढ अपेक्षित आहे. महामारी संपण्याची लक्षणे दिसू लागली आहे. अमेरिकन ग्राहकाकडे कधी नव्हे इतकी बचत आणि क्रयशक्ती जमली आहे आणि तो खर्च करायला उत्सुक आहे. त्यातच नुकतीच १.९ ट्रिलियन डॉलर्सची भर बायडन सरकारने घातली आहे. त्यात अजून भर घालण्याचे प्रयत्न चालू आहेत पण ते तूर्तास बाजूस ठेवू . पण त्या शिवायही वाढ अपेक्षित आहेच. आजच्याच आकडेवारीनुसार बेकारी निश्चिच कमी होते आहे. बेकारी (किंवा नोकर्‍यांची वाढ ) हे आकडे मागून येणारे सूचक (लॅगिंग ईडीकेटर) समजले जातात. म्हणजे आर्थिक वाढ आधिच सुरु झाली आहे. याचा आर्थिक फायदा फक्त अमेरिकेलाच नाही तर सगळ्या जगालाच होणार आहे.

यातले कुठले कल उघड दिसत आहे , कुठले छुपे आहेत आणि त्याचा कसा फायदा करून घेता येईल याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

१) प्रवासाशी संबंधित - Airlines : एकीकडे ग्राहकांना प्रवास करायची घाई आहे. त्यामुळे एअरलाईन्सला चांगले भवितव्य अपेक्षित आहे. पण त्याचबरोबर तुम्ही आम्ही सर्वसाधारण ग्राहक हे कधीच खूप फायदेशीर नसतात . त्यांना हवे असतात व्यावसायिक ग्राहक आणि व्यावसायिक प्रवास कायमचाच कमी झालेला आहे अशी लक्षणे आहेत. मला असे वाटते की ज्या हवाई कंपन्या कमी पैशात सर्वसाधारण ग्राहकांना समोर ठेवून चालत होत्या आहेत, त्यांची चंदी होणार आहेत. ज्या मोठ्या हवाई कंपन्या व्यावसायिक ग्राहकांवर अवलंबून होत्या किंवा भरपूर विमाने भाडेतत्त्वावर घेतल्याने कर्जाच्या बोज्याखाली आहेत त्यांचे अवघड आहे.

२) प्रवासाशी संबंधित - Hotels : जी गत हवाई कंपन्यांची तीच हॉटेलांची (Lodging) . सर्वसाधारण ग्राहकांची भरपूर साचून राहिलेली मागणी आहे. पण दूरस्थ कामकाजामुळे व्यावसायिक ग्राहक पूर्वीइतके कधीच येणार नाहीत. मोठ्या हॉटेल चेन पेक्षा छोटी हॉटेल्स किंवा AirBNB यांची जास्त चंदी होणार असे दिसते. पण आता बर्‍याच मोठ्या हॉटेलांनी छोट्या हॉटेलांमधे गुंतवणूक केली आहे (किंवा तेच त्यांचे खरे मालक आहेत) त्यामुळे हे सांगणे अवघड आहे.

३) Consumer discretionary , चैनिच्या , विलासाच्या वस्तू : या वस्तूंना (यात consumer durables , furniture हे ही यात आले) या वर्षी तरी भरपूर मागणी येणार असे कल आहेत.

४) कागद : गेली कित्येक वर्षे दिसणारा कल , दूरस्थ कामकाजामुळे वाढला तो म्हणजे कामाच्या ठिकाणी लागणारे कागद (paper as office supply) त्यामुळे कामासाठी लागणार्‍या कागदांची मागणी कमी होत आहे आणि ती आणखी कमी होणार. त्यामुळे या कंपन्यांच्या समभागांचे भाव कमी व्हायला हवे. पण ज्या कागद कंपन्यांनी हा कल पूर्वीच ओळखला होता. आणि त्यांनी पॅकेजींग साठी लागणारे कागद तयार करणासाठी गुंतवणूक केली त्यांचा महामारीत ईकॉमर्स वाढल्यामुळे खूप फायदा झाला आणि तो अजून होत राहणार.

५) रेस्टॉरंटस :
जगात सगळीकडे (अमेरिकेत जास्तच) भरपूर साचून असलेली मागणी म्हणजे रेस्टॉरंट मधे जाऊन खाण्याची . येत्या काही महिन्यात रेस्टॉरंटं उद्योगात भरपूर वाढ अपेक्षित आहे २-३ कारणांमुळे १) साचून असलेली मागणी २) नुकत्याच stimulus मुळे खेळणारा पैसा ३) महामारीत लाखो रेस्टॉरंटस कायमची बंद पडली . त्यामुळे जे टिकून उरले आहेत आणि परत सुरु होत आहे त्यांची स्पर्धा एकदम कमी झाली आहे.

पण रेस्टॉरंट हा धंदा पुष्कळसा खाजगी क्षेत्रात आहे. त्यांचे समभाग उपलब्ध नाहीत, ज्यांचे समभाग आहेत त्या बहुतेक फास्ट फूड या प्रकारच्या कंपन्या आहेत आणि त्यांची काय वाढ होणार याबाबत मी साशंक आहे. रेस्टॉरंटला ज्या कंपन्या माल पुरवतात त्यांचीपण वाढ होणार आहे. कधी एकदा महामारी , social distancing संपून पार्टी करतो याची सगळ्याना घाई झाली आहे. त्यामुळे या वर्षाच्या उत्तरार्धात बिअर आणि इतर दारू च्या कंपन्याना भरपून फायदा होईल, असा माझा होरा आहे . या कंपन्यांचे समभाग बाजारात उपलब्ध आहे

तुम्हाला कुठले कल दिसतात, कुठल्या कंपन्या याचा फायदा घेतील?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती.

सर्वसाधारण ग्राहकांची भरपूर साचून राहिलेली मागणी आहे >>> हो तसेच वाचले आहे. leisure travel एकदम खूप वाढेल असे वाटते. पण अमेरिकेतील एअरलाइन कंपन्यांचे स्टॉक्स ऑलरेडी प्री-पॅण्डेमिक लेव्हलच्या जवळ पोहोचत आहेत. त्यामानाने क्रूझ कंपन्यांचे स्टॉक्स अजूनही पूर्ण रिकव्हर झालेले नाहीत. तेथे पुढच्या २-३ वर्षांत संधी असावी. कार्निव्हल, नॉर्वेजियन वगैरे.

पण "बिझिनेस ट्रॅव्हल" पूर्वीइतके व्हायला वेळ लागेल हे खरे आहे. तरीही माझ्या अंदाजाने पूर्वीच्या किमान ५०% पुन्हा सुरू होईल.

कोविडच्या निमित्ताने ग्लोबलायझेशनला खीळ बसली होती, ती पुढे तशीच चालू राहुन रिवर्स ग्लोबलायझेशनचा ट्रेंड पकड घेइल. गवर्नमेंट सुद्दा पॉलिसीज मधे बदल करुन "थिंक ग्लोबल, अ‍ॅक्ट लोकल" हे सूत्र वापरुन लोकल मॅन्युफॅक्चरिंगला उत्तेजन्/सवलती देइल. आता अ‍ॅपल मॅकबुक अमेरिकेतंच बनवणार आहे, पुढे आय्फोन हि कदाचित बनवतील... Wink

माझे Sector Analysis
:Strong Sectors: उतरत्या क्रमाने:-

Information Technology Sector [SPLRCT]
Consumer Discretionary [SPLRCD]
Communication Services Sector [SPLRCL]
Materials Sector [SPLRCM]
Industrials Sector [SPLRCI]
Financials Sector [SPSY]
Health Care Sector [SPXHC]
Consumer Staples Sector [SPLRCS]
Real Estate Sector [SPLRCR]
Utilities Sector [SPLRCU]
Energy Sector [SPNY]

गुंतवणूकीबद्दल फारसे कळत नाही पण हेल्थ केयर ७ व्या नंबर वर असेल तर चिंता वाटेल. कोव्हीड नंतर अनेक आजारांचे स्वरूप आणि इलाज करण्याची पद्धत बदलली. हे क्षेत्र झपाट्याने पुढे जायला हवे.

सीमंतिनी, हा क्रम त्यांनी गुंतवणुकीच्या परताव्या बद्दल दिला आहे. गुंतवणुकी बद्दल नाही.
अर्थात या क्रमाशी सहमत नाही.

हा क्रम त्यांनी गुंतवणुकीच्या परताव्या बद्दल दिला आहे. गुंतवणुकी बद्दल नाही.
>>>
बरोबर आहे.फक्त यावर अवलंबून आपण गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकत नाही.
[वेळेअभावी मी पूर्ण माहिती देऊ शकलो नाही ,त्याबद्दल क्षमस्व.]
____________________________________________________________________
____________________________________________________________________

मार्केट सायकल नुसार प्रत्येक सेक्टर मध्ये आपल्याला कमी-जास्त वाढ (Growth ) दिसून येते.

त्यासाठी "सेक्टर रोटेशन" समजून घ्यावे लागेल

खालील चित्रात शॉर्ट टर्म मार्केट curve दाखवली आहे.

त्यानुसार,

Real Estate Sector, Consumer Staples Sector, Utilities Sector, Health Care Sector, Consumer Discretionary
हे Up curve मध्ये आहेत. ,म्हणजेच या सेक्टर्स मध्ये ग्रोथ सुरु झाली आहे.

[अर्थात हे विश्लेषण फक्त Reference साठी आहे,प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी
Fundamentals, Outperformance यासारख्या अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतील. ]

==========================================================================

sector2.jpg

धन्यवाद, चांगली माहिती. माहिती काही नाही, उत्सुकता आहे. ह्या बद्दल वाचायला हवे. कुठल्या वेबसाईटस/रिसोर्सेस असल्यास जरूर देणे. हे कर्व्ह बद्दल माहिती कोण कुठे देतं? आणि सोप्या भाषेत हवी. मॉर्निंगस्टारवर बेन्झबाई सांगतात तितपत समजत असं असणार्‍या व्यक्तीस उपयोगी पडेल अशी. मॉर्निंगस्टार वर सेक्टर इंव्हेस्टीगची फार माहिती नाही.
(हे धाग्याला जरा अवांतर प्रश्न झाले. अडाणी वाटतील माझे प्रश्न पण झालेच श्रीमंत तर हेच अडाणी प्रश्न मूळाशी असतील. Wink त्यामुळे जनहितार्थ विचारले )

मी वर दिलेले कल
१) माझ्या वैयक्तिक निरक्षणातून दिले आहेत
२) वॉल स्ट्रीट जर्नल आणि मार्केटवॉच इथे मधून मधून सोप्या भाषेत लेख असतात त्यातून वाचले आहेत.
३) तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, त्यात तुम्ही जे कल पाहता ते खरं तर इतर कुठल्याही माध्यमात दिसणार्‍या बातम्यांपेक्षक, लेखांपेक्षा जास्त ताजे आणि अचूक असतात त्याचा उपयोग करुन घेता येतो.
४) नवशिक्यांसाठी (आणि खरंतर मुरलेल्यांसाठीही) इंडेक्स फंडांना पर्याय नाही. गेल्या काही दशकात S&P ५०० इंडेक्स फंडांनी मला भरपूर परतावा मिळवून दिला आहे. पण त्याहीपेक्षा पुढे जायचे असेल तर असे कल उपयोगी ठरू शकतात.

जगात सगळीकडे (अमेरिकेत जास्तच) भरपूर साचून असलेली मागणी म्हणजे रेस्टॉरंट मधे जाऊन खाण्याची . येत्या काही महिन्यात रेस्टॉरंटं उद्योगात भरपूर वाढ अपेक्षित आहे २-३ कारणांमुळे १) साचून असलेली मागणी २) नुकत्याच stimulus मुळे खेळणारा पैसा ३) महामारीत लाखो रेस्टॉरंटस कायमची बंद पडली . त्यामुळे जे टिकून उरले आहेत आणि परत सुरु होत आहे त्यांची स्पर्धा एकदम कमी झाली आहे.

पण रेस्टॉरंट हा धंदा पुष्कळसा खाजगी क्षेत्रात आहे. त्यांचे समभाग उपलब्ध नाहीत, ज्यांचे समभाग आहेत त्या बहुतेक फास्ट फूड या प्रकारच्या कंपन्या आहेत आणि त्यांची काय वाढ होणार याबाबत मी साशंक आहे. रेस्टॉरंटला ज्या कंपन्या माल पुरवतात त्यांचीपण वाढ होणार आहे. कधी एकदा महामारी , social distancing संपून पार्टी करतो याची सगळ्याना घाई झाली आहे. त्यामुळे या वर्षाच्या उत्तरार्धात बिअर आणि इतर दारू च्या कंपन्याना भरपून फायदा होईल, असा माझा होरा आहे . या कंपन्यांचे समभाग बाजारात उपलब्ध आहेत.

सर,

बिग फार्मा,
बिग टेक फँग समुह
चिप प्रॉडक्षन ए आय ऑफिस आटोमेशन व रोबॉटिक्स इ कॉमर्स ह्यांत कार्य करणार्‍या कंपन्यांचे समभाग डिप्स मध्ये घ्यावेत त्याच्या मागे
जाउन त्यांचा कच्चा माल पुरव ठा करणा र्‍या कंपन्या जसे कि केमिकल्स बनवणार्‍या, टायर साठी रबर, स्टील उद्योग समुह अ‍ॅल्युमिनि अम व इतर मेटल मायनिंग कर णार्‍या कंपन्या ऑइल व डेरिवेटिव्ह्ज वाल्या कंपन्या जसे सौदी अराम्को ह्याचे समभाग घ्यावेत. लॉ जिस्टिक्स व सप्लाय चेन पण मजबूत काम राहील कारण होम डिलिव्हरी !!!!

एडु टेक कारण शिक्षण बरेचसे ऑनलाइन व कुठुनही घेता येण्याजोगे होते आहे त्यामुळे ऑ न लाइन क्लासेस घेणा र्‍या त्यातील कंटेंट पुरवणार्‍या कंपन्या ह्यांना धंदा मिळत राहील.

With stimulus cash and jobs spike, U.S. emerges as main engine for global economic recovery.
Spending on imports spreads the wealth across Europe and Asia
Congress in March approved the Biden administration’s $1.9 trillion American Rescue Plan. Together with a $900 billion bill in December, it will add almost 1.5 percent to the global economy’s growth rate this year, according to the Organization for Economic Cooperation and Development.
“This will not only benefit the U.S. economy, but it will fuel global growth,” Laurence Boone, the OECD’s chief economist, said last month.
The impact of the U.S. government rescue plan will be felt in India, Australia, South Korea, the United Kingdom, Canada and elsewhere, the OECD said.
https://www.washingtonpost.com/business/2021/04/04/us-economy-global-rec...

धन्यवाद, चांगली माहिती. माहिती काही नाही, उत्सुकता आहे. ह्या बद्दल वाचायला हवे. कुठल्या वेबसाईटस/रिसोर्सेस असल्यास जरूर देणे. हे कर्व्ह बद्दल माहिती कोण कुठे देतं?
Submitted by सीमंतिनी on 4 April, 2021 - 21:33
>>>>>>>

https://youtu.be/NL3drXWlJ7g

इथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
[हे पूर्णपणे Technical Analysis वर आधारित आहे. यात Fundamentals विचारात घेतले नाही.]

________________________________________________________________________________________________________________
साधारण एक आठवड्यानंतर झालेले रोटेशन :-

sector update.png

गेल्या काही वर्षातली प्रगती पहाता पुढील १० वर्षे ही ग्रोथ इयर्स चा असतील. सेक्टर प्रमाणे वाढ कमी जास्त होत जाईल. (कारण अनेक सेक्टर्स सरकारच्या पॉलिसिज वर आधारित असतात )

त्यामुळे फायदा घ्यायचा असेल तर दीर्घ मुदतीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणेच योग्य.

इंडेक्स फंडांपेक्षा लार्ज कॅप - मिड कॅप चे कॉम्बिनेशन किंवा flexi funds जास्त फायदेशीर थरातील (५+ वर्षे गुंतवणूक गरजेची)

धन्यवाद सर्वांना. चांगली माहिती. मार्केटवॉच वरचे व्हिडीयोज कधीकधी पाहिले आहेत, वॉल स्ट्रीट जर्नलच्या वाटेला गेले नव्हते. बघते. यूट्यूब लिंककरता धन्यवाद- आता यूट्यूब बरेच व्हिडीयो सुचवत आहे Happy

वॉल स्ट्रीट जर्नल वर जास्त करून स्कँडल्स का भांडा फोड टाइप लेख असतात. गोल्ड मन साक्स ची अनंत पैसे कमाउ लफ्डी होउन गेल्यानंतर तिथे कळतात. टिप्स हव्यातर रेडिट वर आर/ वॉल स्ट्रीट बेट्स जॉइन केले तर उप योग होईल.

व्हें चर कॅपिटलिस्ट ग्रूप बनवून स्टारटप मध्ये पैसे गुंतवले तर एकदम घबाड मिळण्याचा योग आहे. पण अभ्यास हवा.