ते म्हणाले, असावी कुठेतरी भक्ती वगैरे..

Submitted by सांज on 22 March, 2021 - 05:15

ते म्हणाले, असावी कुठेतरी
भक्ती वगैरे
मी म्हणाले, नसावी अशी काही
सक्ती वगैरे

हात जोडले तरच म्हणे प्रसाद
मला ठकवण्याची नवी क्लृप्ती वगैरे

म्हटलं आहे माझ्यात जिद्द अजून
आणि पुरेशी शक्ती वगैरे

डोळ्यांत असता स्वप्नं साजिरी
हवीये कशाला मुक्ती वगैरे

स्वैर अलवार फुलपाखरू अन्
झुळझुळ झर्याची वृष्टी वगैरे

'इषावास्यम् इदम् सर्वम्'
गुणगुणते ही सृष्टी वगैरे

धूप-दीप ही असतात सुरेख
मंजूळ आरत्या,
नि सुरस चमत्कारिक गोष्टी वगैरे

अतिरेक नसावा परंतू त्यांचा,
खर्या भक्तीची हीचं युक्ती वगैरे

सृजनात वसे तो देव माझा आणि
तिथेचं माझी तृप्ती वगैरे..!!

सांज

chaafa.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता.
अशोक नायगावकर यांची आठवण झाली.

छान. मला वैभव जोशींची कविता आठवली -
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे ...