कुसुम - Treasuring Flowers

Submitted by अक्षता08 on 21 March, 2021 - 01:09

काही वर्षांपूर्वी घरी आलेल गुलाबाच फूल एका पुस्तकात सहज ठेवून दिल होत. नंतर ते पुस्तक चाळताना अचानकपणे सापडलं. जरी त्या फुलाचा सुगंध नाहिसा झाला होता परंतु फुलाच्या सौंदर्यात काही कमतरता जाणवली नाही. (टवटवीत फुलासारख सौंदर्य नसलं तरीही सुरेख दिसत होतं). त्यानंतर इतर फुला-पानांबरोबर हाच प्रयोग केला. जुन्या व जाड्या पुस्तकांमध्ये ३-४ आठवड्यांकरता फूलं ठेवून दिल्यावर ही फूल-पान कित्येक काळाच्या ठेवीसाठी तयार होतात.
ह्या सुकलेल्या फुलांचा कसा वापर करायचा ते आपल्यावर आहे किंवा ती तशीच पुस्तकांमध्ये किंवा वह्यांमध्ये ठेवून द्यावी. कधीतरी जुन पुस्तक चाळताना ते मिळालेल फूल जुनी ठेव मिळाल्यासारखा आनंद देऊन जातं.

जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे फुला-पानांनही लागु होत. काहींचा रंग सुकल्यावरही टिकून राहतो, काहींचा फिकट होतो तर काहींचा रंग अगदी बदलून जातो.

Though they do not smell afterwards they look beautiful in their own wayIMG_20210321_101736.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
flower pressing ही एक पारम्परिक जपानी कला (ओशिबाना) आहे. ओशिबाना म्हणजे pressed and dried out फुले पाने वापरून बनविलेली कलाकृती.
(सध्या आम्ही 'ओशिबाना केझ' अवस्थेत असून आम्हा मायलेकींचे नवीन उद्योग सुरु आहेत. जमलं तर टाकते इथे. किंवा एखादा धागा लिहिते ओशिबाना बद्दल)

हे कुठे विचारू ते न कळाल्याने इथेच विचारते.
मी पिंपळाची 3-4 झाडावरून गळून पडलेली पाने, जाळी कशी पडते ते मुलांना दाखविण्यासाठी पुस्तकात ठेवली. 2 वर्षे झाली असतील पण अजून जाळी पडत नाहीये. काय चुकले असेल?

@वावे, @mrunali.samad
धन्यवाद Happy

@मनिम्याऊ
होय. Flower pressing Technique
(flower pressing ही एक पारम्परिक जपानी कला...")
ह्याबद्दल माहित नव्हतं मला. Google करायला लागेल
(जमलं तर टाकते इथे. किंवा एखादा धागा लिहिते)
नक्की टाका. आवडेल त्याबद्दल वाचायला Happy

@चैत्रगंधा
( 2 वर्षे झाली असतील पण अजून जाळी पडत नाहीये. काय चुकले असेल?...")
पुस्तक जून असल्यास जाळी पटकन पडते परंतु @मनिम्याऊ ह्यांनी सांगितलेली पध्दत जास्त सोप्पी आहे

@जेम्स बॉन्ड
(तुम्ही लावलेले चित्र अफाट आहे.")
धन्यवाद Happy Happy
Mobile Wallpaper म्हणून शोभून दिसेल