कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीने घातलेल्या कपड्यांवरून तिला जज करणं अजूनही चालू असेल असं नव्हतं वाटलं.
>>
धाग्यावरच्या चित्रात मुलीने साडी घातली आहे आणि मुलाच्या आईने चुडीदार Happy

धमाल किस्से आहेत एकेकाचे....
माझी तर एका मुलीच्या दोन मामांनी मिळून जोरदार viva घेतली होती. मी त्यावेळी मुंबई मध्ये एका IT कंपनीत काम करत होतो आणि तीची parent company एक नामांकित इंजिनिअरिंग फर्म होती.
माझी चुलत बहीण डोंबिवलीला रहात होती.एका रविवारी मी माझ्या मित्राकडे कल्याण ला गेलो होतो तर जाता जाता बहिणीला भेटावे म्हणून सहजच तिच्याकडे गेलो. मेव्हणे बाहेर गेलेले होते आणि तासाभराने येणार असल्याने मी आराम करत पडलो आणि बहीण तिच्या काही कामानिमित्त बाजारात बाहेर गेली.तिने परत आल्यावर सांगितले की त्यांच्या building madhe ek मुलगी आहे आणि ती घरी आलेली आहे (मुलगी कुठे तरी बाहेर इंजिनिअरिंग किंवा काहीतरी करत होती) तर पाहून घे कारण ती दुसऱ्या दिवशी परत जाणार होती. मी पहिल्यांदा जरा resist केले कारण माझा एकंदरीत अवतार (मुंबईच्या गर्मीला साजेसा पातळ टी शर्ट, sandal,अर्धवट झालेली झोप आणि weekend mule न केलेली दाढी). त्यात मुलीची माहिती वगैरे काहीच नव्हती(माझे वडील आधी गुण,पत्रिका,घरा दाराची थोडी माहिती पाहायचे आणि जमत असेल तरच पुढे जायचे). पण बहिणीचे म्हणणे पडले की मुलगी तिच्या रोजच्या पाहाण्यातली आहे आणि त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पसंत असेल तर पुढे पाहू..शेवटी हो नाही करता मेव्हणे आल्यावर आम्ही गेलो.
खरी गोष्ट अशी होती की मुलीला पाहायला कोणीतरी दुसरे पाहुणे नुकतेच येवून गेलेलं होते.त्यामुळे सगळा setup readych होता..including tiche दोन मामा.जे decider hote. बहिण,मेहुणे,मुलीचे आई वडील सगळे एकदुसऱ्याना ओळखत असल्याने मामा आणि मी असे तीनच लोक वेगळे होतो. त्यामुळे दोन विरुद्ध एक असेच समीकरण होते.. त्यात आधीच्या कार्यक्रम काही व्यवस्थित गेलेला नसावा...असो.
Survat अगदी परिचय पत्र देण्यापासून झाली. मी ते एकदा पाहिले आणि बहिणीला सर्व माहिती असल्याने ठेवून दिले.एकडे मेहुण्यानी माझा biodata मुलीच्या वडिलांना दिला आणि जुजबी माहिती सांगण्यास survat केली.जसे इंजिनिअरिंग फर्म चे नाव आले तशी मोठ्या मामांची tube पेटली (मला नंतर कळले की ते ITI hote आणि कुठल्यातरी कंपनीत कामाला होते). त्यांनी पुढचे tech,infotech काही एकलेच नाही आणि प्रश्नाचा भडिमार चालू केला..कुठली शिफ्ट? शिफ्ट allowance kiti? OT मिळतो का? company chi bus service aahe का?, permanent job aahe ki apprentice? Ek na hazar.. मी आपला कसाबसा IT ला धरून उत्तरं देत होतो म्हणजे ganeral शिफ्ट आहे, OT नसतो vagire..पण ती mamachya scale मध्ये बसत नव्हती...शेवटी मेहुण्याणी त्यांना समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला की तो IT madhe aahe..shop floor var नाही...पण तो पर्यंत मामांनी त्याच्या supervisor cha राग माझ्यावर काढला होता किंवा वर सांगितलेल्या माझ्या अवतरावरून त्याचा काहीतरी ग्रह झालेला असावा.. Lol

तेवढ्यात मुलगी शेजाऱ्यांच्या घरातून तयारी करून त्यांच्या घरात आली. आधीच मुंबई मधली छोटी घरे (एक रूम किचन) त्यामुळे सगळा ओपन मामला होता.
आता विषय थोडा बदलायचा म्हणून माझ्या मेहुन्यानी मला कंपनीने परदेशी पाठवले होते आणि मी महिन्याभरापूर्वी आलो असे सांगितले. (मी ४ महिन्यांची एक US onsite assignment संपवून नुकताच आलो होतो). जसे अमेरिकेचे नाव आले तसे दुसरे मामा पेटले Light 1 .कधीही न पाहिलेल्या अमेरिकन sanskriti वर त्यांनी तोंडसुख घ्यायला survat केली. दारू, pub,मुलींचे कपडे, मुले मुली एकत्र राहणे,फिरणे etc..etc आणि सरळ मला विचारले तुम्ही नाही ना असे काही केले? तेवढ्यात मुलगी फराळाच्या डिश घेवून आली. माझी अवस्था तर पाहण्यासारखी झाली होती..मी काय उत्तर देणार? तरी मामा insist karat होते..की सगळे माहीत असलेले बरे.. मुली साठी पण एकदम ऑकवर्ड situation झालेली Blush . तीचे वडील मात्र बिचारे निमूटपणे सगळा तमाशा पाहत होते..शेवटी मी नाही म्हणून सांगितले आणि मगच मामांनी मला मुलीला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली. आता माझीच एवढी सत्वपरीक्षा झाल्याने आणि मुलीचा विचार करून (एक तर ती मुंबईच्या उकाड्यात २-३ तास साडी नेसून बसलेली असावी त्यात अचानक दुसरा मुलगा येणार म्हणून पुन्हा थोडी तयारी) मी एक ही प्रश्न विचारला नाही..माझ्या ताईला आणि मेहुण्याना सगळे माहीत आहे त्यामुळे मला काही विचाायचं नाही असे सांगितले. मामांमुळे त्यांची पण अवस्था करायला गेलो गणपती आणि झाला मारुती अशी झाली होती. माझ्या उत्तराने त्यांना बरे वाटले.
शेवटी एकादाची तिथून सुटका झाली आणि मी निःश्वास सोडला..
नंतर बहिणीला सांगितले की मुलगी छान वाटली पण जन्मभर तिचे मामा झेपणार नाहीत.त्यामुळे प्रकरण तिथेच संपले. मुलीकडून होकार होता म्हणजे मी मामांची viva एकंदरीत clear केली होती Lol

थोडा ट्रॅजेडीतून जन्मलेला कॉमेडी प्रसंग. (विषय सेन्सिटिव असल्याने सांगावा की नाही असा संभ्रम होता पण सांगून टाकतो)

फ्रेंड सर्कलमधल्या एका मारवाडी मित्राचे तुलनेने लवकर लग्न झाले. म्हणजे तो वीशीचा आणि मुलगी बेअरली १८ ची वगैरे. खानदानी श्रीमंती आणि घरचा मोठा बिझनेस आणि वडीलधारे म्हणतील ती पुर्व दिशा असा प्रकार असल्याने शिक्षण किती?, वय लहान नाही का? वगैरे प्रश्न कोणाला पडले नाहीत आणि त्या सर्कलमध्ये कमी वयात लग्न ही कॉमन गोष्ट होती.
लहान वय, एकुलती एक, प्रोटेक्टेड वातावरणात वाढल्याने दुनियादारीची जाण नसावी की लग्नाला बळजबरीने तयार केले असावे म्हणून की काय मुलीने पहिल्या रात्रीचा आणि एकंदर शारिरिक सबंध प्रकाराचा एवढा धसका घेतला की.. तिचे सायकॉलॉजिकल मेल्टडाऊन, मग प्रचंड डिप्रेशन आणि नंतर महिन्याभरातच लग्न मोडण्यापर्यंत गोष्ट गेली. लग्नाच्या एक-दोन दिवसानंतर माहेरी गेलेली मुलगी पुन्हा सासरी आलीच नाही. अर्थात समाजात नातेवाईकांत लग्न मोडण्याची कारणे वेगळी सांगितली गेली.
तर हा झाला ट्रॅजिक बॅकग्राऊंड.
ह्या प्रसंगानंतर आमच्या मित्रपरिवारात त्यावेळी ह्या प्रकरणावर गहन चर्चासत्रे झडली. वर्षभरानंतर आमच्याच फ्रेंड सर्कलमधल्या दुसर्‍या (हा पण मारवाडीच) एका मित्रासाठी, जो स्वभावाने सालस, शांत, अभ्यासात हुशार वगैरे होता त्याला मुली पाहणे वगैरे चालू झाले. तर आमच्या ह्या सालस मित्राने पहिल्याच कांदेपोह्याच्या कार्यक्रमाच्या वेळी गच्चीवरच्या बोलण्यात मुलीला 'तुला सेक्स मध्ये ईंट्रेस्ट आहे ना?' असा प्रश्न विचारून बाँब टाकला. त्याचे तसे विचारणे आजिबात न आवडल्याने मुलीनेही लगोलग बैठकीत येऊन सगळ्यांसमोर रडतरडत हा असे म्हणाला म्हणून सांगून टाकले. त्यानंतर दोन्ही घराण्यातल्या वडिलधार्‍यांनी आमच्या सालस मित्रावर जी काही खानदानी डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन घेतली त्यातून हा आमचा मित्रच डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आली.

प्रदीपडी >>> काय घनघोर प्रसंग आहे हा! Lol

बर्गा >>> असं काहीतरी सुद्धा होत असेल असं इमॅजिनही नव्हतं केलं. पहिल्या केसमधे तर ट्रॅजेडीच जास्त वाटली.

हो खरे तर दोन्हीही प्रसंग दुर्दैवी आहेत. मोठ्यांच्या कमी वयातच मुलांची लग्ने ऊरकण्याच्या निर्णयामुळे चार ईनोसंट मुले लहान वयात ऊगीचच नको त्या मेंटल अ‍ॅगनीतून गेली. ह्याचा त्या मुलांवर लाँग टर्म सायकोलॉजिकल ईंपॅक्ट झाला असेल तो वेगळाच.

खानदानी डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन म्हणजे.. शिक्षण बंद करून लहान गावातल्या काका-मामाकडे रहायला पाठवणे, त्याच्याशी फार सलगीने न बोलणे, (हे निर्णय मोस्टली 'खानदानकी ईज्जतके ठेकेदार' असे आजोबा वगैरे लोक घेतात) त्याला बघून लोक काही बोलले तर नाचक्की होईल म्हणून समारंभांना न बोलावणे असे. म्हणजे अगदी क्राईम वगैरे केल्यानंतर मिळते तशी ट्रीटमेंट.
त्याकाळी मोबाईलही नव्हते त्यामुळे मित्र परिवाराशी त्याचे भेटणे बोलणे सुद्धा सहा आठ महिन्यातून एकदा वगैरे होई. हा मित्र मग त्याच्या मामाच्या लहान गावातच सेटल झाला. आता तिथेच त्याचा स्वतःचा बिझनेस वगैरे आहे, पुढे लग्नही झाले पुन्हा शहरातल्या मोठ्या परिवाराशी जुळूनही गेला पण आयुष्य बदलून गेले ना कायमचे. मित्र अतिशय शांत स्वभावाचा असल्याने त्याने फार प्रतिकार न करता झाले तसे अ‍ॅक्सेप्ट केले.

पहिल्या प्रकरणातल्या मित्राचेही यथावकाश दुसरे लग्न झाले त्याचेही सगळे सुरळीत झाले. दोन्ही मुलींचे काय झाले ते मात्र माहिती नाही...पहिल्या प्रकरणातल्या मुलीला सायकोलॉजिकल ईश्यूज आधीपासूनच होते जे घरच्यांनी लपवून ठेवले होते हे नंतर कळाले.
कमी वयात लग्नाची मानसिक तयारी नसणे, मॅचुरिटीची कमतरता आणि सहजीवन चालू करण्यापूर्वी त्यानुषंगाने मिळायला हवे ते शिक्षण न मिळणे हेच मुख्य ईश्यू होते दोन्ही प्रकरणात.

एकसे एक किस्से Lol
इथल्या बऱ्याच किश्यांत आणि माझ्या निरीक्षणातही पाहतो की आईबाप पोराचे किंवा पोरींचे कौतुक करताना थकत नाही. आपले नाणे खणखणीत असेल तर का गरज पडावी अशा प्रचाराची>>>> माझे लग्न ठरताना आमच्या घरातले नेमके उलट वागत होते. भावी सासऱ्यांनी मुलाचे कौतुक करायला सुरूवात केल्यावर बाबांनी लगेच सांगून टाकले कि माझी मुलगी तुमच्या मुलासारखी काही १०वी-१२वीला मेरीट मधे आलेली नाही. सासूबाईंनी विचारले स्वयंपाक येतो का त्यावर मी नाही सांगितले तर मोठ्या भावाने चपात्या म्हणजे देशांचे नकाशे करते असे सांगितले. त्यांच्या घरी गेल्यावर बाबांनी मुलाची सगळी कागदपत्रे, कुठे-काय काम करतो त्याचे पुरावे मागितले. ते त्यांनी आम्ही काही खोटे बोलत नाही म्हणत दाखवलेही. त्यावर आमच्या मुलासाठी डॅाक्टर-इंजीनियर मुली सांगून आल्या होत्या असे म्हणाले तर आई म्हणाली मग आमच्याकडे का आलात, त्यातलीच एखादी पसंत करायला हवी होती. तिथून निघताना माझी मुलगी बोलायला माझ्यासारखीच आहे असेही सांगून आली. पुढे गोष्टी जुळत गेल्या पण सासूबाईंनी चपातीचा असा काही धसका घेतला होता कि लग्नानंतर १-२ महिन्यांनी चपाती करायला येणाऱ्या मावशी आठ दिवस रजेवर होत्या तेव्हा मी करणार नाही आणि तूही करू नकोस म्हणत बाहेरून चपाती आणली.

खानदानी डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन म्हणजे.. शिक्षण बंद करून लहान गावातल्या काका-मामाकडे रहायला पाठवणे, त्याच्याशी फार सलगीने न बोलणे, (हे निर्णय मोस्टली 'खानदानकी ईज्जतके ठेकेदार' असे आजोबा वगैरे लोक घेतात) त्याला बघून लोक काही बोलले तर नाचक्की होईल म्हणून समारंभांना न बोलावणे असे. म्हणजे अगदी क्राईम वगैरे केल्यानंतर मिळते तशी ट्रीटमेंट.>> Sad

माझ्या मैत्रीणीने सांगितलेला किस्सा. हा तीच्या सोबत घडलेला. तीला जेव्हा स्थळ पाहायला सुरवात केली त्या वेळी पहील स्थळ आल पत्रिका जुळली आहे मुलीला घेवून या असा मुलांकडून निरोप आला. तीच्या बाबांनी आपल्या भावाला सांगितलं की तू पाहून येशील का? कारण ते सेम शहरी रहायचं. काका पाहून आले आणि मैत्रीणी च्या बाबाना सांगितलं तू मुलीला घेवून यायला हरकत नाही. मैत्रीण आणि तीचे आई बाबा तीघ गेले मुलाच्या घरी. तीचे काका काकू ही आले. त्या घरातील स्त्री वर्गाने मुलीला प्रश्न वगैरे विचारले बाबांनी विचारल मुलगा कुठे आहे? जो तिथेच बसला होता. मुलाच्या आईने सांगितलं हाच मुलगा आहे. तो मुलगा मतिमंद होता. आई बाबा मैत्रीण शॅाक झाले. त्यांना काय बोलाव हे सुचल नाही. ते काकांच्या घरी आले तीच्या बाबांनी भावाला विचारल मी तुला सांगितलं होत ना पाहून ये. तर काका बोलले त्यांची परिस्थिती चांगली आहे आणि तुझी मुलगी सुखी राहील. तीचे बाबा काही बोलले नाहीत भावाला. मला माहीत नाही हे इथे लिहावे की नाही पण असे ही प्रसंग घडतात. मैत्रीणीचे त्यांच शहरी लग्न झाले दुसरा मुलगा. आणि तीचे काका प्रत्येकाला सांगायचे की चांगल स्थळ होत पण मुलीने नकार दिला.

मला मुली बघायला जायची गरजच पडली नाही प्रेम विवाहामुळे. परंतु हा कार्यक्रम आणि नंतर सीसीडी मध्ये भेटणे वगैरे मी जबरदस्त एन्जॉय केले असते असे वाटते. Actual लग्न आणि संसारात आपटी खाल्ली असती हे नक्की (बायको आहे ती सांभाळून घेत्ये मला म्हणून चाललंय). पण तरी कापो वगैरे करायला हवे होते असे आता वाटते.

प्रदीपडी - भयानक किस्सा आहे! तुम्ही काम करत होतात त्या कंपनीची शीर्ष (नामांकित इंजिनिअरिंग ) फर्म, जर ल आणि ट असेल, तर मी त्या पहिल्या मामांचा राग अगदीच समजू शकतो. कारण मी एकेकाळी त्या नामांकित इंजिनिअरिंग फर्ममध्ये होतो आणि तिथे भयानक वातावरण पाहिले आहे. माझा जवळचा मित्र पुढे तुमच्याच आय टी कंपनीत लागला तेव्हा मला जरा धास्तीच होती. पण तिथले वातावरण वेगळे आहे हे मला त्याच्याकडून समजले.

>> मुलगी छान वाटली पण जन्मभर तिचे मामा झेपणार नाहीत.... मुलीकडून होकार होता

दोन्हीकडून होकार होता. मामा लोक फक्त कांपो पुरते असतील तर पुढे जायला हरकत नव्हती असे वाटते. परंतु पुढे मामा लोकांचा संसारात नेहमीच हस्तक्षेप होत राहिला असता तर ते मात्र नक्कीच त्रासाचे झाले असते. अर्थात निर्णय तुम्ही परिस्थितीनुसारच घेतला असणार म्हणा.

>> काका बोलले त्यांची परिस्थिती चांगली आहे आणि तुझी मुलगी सुखी राहील

रे देवा! Sad

@मी_अनू
ओह
इतकी आवडली?मग नीट सेटिंग लावून ठेवायला हवे होते मी पुण्यात नोकरी बघतो, तोवर माझ्यासाठी थांब म्हणून Happy

ही साधारण ९८-९९ सालची गोष्ट आहे. त्याकाळी मोबाईल इतके वापरात नव्हते.

प्रदीपडी - भयानक किस्सा आहे! तुम्ही काम करत होतात त्या कंपनीची शीर्ष (नामांकित इंजिनिअरिंग ) फर्म, जर ल आणि ट असेल,
मी त्याच कंपनीत आयटी मध्ये आहे. सुदैवाने माझ्यावर प्रदीपडी सारखा प्रसंग ओढवला नाही.

योगी Happy

ल आणि ट मधील किस्से ह्यावर एक वेगळा धागा होऊ शकेल.

@ harchand, योगी ९९,
तुमचा गेस १००% बरोबर आहे Lol . मलाही नंतर त्या इंजिनिअरिंग फर्म मधले बरेच किस्से कळाले म्हणूनच मी नाव टाकले नव्हते....
,@ अतूल : मामा जरी कापो इतके असले तरी शेवटी काही ना काही कारणांनी संबंध येतच राहतात पुढे. त्यामुळे मी नाही म्हणालो. आणि मी सांगितल्याप्रमाणे मुलीचे वडील फारच अबोल होते..म्हणजे ह्या मामा लोकांनी पुढे ही काहीतरी ढवळाढवळ केलीच असती..

माझ्या भाच्यासाठी मुलगी पाहायला गेलो होतो. त्या काळी मुलगी पाहणे म्हणजे मोठाच सोहळा होता. राज्यांची भविष्ये लग्नसंबंधातून ठरत असत. साहजिक कार्यक्रम सुद्धा बरेच दिवस चालायचा. तर माझा भाचा आणि त्याची होणारी बायको नदीकिनारी फिरायला म्हणून गेले. तिथे त्यांना काठ्यांचा आवाज आला. तसे तर भाचेबुवा कमालीचे भित्रे.. पण होणारी बायको सोबत होती म्हणून धाडस आणि शायनिंग दाखवणे तो टाळू शकला नाही. दोन लेकरं काठ्यांनी खेळत होती, त्यातली एक आर्या म्हणून ह्याच्या होणाऱ्या बायकोची लहान बहीण होती. तर दुसरा एक कसायाच्या घरचा पोर. कसायाच्या पोराने आर्याचे लक्ष नसताना तिच्या पाठीत काठीच हाणली. तर हे राजपुत्र लगेच तलवार परजून उभे.. कसायाच्या पोराने काही काठी उगारली नाही, पण यानं त्याच्या गालाला तलवार लावून बारीक जखम केलीच. आर्याने चिडून जरा झटापट केली, आणि आर्याची पेट नायमेरिया आली आणि तिनं भाच्याचा हात धरला कि हो जबड्यात.. संधी साधून आर्याने जशी तलवार उचलली भाचेबुवा गळपातले. रडू लागले. एवढ्यात त्याची हीनारी बायको मात्र थांबा थांबा करत होती बिचारी.

टिरियन Lol

तुमच्या होणाऱ्या भाचे-सुनेचा भाऊ रॉब हा "तांबड्या विवाहास" गेलेला असताना झालेली गम्मत पण सांगा.

मी एक मुलगा बघायला गेले होते त्याच्या घरी.दोघांची उंची सारखी आहे हे आधी माहित होतं. त्याने उंची जास्त लिहिली असावी माहितीमध्ये. पण त्याला भेटल्यावर तो बुटका वाटत होता माझ्यापेक्षा.माझी उंची ५' ९'' आहे. माझ्याकडे वर बघून बोलत होता. मला हसूच आवरेना.

उंची हा deciding factor होऊ शकतो, खरं तर असायचं कारण नाही.

आमच्या मित्राच्या बहिणीला एक स्थळ सांगून आले होते, सगळं अनुरूप होतं. पण मुलगी मुलापेक्षा एका इंचाने उंच होती. पण त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, तिलाही मुलगा आवडला होता. दोघं आधी ठरवून बाहेर एक-दोनदा भेटले आणि मग दोघांनी घरी होकार कळवले आणि पुढची बोलणी करायला आई वडिलांनी भेटा असे सांगितले. पण या उंचीच्या फरकाचा दोन्ही घरच्या लोकांनी खूप issues केले. तिला मुलाच्या आईनी फोन करून आम्हाला ना नाही पण मग त्याच्याबरोबर असताना तू हाय हील चपला घालायच्या नाहीस, थोडं झुकूनच चालायचं कारण मग जोडा चांगला दिसणार नाही, केस वरती बांधायचे अशी उंची वाढवणारी हेअरस्टाईल साखरपुडा, लग्न किंवा बाकी कुठेच करायची नाही अशा कायकाय अटी घालायला लागल्या. इकडे हिच्या आईनेही बुटका नवरा शोभणार नाही, नातलग काय म्हणतील वगैरे बोलायला सुरवात केली.
मुलगा-मुलगी दोघे वैतागले. त्यांनी समजावयाचे प्रयत्न केले, मित्राने सांगून पाहिले पण दोन्ही घरचे ऐकेनात. मग दोघांनीही सामंजस्याने एकमेकांना 'गुड लक' विश करून थांबायचा निर्णय घेतला.

उंची हा deciding factor होऊ शकतो, खरं तर असायचं कारण नाही. >> नक्कीच .पण मी अपेक्षा 'माझ्या उंचीइतका किंवा जास्त' अशीच लिहिली होती.

>>>>>> उंची हा deciding factor होऊ शकतो, खरं तर असायचं कारण नाही. >

उंची/ बांधा/ रंग/ वजन /केस लांब किंवा आखुड असणे/ दाढी-मिशा असणे किंवा नसणे/चष्मा असणे किंवा नसणे/ठराविक गावा तील स्थळ हवे असणे /नोकरी किंवा व्यवसायाविषयी काही ठराविक अपेक्षा असणे यातला कोणताही (आणि कितीही) निकष असायला काहीच हरकत नाही. पण ठरवून लग्न करताना कांदेपोहे करायच्या आधी हे निकष स्पष्ट करायला हवेत असं माझं मत आहे

आमचे कांदेपोहे झालेच नाहित. एक वर्ष चॅटिन्ग,(एओएल , याहु मेसेंजर) फोनाफोनी करुन मग लग्न केले.
पहिल्या वेळी घरी तो जेवायलाच आला, ते पण लग्नाच्या एक आठवडा आधि.
माझ्या मैत्रिणीला एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाचे स्थळ आले (तिथेच लग्न झाले म्हणुन नाव सांगत नाही.)
ती साडी वगैरे घालुन मस्त जुहुला गेली. त्यांना ते डायरे़क्ट बाहेर टेरेस वर घेउन गेले. तिथे स्विमिंग पुल होता आणि सासु मस्त
स्विमींग ड्रेस (बिकिनी नाही नशीब!), आणि मुलगा आणि वडिल हाफ चड्डीत होते.
अभिनेत्री मात्र नव्हती, शुट साठी बाहेर गेली होती. दोघांनी पसंत केले पण. आता २२ वर्षे झाली लग्नाला १४ मार्चला.
सासुही एकदम हौशी आहे, ती नवर्याची सावत्र आई (आई लहान्पणीच गेली) त्यामुळे दोघी सासु सुनेपेक्षा मैत्रिणीच जास्त आहेत.

हायझेनबर्गने मारवाडीच्या लग्नाचा किस्सा सांगितला तो एकदम पटण्याजोगा आहे. माझ्या एका मारवाडी मैत्रिणीचे लग्न लहानपणीच ठरले
होते. इंजिनियरींग नंतर एक वर्ष जॉब केला आणि मग फॉर्मल लग्न झाले, खुपच खर्च केला. नंतर सासरने नकार दिला म्हणुन जॉब सोडला. आता कुठेच दिसत नाही फेस्बुक व्हॉट्सॅपवर वगैरे. दुसरीचे लग्न असेच १६व्यावर्षी ठरले, पण मग त्यांचा व्यापार वगैरे वाढला आणि त्यांना पुर्वीची सोयरिक नको होती म्हणुन त्यांनी दुसरीकडे तिचे लग्न ठरविले पण समाजात नावे ठेवतिल म्हणुनआई वडिलांनीच त्यांना पळुन जाउन लग्न करायला लावले.
म्हणजे त्यांनी पळुन जाउन लग्न केले पण पळुन जाउन लग्नाची सर्व अरेंजमेंट आई वडिल आणि सासु सासर्यांनी मिळुन केली होती.

उंची हा deciding factor होऊ शकतो, खरं तर असायचं कारण नाही.
>> माझी चुलत काकी काकांपेक्षा चक्क ४/५ इन्च उन्च आहे. ती त्या काळातच ६ + असल्याने तिच्याकडे ऑप्शन्स खुप कमी असावेत.
त्यांचे कांदेपोहे ६० मध्ये झाले असणार. इतर काही प्रॉब्लेम येत नाही.
परिणाम फक्त एक होतो की दोघांचे एकत्र फोटो कधी पहायला मिळत नाहीत, असले तर एक कोणतरी बसला असतो.
बाकी दोघे एक्मेकांना परफे़ट मॅच आहेत.

माझ्यावर कांदे पोहे वेळ आली नाही... पण माझी ऊंची ही 5'10" असल्याने मला खुप अडचणी येतील अशी भविष्यवाणी सर्व लोकांनी केली होती... पण मिळाला मला 6'3" नवरा... मी अगदी 3 इंची हील्स ही घालु शकतेय...
बाकी धागा स्लो झाला....

ओळखीतल्या एका मुलाला कांपो कार्यक्रमाला जायचे होते. मुलगा आणि त्याचे आईवडील जाणार होते. सोबतीला त्याने बारावीतल्या आपल्या लहान चुलतभावाला घेतले. मुलगा खुपच हडकुळा आणि लहान भाऊ कब्बडीपटु पहिलवान. मुलीच्या घरी पोहचल्यावर मुलीकडच्यांना कब्बडीपटुच पहायला आलेला मुलगा आहे असे वाटले. सगळे त्याच्या सरबराई मागे लागले. आणि खऱ्या मुलाला कोणी विचारत नव्हते. तो बसला कोपऱ्यात. विशेष म्हणजे आतल्या रुममधुन मुलगी हळुच याच्याकडे पहात होती. कब्बडीपटुही खुष. शेवटी मुलाच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला आणि तिने कब्बडीपटुला 'तुझा बारावीचा क्लास किती वाजता आहे? असा प्रश्न विचारला' तेव्हा सगळा उलगडा झाला.

Pages