कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत" >>> Lol हे खतरनाक आहे.

पुलंच्या भाषेत "एरव्ही कुत्र्याला हाड् म्हणायची हिंमत नसलेली" सामान्य माणसे एखाद्या प्रसंगात जेव्हा त्यांना तात्पुरते का होईना उच्चासन मिळते, मानाचे स्थान मिळते तेव्हा इतरांना काय तुच्छपणे वागवतात याची उदाहरणे लग्नाच्या कार्यक्रमांत अनेकदा सापडतात. पूर्वी "मुलाकडचे" यात जास्त होते. आता बहुधा चित्र उलटे आहे Happy

आमच्या विद्यापीठाच्या डिपार्टमेण्ट मधे एक स्टाफ मधला माणूस एरव्ही "मऊ मेणाहुनी" व्यक्तिमत्त्व असलेला. एकदम फ्रेण्डली. त्याच्याकडे बहुधा स्टोअररूम सारखी काहीतरी एक एक्स्ट्रा जबाबदारी असे. सर्व विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी एकदा त्याची सही लागे - काहीतरी स्टोअरमधून घेतलेले तुमच्याकडे काही बाकी नाही असा क्लिअरन्स देणारी.. एरव्ही सहज भेटणारा, गप्पा मारणारा तो त्या दिवशी जरा वेगळ्या रूबाबात असे. काहींना पटकन सही न देता "२ वाजता या" वगैरे करत असे Happy

"नारायण" मधला "जरा तुमची माणसे मोजता का म्हणजे पाने मांडायला सोयीचे पडेल" या प्रश्नाला केवळ मुलाच्या बाजूने आहे म्हणून "मी इथे मोजणी कारकून म्हणून नाही आलो" म्हणणारा मुलाचा काका या जोडकार्ड वाल्या आजोंबासारखाच Happy

जोडकार्ड किस्सा Lol
कमीत कमी शब्दात.>>>>>>>> किमान शब्दात कमाल अपमान

नाही .मार्केट मध्ये गेलो होतो.त्या चाचूजवळ कपडेच नव्हते. >> पुलं ज्याला 'ठप्पभंगिका योग' म्हणतात तोच हा. 'आमचे बाबा बाथरूमला नाही काही गेलेत, आत बसून चहा पितायत' - हेच आठवलं तो किस्सा वाचून.

जोडकार्डचा किस्सा इतक्या जणांना 'विनोदी' वाटला हा माझ्यासाठी या धाग्यावरचा सर्वात विनोदी किस्सा आहे Happy Sad

Pages