Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
अमृताक्षर, मनःपूर्वक अभिनंदन
अमृताक्षर, मनःपूर्वक अभिनंदन .. आणि खूप शुभेच्छा.
आजकल पांव जम़ींपर नही पडतें
आजकल पांव जम़ींपर नही पडतें मेरे
आनंद घ्या ह्या दिवसांचा
https://youtu.be/HiLs-dr4hoU
Submitted by निलुदा धन्यवाद
अशीच situation आहे.. प्रेमात पागल म्हणतात ते काही खोटे नाही
अमृताक्षर यावरून एक मोफत
अमृताक्षर यावरून एक मोफत सल्ला , बघ पटतंय का, आपण अरेंज मॅरेज केस मध्ये तसे अनोळखीच असतो एकमेकांना ( भावी वधू वर) त्यामुळे काही बाबतीतली आपली मतं किंवा some insecurities , अशा काही गोष्टी ज्यांत आपण कधीही compromise करणार नाही, असतील तर त्याची स्पष्ट कल्पना द्यावी. पण आपल्या अपेक्षाही प्रमाणात ठेवाव्यात, थोडं तुझं बरोबर थोडं माझं ठिके? असा स्टॅंड असावा. मला याचा उपयोग होतो अजूनही त्यामुळे झालं काय , जीयो और जीने दो अशी पॉलिसी तयार झालीये नकळत दोघांत Happy .
Submitted by भाग्यश्री१२३ >> अगदी पटलंय नक्की अमलात आणणार लग्नाआधीच सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून घेणार
खूप खूप शुभेच्छा !
खूप खूप शुभेच्छा !
Submitted by स्वान्तसुखाय >> धन्यवाद
थोडं तुझं बरोबर थोडं माझं
थोडं तुझं बरोबर थोडं माझं ठिके?" "जीयो और जीने दो " हे महत्वाचे आहे.
Submitted by vijaykulkarni >> होय खूप मुद्दे आहेत जे आता छोटे वाटतं आहे पण पुढे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतील नक्की बोलून घेईल त्यांच्याशी अशा विषयांवर.. धन्यवाद
अमृताक्षर अभिनंदन!
अमृताक्षर अभिनंदन!
तू स्पर्धा परिक्षा देत होतीस ना?
Submitted by किट्टु२१ >> हो ना अजूनही चालू आहे private job सांभाळत थोडा साईड बाय साईड..हवी ती पोस्ट मिळाली की प्रायव्हेट जॉब सोडणार..
अमृताक्षर, मनःपूर्वक अभिनंदन
अमृताक्षर, मनःपूर्वक अभिनंदन .. आणि खूप शुभेच्छा.
Submitted by जाई. >> धन्यवाद
धाग्याचे शीर्षक बदलावे का?
धाग्याचे शीर्षक बदलावे का?
अमृ, अभिनंदन! झम्पु
अमृ, अभिनंदन!
झम्पु
हा किस्सा आहे १९७० च्या आसपास
हा किस्सा आहे १९७० च्या आसपास घडलेला. कौटुंबिक परिस्थितीमुळे माझ्या आत्यासाठी वरसंशोधनाची जबाबदारी वयाच्या पंचविशीत बाबांवर आलेली. स्थळे शोधण्याची मोहीम जोरात चालू होती. त्यावेळची मोहीम म्हणजे वधू-वर सूचक मंडळांतून योग्य मुलांचे पत्ते आणायचे. पत्रे पाठवायची आणि उत्तराची वाट पहायची. इतक्या ठिकाणी पाकिटे / अंतरदेशीय पत्र पाठवणे परवडणारे नसल्याने पोस्टकार्डावरच सगळे पत्रव्यवहार चालू होते. आज पत्र पाठवले की २०-२५ दिवसात उत्तर अपेक्षित असायचे. असेच एक पत्र पुण्याला सदाशिव पेठेत पाठवले होते ज्याचे महिना उलटला तरी उत्तर आले नव्हते. मुलाची माहिती चांगली वाटल्याने या स्थळाबद्दल विशेष उत्सुकता होती. योगायोगाने दुसऱ्या एका कारणासाठी बाबांचे त्याच सुमारास पुण्याला जाणे झाले. काम झाल्यावर बाबा 'तो' पत्ता शोधत शोधत त्या मुलाच्या घरापाशी पोहोचले. जुन्या पद्धतीचे घर छान होते. चार पायऱ्या चढून ओसरीवर आरामखुर्चीत एक आजोबा पेपर वाचत बसले होते. बाबांनी पायऱ्यांशी थांबूनच विचारले "नमस्कार, मी ठाण्याहून आलोय. माझ्या बहिणीचे म्हणजे नलिनी केतकर हिचे टिपण पाठवले होते मागच्या महिन्यात. आपले उत्तर आले नाही म्हणून चौकशी..."
हे ऐकताना पेपरातून मान वर करून बाबांकडे पाहण्याचीही तसदी न घेता बाबांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आताच आजोबा उत्तरले, "तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत". बाबांनी खालूनच त्यांना नमस्कार केला आणि परत फिरले. या पुणेरी धड्यामुळे पुढच्या प्रत्येक ठिकाणी कटाक्षाने आपला पत्ता लिहिलेले जोडकार्ड पाठवायला मात्र सुरुवात केली.
>>>>>बाबांकडे पाहण्याचीही
>>>>>बाबांकडे पाहण्याचीही तसदी न घेता बाबांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आताच आजोबा उत्तरले, "तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत".
अर्र्र्र!!! पुणेरी तुसडेपणा+खवचटपणा+काटकसर देवा!!! मॅनरलेसपणा म्हणतात आमच्यात याला
वा! पुन्हा हा धागा वर आला आणि
वा! पुन्हा हा धागा वर आला आणि पुन्हा आपला अनुभव वाचताना मजा आली
धन्य आहेत आजोबा!
धन्य आहेत आजोबा!
जोडकार्ड म्हणजे?
जोडकार्ड म्हणजे?
प्रत्युत्तर देण्याकरता
प्रत्युत्तर देण्याकरता प्रीपेड कार्ड असावे गं.
दोन पोस्टकार्ड परफोरेशनने
दोन पोस्टकार्ड परफोरेशनने जोडलेली दुप्पट किमतीला मिळायची. एकावर आपण लिहायचं आणि पाठवणार्याचा पत्ता टाकायचा. दुसर्यावर आपला पत्ता टाकुन मजकूर कोरा ठेवून पोस्ट करायचं. पत्र मिळाल्यावर आपलं लिहिलेलं पत्र परफोरेशन वरुन फाडून कोर्या ठिकाणी मजकूर लिहुन ते उलट टपाली आपल्याला परत. बोलेतो पोस्टेज पेड आन्वलप विथ नो आन्वलप.
पूर्वी गणितात पोस्ट कार्डाचे १५ पैसे आणि जोडकार्डाचे ३० पैसे अशी १० कार्ड घेतली आणि १० रुपये दिले तर किती परत मिळतील अशी गणिते असायची म्हणून माहित
भारीच.
भारी किस्सा.
अच्छा, थँक्यु सामो,अमितव
अच्छा, थँक्यु सामो,अमितव
जोडकार्ड किस्सा
"पूर्वी गणितात पोस्ट कार्डाचे
"पूर्वी गणितात पोस्ट कार्डाचे १५ पैसे आणि जोडकार्डाचे ३० पैसे अशी १० कार्ड घेतली आणि १० रुपये दिले तर किती परत मिळतील अशी गणिते असायची म्हणून माहित" - मस्त रे अमित!
>>>>>>पूर्वी गणितात पोस्ट
>>>>>>पूर्वी गणितात पोस्ट कार्डाचे १५ पैसे आणि जोडकार्डाचे ३० पैसे अशी १० कार्ड घेतली आणि १० रुपये दिले तर किती परत मिळतील अशी गणिते असायची म्हणून माहित" >>>>>>>Happy मस्त रे अमित! (फेरफटका)
हो ना!! आठवणींना मस्त उजाळा मिळाला.
हो हो अशी गणिते असायची आणि
हो हो अशी गणिते असायची आणि ह्या पत्रांसाठी एक तारेचा आकडा मिळायचा, सगळा पत्रव्यवहार त्यात अडकवून ठेवता येत असे.
धागा आलाच आहे वर तर एक
धागा आलाच आहे वर तर एक गमतीशीर अनुभव सांगून टाकतो. मध्यंतरी घरच्यांनी सध्या कॅनडात जॉब करणाऱ्या मुलीचे स्थळ आणले तर मी नेहमीप्रमाणे व्हॅट्सऍपवर नमस्कार-चमत्कार करून गप्पा सुरु केल्या. थोड्या वेळातच स्वतःबद्दल सांगताना तिने सांगितले की I'm a trained vocalist. मला वाटले हे आपले शास्त्रीय संगीत असावे आणि मला त्यातले काही @@ कळत नसले तरी मी इकडचे तिकडचे बोलायला सुरुवात केली. तिने एक लॉन्ग पॉज घेऊन सांगितले की ती पाश्चात्य संगीताबद्दल बोलत आहे. मग मी पण एक लॉंग पॉज घेतला आणि गाडी दुसरीकडे वळवून लवकरच संभाषण संपवले. थोडक्यात जादा फॉर्मात आल्यास पचका होऊ शकतो म्हणून समोरच्याचे पूर्ण ऐकून घेत जावे.
हे जोडकार्डातील एक कार्ड,
हे जोडकार्डातील एक कार्ड, परतीचे:
<< आपला पत्ता लिहिलेले
<< आपला पत्ता लिहिलेले जोडकार्ड पाठवायला मात्र सुरुवात केली. >>
त्यापेक्षा, यापुढे पुणेरी स्थळाचा विचारही नको, अशी सुरुवात का नाही केली?
अमितव, थँक्स.. मलाही हाच
अमितव, थँक्स.. मलाही हाच प्रश्न पडला होता, जोडकार्ड म्हणजे?
किस्सा मस्त..पुणेरी उद्धट्पणा काठोकाठ अगदी
कार्ड ह्या इंग्रजी शब्दावरून
कार्ड ह्या इंग्रजी शब्दावरून बनलेला जोडकार्ड हा मराठी जोडशब्द रोचक आहे. 'बसगाड्यांची' आठवण झाली.
>> बाबांचे बोलणे पूर्ण
>> बाबांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आताच आजोबा उत्तरले, "तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत".
ओह! आजोबा चार शब्दात खूप काही बोलून गेले. लक्षात राहील असा किस्सा आहे हा...
तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत
तुम्ही जोडकार्ड पाठवले नाहीत <<< कमीत कमी शब्दात...
माझ्या चुलत बहिणीकडे घडलेला
माझ्या चुलत बहिणीकडे घडलेला हा किस्सा आहे. जिजाजींच्या आतेभावाला पाहायला मुलीकडची मंडळी येणार होती. ताईकडे पाहण्याचा program ठरला होता..पण आधी तशी काही कल्पना नसल्याने त्या मुलाने खास कपडे आणले नव्हते.म्हणून ताई,जिजू आणि त्यांचा छोटा 4 वर्षांचा मुलगा दुपारी आतेभावाला घेऊन मार्केट मध्ये गेले..त्यांना बराच वेळ लागला. ईकडे मुलीकडची मंडळी आणि मुलगी ताईकडे पोचलेदेखील ..ताईच्या सासूबाईंनी फोन करून सागितले तसे ते सगळे कपडे घेऊन लगेच घरी आले..पण हॉल मध्ये पाहुणे बसले होते..म्हणुन ताई, जिजू आणि नवरा मुलगा मागच्या दाराने घरात शिरले..पण ताईचा मुलगा आणि या किस्स्याचा हिरो हॉल मधून घरात शिरला..लहान मुलगा दिसल्यावर मुलीच्या वडिलांनी सहज विचारले,"अरे देवांश बाहेरून खेळून आलास वाटतं.." त्यावर माझा भाचा चटकन् उत्तरला, " नाही .मार्केट मध्ये गेलो होतो.त्या चाचूजवळ कपडेच नव्हते.त्याने माझ्या बाबांचे कपडे घालून पण पाहिले पण त्याला झालेच नाही.म्हणून त्याच्यासाठी कपडे आणायला गेलो होतो."2 मिनिटे त्या हॉल मध्ये कोणालाच काय बोलावे सुचले नाही..आणि आतमधे ताई, जिजू आणि नवरा मुलगा यांनी डोक्यावर हात मारून घेतला
आतेभावाला पाहायला मुलाकडची
आतेभावाला पाहायला मुलाकडची मंडळी येणार होती. >> इथे मुलीकडची करा
Pages