कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी किस्सा नाही म्हणता येणार. पण मामाने माझ्यासाठी आणलेलं पहिलं वहीलं स्थळ!
मुलांचा बायोडाटा मला फॉरवर्ड केला.. वाचायला गेले तर माझी हसुन हसुन वेड लागायची पाळी आली..
मुलाच आडनाव वेताळ!
बरं झालं हे स्थळ बघणं वैगरे प्रकार पुढे गेला नाही.
नाही तर लग्नपत्रिकेत
भगत आणि वेताळ ! Uhoh

भगत आणि वेताळ ! >>> :हहपुवा:
मागे एकदा मायबोलीवर ' ... मालदे' नावाच्या मुलीचे '... देदिया' नामक मुलाशी लग्न झाल्याचे वाचले होते.

भगत आणि वेताळ
मालदे' नावाच्या मुलीचे '... देदिया' >> Rofl

तो एक काळ होता एकत्र कुटुंब हळहळू फुटत होतं पण काका,मामा,आत्या वगैरे लग्न, कांपो इत्यादी कार्यक्रमांत आपले हक्क(!) बजावून घेत. काही भाऊ/बहीण सिनिअर (१-२ वर्षं सुद्धा) असल्याचा हक्क बजावत. कार्यक्रम हाइज्याक करत कधी अती उत्साहाने/ त्यांच्या अनुभवाने (?)/ असूयेने.
आता डिजिटल युगाने थेट संवाद होतात. त्यात दोघे एकाच पिढीत असल्याने काहीही विचारत असतील पण अप्रूप नसतं.

भगत आणि वेताळ
मालदे' नावाच्या मुलीचे '... देदिया' >>>smiley36.gif

हा धागा खरेच स्ट्रेसबस्टर आहे. अफलातून किस्से आहेत एकेक.

काही किस्से वाचून वाटले की तिथल्या तिथे तोंडावर सणसणीत उत्तर मारायला हवे होते पण तेव्हा शक्य होत नाही हे अनुभवाने माहीत आहे. Happy Happy

20 वर्षांपुर्वीपर्यंत मध्यस्थ हे प्रकरण प्रचंड भावखाऊ होते.
आता डिजिटल युगानंतर करोना युगामुळे मध्यस्थ आजही असतील पण तितके भावखाऊ राहिले नसावेत.

मी भगत-भुतकर, कोल्हे-लांडगे, काळे-गोरे , शेळके-लांडगे, शेळके-कोल्हे, शेळके-गाढवे, झावरे-महाडिक, शेटे-महाडिक अश्या बऱ्याच लग्नपत्रिका पाहिल्या आहेत. हे एक जालावरून -
photo-2021-03-19-09-51-00

मी भगत-भुतकर, कोल्हे-लांडगे, काळे-गोरे , शेळके-लांडगे, शेळके-कोल्हे, शेळके-गाढवे, झावरे-महाडिक, शेटे-महाडिक अश्या बऱ्याच लग्नपत्रिका पाहिल्या आहेत>>> Lol Lol
PG ला असताना आमच्या वर्गात काटे आणि काटेखाये अशी जोडी होती.
आणखी एक जोडी फुलझेले आणि फुलबांधे botany ला होती.

एका कांपो कार्यक्रमातला मुलगा एमपीएससीची परीक्षा पास क्लार्क होता. मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा सांगितल्यावर याने धडाधड चालु घडामोडी, इतिहास भूगोल याबद्दल विचारायला सुरुवात केली. वेगळीच प्रश्नपत्रिका समोर आलेली पाहुन मुलगी गडबडलीच पण नंतर तो दुसरे प्रश्नच विचारत नाही म्हटल्यावर मुलीकडचे लहानमोठे सगळेच उत्तर शोधायचा प्रयत्न करायला लागले. मुलगा परत गेल्यावर मुलीकडे दोन दिवस त्याच्या प्रश्नांबद्दलच चर्चा सुरु होती.

वीरू Lol
कबड्डी पटू चा किस्सा पण भारीच.. कमाल धागा आहे हा.. Lol

माझ्या बाबांना खुपच लग्न जमवायची, लोकांना ह्या कामात मदत करायची, मध्यस्थ व्हायची आवड.
काहीही मोबदला न घेता, ओळखीतील लोकांच्या, मित्रांच्या मुला-मुलींच्या, नात्यातल्या मदत कराय्चे. फुकटचा त्रास.
बर, कधी कधी तर आमच्याच घरातच गोंधळ असायचा कारण आमचं घर मोठं. आई-बाबांची मनं मोठी. अगदी आमच्याच खर्चाने हे कर्यक्रम होत. ह्या असल्या समाजसेवेचा काहीही फायदा नाही. काही लोकं, धन्यवाद तर दूर पण त्यांच्याच स्वभावाने, लग्नातील बैठकीची बोलणी तुटली तर, बाबांना शिव्या, नावं सुद्धा ठेवत. घरी येवून गोंधळ घालत. तरी, बाबा आधीच स्पष्ट करत की, माझ्या हातात अशी व जशी माहीती आहे ती देत आअहे पण पुढील चौकशी तुमच्या पद्धतीने करा.
मी फक्त ओळख करून देइन.
माझे साध्या स्वभावाचे बाबा, फक्त जावू दे म्हणत. मला अक्काल आल्यावर, ह्या प्रकाराची जाणीव झाली तसे, वडिलांना बंद करायला लावले. कशाला करता हि सेवा आणि वर लोकांचे बोलणं एका... आजही तो गोंधळ आठवला की, चीड येते की वडील बिचारे आपला वेळ देवून , पत्रिका नेवून द्या, फोटो द्या कामं करत आणि अनग्रेटफुल लोकं फायदा घेत साधं धन्यवाद न देता.

त्यामुळे, एकंदरीत बरेच कांपो पाहिले/अनुभवले दुसर्‍यांचे लहानपणापासून. म्हणून मी ठरवले की असले कर्यक्रम करून लग्न करणार नाही. बाबा हि म्हणाले, तुला मी कधीच लोकांसमोर उभी करून असल्या प्रसंगाला सामोरी जावू देणार नाही. आपल्या समविचारांचा, आदर करणारा मुलाशी तु ठरव, भले तुझी आजी( वडिलांची आई), किंवा आईने जर समजा साथ दिली नाही तरी मी असेन.
माझे कांपो असे नाही झाले पण आजीच्या आग्रहाखातर भेटले एक दोन चार आगाउ मुलांना बाहेरच कारण मला माझा नवरा तोवर भेटला न्हवता. आणि आजीला भिती की मी अचाट मुलाशी लग्न वगैरे करेन.
बाकी बरीच आगाउ लोकं उगाच फोन करत व माहिती विचारत तुमची मुलगी आहे एकलं वगैरे. किंवा घरीच येत अचानक.
अगदीच अपमान करून घालवण्यापेक्षा, बाबा सौम्य नकार कळवत.
त्यातलाच एक अतिशय फाजील माणूस ज्याने कुठुनतरी माहीती व नंबर काढून फोन केला.
इतर जुजबी ओळख करून दिल्यावर काय प्रश्ण विचारावा?

तुमची मुलगी सावळी आहे का काळी? पण बांधा तरी कसा आहे मग?
कधी न्हवे ते बाबा चिडलेले एकले, सरळ कडक शब्दात सांगितले,
तुम्ही फोन केलात म्हणून आदर ठेवून बोलतोय पण विचारताना भान ठेवा काय विचारताय त्याचे. असे विचारून तुमचे विचार कधी दर्शवू नका. असे म्हणून बाबांनी फोन ठेवला.
खरे तर, आजच्या काळात मुला-मुलींनी आपल्या आई-बाबांशी चर्चा करावी, काय निकष असावे, एकमत ठरावे. व कांपो करण्यात वेळ घालवू नये व घेवु नये.
दुसर्‍यंच्या मुलाला/ मुलीला शोपीस समजून कशाला त्रास?

लहानपणी, पाहिलेले कांपो किस्से लिहिते हळू हळू...

माझ्या आजोबांनापण असा छंद होता समाजसेवेचा. एकदा त्यांच्या ओळखीतून एक लग्न झाले आणि व्यवस्थित सुरु होते पण तो मुलगा वर्षाच्या आतच निवर्तला काही कारणांनी. त्या मुलीचे घरचे सर्वांना सांगत यांच्यामुळे आमच्या मुलीचे नशिबी असे भोग आले. पुढे त्या मुलीचे दुसरे लग्न झाले पण आमच्या आजोबांना शेवट्पर्यंत ती बोचणी राहिली. त्यांनी नंतर पुन्हा कोणाच्या सोयरिकी नाही जुळवल्या.

>> काहीही मोबदला न घेता, ओळखीतील लोकांच्या, मित्रांच्या मुला-मुलींच्या, नात्यातल्या मदत कराय्चे.

अगदी अगदी! पूर्वी असायची अशी माणसे. त्यांना त्यातून मानसिक समाधान मिळायचं. शक्यतो निवृत्त झालेले जेष्ठ लोक हे करीत.

>> दुसर्‍यंच्या मुलाला/ मुलीला शोपीस समजून कशाला त्रास

सहमत!

बाबा निवृत नसून सुद्धा, आपली नोकरी धंदा सांभाळून करत. अक्ख्हा रविवार देत ह्या फालतु कारणासाठी.
नंतर नंतर, आई सुद्धा थकायची व कंटाळायची ते इतक्या लोकांचा उठबस, एक रविवार सुद्धा फॅमिलीला नाही.
मी तर चक्क भांडून बंद करायला लावलं. फोन आले की राँग नंबर सांगायचे. त्याशिवाय बाबा गप्प बसणार न्हवते. आधी किंचित चिडायचे माझ्यावर, बेटा असं उद्धट वागू नये, चार माणसं जोडली जातात.
मी एकदा म्हटलच त्यांना, ते उद्धट बोलतात त्याचं काय? आणि आम्हाला तुमचा वेळ मिळत नाही त्याचं काय? मग माझ्यापुढे काय चालयचं नाही त्याचं. ह्या धाग्यामुळे त्यांच्या आठवणी जागा झाल्या. मला तर रडायलाच आलं, किती दादागिरी केली त्यांच्यावर.
>>> मानसिक समाधान मिळायचं.<<<
हो, अगदी हेच त्यांच म्हणणं असं असाय्च. हिरमुसले असायचे दर रविवारी. मग म्हणायचे, करतो आता तुझी सेवा. काय बनवू तुझ्यासाठी आज?

असो. ते हि दिवस गेले...

आमच्या इथे कंपनीतले एक जण असेच आहेत मध्यस्थ गिरी करतात घरबसल्या. फोन करून स्थळे सुचवत राहतात मुलीसाठी. मी आपले पोलाइटली ऐकून ठेवून देते. अजून लहान आहे ती लग्नाचे बघायला. त्यांनी सुचवलेली स्थळे पण अचा ट असतात.

जिद्दु! Rofl

हा धागा खरेच स्ट्रेसबस्टर आहे. अफलातून किस्से आहेत एकेक.>>>>>> मम्! Biggrin

ऑफिस मधील एका सबोर्डिनेट चे वधु संशोधन चालु होते.

त्याचे एकदा एच आर एक्सिक्युटिव्ह बरोबर सकाळी ऑफिस सुरु झाल्या झाल्या काही तरी बिनसले , दोघांचे खुप भांडण झाले, त्याच दिवशी सबोर्डिनेट च्या कॅरेक्टर विचारपुस साठी मुली कडुन एच आर मध्ये फोन आले होते, एच आर ने एक्सीलेंट फीडबॅक (निर्व्यसनी, मनमि़ळाऊ आणि कोणतेही लफडी नसणारा) दिले होते. सबोर्डिनेट लग्न ही तिथेच ठरले, नंतर त्यांने सांगितले की त्याच्या बायको ने सांगितले कि तिने ह्याचे पगार आणि कॅरेक्टर बॅकग्राऊंड चेक केले होते तर उत्तम फिडबॅक मिळाले होते. एच आर नी नंतर एव्हढेच सांगितले कि भांडण झाले होते त्या दिवशी एक फोन आले होते अमुक अमुक ठिकाण हुन.

एच आर कडे कॅरॅक्टर तपासायची आयडिया भारी आहे! आधी कधी डोक्यात नसती आली. शिवाय वरती लिहिलेल्या प्रसंगात एच आर वाले खरंच इमानी निघाले. हापिसात झालेल्या भांडणाचा त्यांनी त्या मित्राच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ दिला नाही.

मी असे बॅकग्राऊंड चेक केले आहे.

एक रिक्वेस्ट आली होती मला, तुमच्या अमुक एका वेंडर (फार मोठी पंप मॅन्युफॅकचरिंग कं) कडे एका मुलाची चौकशी करा. माझे ओळख होते मुंबईत, पण मुलगा काम करत होता वेगळ्या राज्या च्या शाखेत, मग इकडे मुंबईत सांगितले तिकडे चौकशी करायला (मुलास काही कळु न देता), तेव्हा फीडबॅक मिळाले न्यु रिकृट आहे.

मी असे बी जी व्ही एक दोन मुलांचे केलेय Happy
मुलगा टीम मध्ये कसा वागतो, (त्याचे मांजर किंवा मांजरी मित्र मैत्रिणी असल्यास) कामात चांगला हुशार आहे का, टपरीवर सिगारेट घेतो का गुडांग का नुसती चहा कॉफी, चेहऱ्यावरून मनमिळावू वाटतो का, मुलींकडे क्रिप नजरेने बघतो का वगैरे.यातले शेवटचे 2 निकष मी माझ्याकडून तपासते.
ऑफिस या जागी माणूस 10 तास वावरत असल्याने फार जास्त बुरखे पूर्ण वेळ ठेवता येत नाहीत.

Pages