रंग माझा वेगळा

Submitted by ललिता गवंडी on 13 March, 2021 - 00:25

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा
छंद माझा आगळा
सांगू कसे तुला ?
जीव झाला खुळा //१//

सन्मान स्त्रीत्वाचा
साज नको मला
कर्तुत्वाचा ध्यास
स्वातंत्र्य मनाला //२//

स्वाभिमान असा
जीवनी बांधला
ओळखिले त्यांना
ज्यांना तो बाधला //३//

उधळण केली
रंग हे फेकिले
जीवन त्यातच
माझे उजळले //४//

ललिता गवंडी.

Group content visibility: 
Use group defaults