ज्ञानामृताचा घडा

Submitted by ललिता गवंडी on 8 March, 2021 - 02:33

ज्ञानामृताचा घडा

ज्ञानामृताचा घडा
तुझ्या हाती होता //
वंदन करतो आम्ही
चरणी ठेवितो माथा //१//

खुले झाले व्यासपीठ
लेखणी आली हाती //
विचारातून जन्मल्या
लाखो क्रांतीज्योती //२//

आकारले जीवन तूम्ही
धरली शिक्षण कास //
राबविला तूच पहिला
शिक्षण घ्यायचा ध्यास //३//

जागृत केले शिक्षणाने
अधिकार दिला 'स्री' यांना //
दगडधोंडे झेलले हाती
धीर देऊन जखमांना //४//

शिक्षणाने धर्म बुडतो ?
खुळी केली कल्पना //
ज्योतीबांच्या संगे तुम्ही
खंबीर केले 'स्री' मना //५//

रुढी आणि परंपरेला
दिले असे नवे रूप //
ज्ञान अज्ञानाचे ही
उघड केले स्वरूप //६//

शिकलो आज आम्ही
हे तुझेच आहे दिव्य //
शिक्षण आम्हास देऊन
केले तुम्ही असे भव्य //७//

'स्त्री' च्या शिक्षणाने
कुटुंब एक सुधारते //
माय सावित्री तुझ्या
चरणी माथा ठेवते //८//

© ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults