बाबा

Submitted by ललिता गवंडी on 6 March, 2021 - 05:27

बाबा

लाख लाख समजावले
उगाच फिरू नका बाबा
ओस पडल्या गल्ली बोळा
सुरक्षित तुम्ही घरी बसा

ऐकलेच नाही कुणाचे
दुर्लक्ष्य केले बोलण्याचे
होत नाही काहीच मला
हट्ट तुमचा पूर्ण केला

सांगून येते का संकट
विळखा पडला कोरोनाचा
जीव झाला वेडा पिसा
उपचारा आता जावू कसा

दया दाखवली परमेश्वरा
झाला ऍडमिट दवाखाना
तासा गणिक श्वासाचा
हिशोब ही वाढू लागला

पाणावलेल्या डोळ्यांना
धूसर तुम्ही दिसत होता
खोटाच धीर देण्यासाठी
उसनं हसू हसत होता

दुरून तुम्हा पाहण्याशिवाय
पर्याय आता उरला नव्हता
बाबा माझा एकटाच
खाटेवर लढत होता

विळखा घातला कोरोना ने
प्रयत्न शमले सर्वांचे
अखेर सर्व शांत झाले
हिशोब थांबले श्वासांचे

शल्य मनाला बोचत राहिले
चरण दर्शना मी ही मुकले
अंत्यसंस्काराचे पुण्य
नशिबी माझ्या पुसले गेले

-ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults

सकाळी मला अस्वस्थ झालं कविता वाचताना.
माझेच बाबा दिसायला लागले. नंतर स्क्रीनच दिसेनासा झाला.
तुम्हाला लवकर सावरण्याचे बळ मिळो.