वाचकमित्रहो....

Submitted by कुमार१ on 3 March, 2021 - 03:17

चालू वर्ष हे माबोचे २५वे वर्ष आहे. आपल्या लोकप्रिय संस्थळावर अनेक जण लिहीत असतात. या माध्यमाच्या रूपाने आपल्याला व्यक्त होण्यासाठी एक चांगले माध्यम मिळाले, हे निःसंशय. काही लेखक इथे अभ्यासपूर्ण अथवा रंजक लेखनही करत असतात. आपण लिहिलेले ‘कोणीतरी वाचतंय’, म्हणूनच अजून लेखक टिकून आहेत. या दुतर्फी व्यवहारात वाचक हा खरेतर अधिक महत्त्वाचा घटक आहे. इथल्या वाचकांचे दोन प्रकार आहेत- प्रतिसाद देणारे आणि मूक. काही वाचक हे क्वचित का होईना एखादे लेखन करतात, पण काही निष्ठावान वाचक हे कायम निव्वळ वाचक याच भूमिकेत अनेक वर्षे राहिलेले आहेत. मला अशा वाचकांचे नेहमीच कौतुक वाटते. या धाग्याद्वारे मी त्यांना एक आवाहन करतो.

इथे आतापर्यंत अनेकविध विषयांवर लेखन झालेले आहे. प्रत्येक लेखक हा आपापल्या आवड, गती आणि अभ्यास यानुसार विषयाची निवड करतो. प्रत्येक लेखकाचा एक ठराविक वाचक वर्गही तयार होतो. पण या सगळ्यात, निव्वळ वाचकांना अजून काय प्रकारचे वाचायला आवडेल, हा प्रश्न तसा दुर्लक्षित राहतो. तसेच काही विषयांवर नको इतके लेखनही झालेले असू शकते आणि त्यामुळे वाचकांना त्याचा कंटाळा आलेला असतो.

तर वाचकमित्रहो, या धाग्यात तुम्ही प्रतिसादातून तुम्हाला ज्या विषयांवर वाचायला आवडेल असे नवे विषय सुचवत रहा. त्यातून अशी यादी इथे तयार होईल. मग ती पाहून इच्छुक लेखकांना त्यातील त्यांच्या पसंतीचे आणि आवाक्यातले विषय निवडता येतील. याचबरोबर, ज्या विषयांवर आतापर्यंत नको इतके चर्वितचर्वण झालेले आहे, असे विषयही जरूर सांगा. त्यातून नवलेखकांना त्यांचा विषय निवडताना विचार करता येईल.

प्रत्येक लेखक हा देखील एक वाचक असतो. तेव्हा त्यांनीही (इतर लेखकांनी लिहावेत असे) त्यांच्या पसंतीचे वाचनविषय इथे जरूर लिहावेत. संबंधित लेखकांना ते मार्गदर्शक ठरेल. व्यापारातील ‘ग्राहकराजा’ प्रमाणेच वाचक हा लेखनविश्वातला ‘राजा’ आहे असे मी मानतो. म्हणून हे आवाहन.

धन्यवाद !
..............................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञान
लग्नसंस्था - वर्तमान आणि भविष्यकाळ
कामजीवन
अमराठी आणि अभारतीय श्रेष्ठ लेखकांच्या साहित्याची ओळख
आयुर्वेद (अनुभवी-सिद्धहस्त वैद्यांचे लिखाण फक्त असले कोणी तर )
या जन्मात मी काय शिकलो ( यात जेष्ठ मंडळींनी आयुष्यात त्यांना टक्केटोणपे खाऊन मिळालेले अनुभव /धडे यावर काही लिहावे ज्याचा इतरांना काही फायदा होईल)

विज्ञान कथा
रहस्य कथा
प्रवास वर्णन
निरनिराळी मोहीम वर्णने

पाणी संवर्धन / वाचवणे
मिनिमलिजम/अपरिग्रह
इतरभाषांतील उत्तम अनुवादित साहित्य (प्रताधिकार मुक्त)
प्रवासवर्णने, ट्रेकिंग ( इथे कमी दिसते)
विरंगुळा खेळ प्रकार
छोट्या मोठ्या दुरुस्त्या शिकवणारे धागे
बालसाहित्य
भगवद्गीता (यावर कितीही लिहिले तरी कमीच आहे)
आधार गट

सगळ्या भारतभर जगात अनेक व्यक्ती , काही सेवाभावी संस्था आपआपल्या परीने, जसे जमेल तसे चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांच्याबद्दल , त्यांच्या कार्याबद्दलचे लेखन

अद्भुत अशा सत्यकथा / नॉन फिक्शन मधे विलक्षण अनुभव / गूढकथा आवडतील वाचायला.
सायन्स फिक्शन मधे अस्सल काही मिळालं तर नक्कीच आवडेल.
नेहमी येणा-यामधलं वेळ मिळेल तसं वाचते.

संगीतविषयक आवडेल वाचायला. शास्त्रीय संगीत ओळख पण.

रहस्य कथा, युद्ध कथा, RAW agent stories
आत्मकथा --दादा कोंडके, भालजी पेंढारकर, etc
जुन्या हिंदी चित्रपट काळाविषयी माहिती, चित्रपट विषयी किंवा कलाकार विषयी