ठिपके

Submitted by अनन्त्_यात्री on 2 March, 2021 - 11:48

शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,

पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
वाट पाहुनी
मग बोलूया,

चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता..!!
तुमच्या कवितेमध्ये खूप गूढ अर्थ लपलेला आहे असं मला तुमच्या कविता वाचताना नेहमी वाटतं.