प्रिया - २!

Submitted by अज्ञातवासी on 28 February, 2021 - 09:58

प्रिया - १

https://www.maayboli.com/node/78101

"कालची रात्र खूप सुंदर होती प्रिया."
"हो रे राजा!!!"
"तुला मिठीतून सोडावस वाटत नव्हतं प्रिया..."
"पुरे, काम आहेत."
"नको जाऊस ना..."
तिने अलगद मिठी सोडवली, व ती जायला निघाली.
तो तिच्याकडे बघतच राहिला!
तिने पटकन आवरलं व ती बाहेर निघाली.
आजकाल कामाचं प्रेशर वाढलं होतं. हवं तसं आउटपुट मिळत नव्हतं.
'मी फेल होतेय का???' तिच्या मनात विचार चमकून गेला.
कामातून तिचं लक्ष उडालं होतं. कितीतरी वेळ तिच्या डोक्यात कालची रात्र थैमान घालत होती.
'इतकं कसं वाहवत गेलो आपण.'
तेवढ्यात एक मेसेज वाजला.
'हाय प्रिया.
बिजी आहेस? जस्ट तुला एक रिक्वेस्ट करायची होती.
थोडे दिवस तू माझ्याकडे आहेस, तोपर्यंत आपला फोटो लावूयात का बेडरूममध्ये, तुझा आणि रोहनचा बाजूला काढून?
एवढी एकच जागा आहे ग, जिथे तू माझी आहेस.'
आणि क्षणार्धात तिचा मूड बदलला.
"हळूहळू आपण त्याचीच होत चाललोय. आपण ... वाहवत चाललोय."
तिने अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली, व ती तडक त्याच्याकडे आली.
"तुला माझ्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणी दिला? मला इतकं नाही गुडी गुडी राहता येणार."
"सॉरी," तो कसाबसा बोलला.
"नाही...मी अजून प्रतारणा नाही करू शकत. कधीही नाही. हे नातं इथेच थांबव. नाही सहन होत मला."
"प्रिया, तू माझी प्रिया आहेस ग. प्रिया माझे खूप प्लॅन आहेत, आपल्या दोघांसाठी... अग, अजून खूप जगायचंय आपल्याला."
"सॉरी..." तिच्या डोळ्यात अश्रू होते. "मी अजून नाही जगू शकत इतकं द्विधा मनःस्थितीत. माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत."
"मी कुठेही नाही त्यात?" त्याने विचारले.
"आहेस, पण मला मोकळं कर, मला मोकळं कर."
"प्रिया," तो खाली झुकला. गुडघ्यावर बसला, आणि त्याने दोन्ही हात पुढे केले.
"मी झुकलोय प्रिया, आज तुझ्यासाठी... आता मला मिठी मारायची की, पाठ फिरवायची, ते तू ठरव."
तिच्या डोळ्यातून अश्रू आले...
"सॉरी..."
तिने त्याला मिठी मारली,
...व क्षणार्धात पाठ फिरवून निघून गेली...

मनोगत -

खरं सांगायला गेलं, तर प्रिया ही कथा नसून एक मालिका तयार करायची होती. थोडीशी अबस्ट्रॅक्ट होणारी, ज्यात प्रिया व त्याचा प्रवास, दोघांचं नातं, अनेक गोष्टी आल्या असत्या.
पण, मेबी ही मालिका इतकी खुलवता येणार नाही, याची जाणीव झाली, व कथा इथेच संपवतो.

थँक्स!
अज्ञातवासी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलीये.

<<पण, मेबी ही मालिका इतकी खुलवता येणार नाही, याची जाणीव झाली, व कथा इथेच संपवतो.>>

वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक ख़ूब-सूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा - साहिर लुधियानवी..

मानिम्याऊ कथा वाचल्याबद्दल धन्यवाद...
मात्र!!!
इतक्या सुंदर प्रतिसादासाठी शब्द कमी आहेत... _/\_
लेट्स होप कधी एखाद्या सुंदर वळणावर ही कथा संपवता येते का.... Happy

मेबी ही मालिका इतकी खुलवता येणार नाही, याची जाणीव झाली, व कथा इथेच संपवतो.>>
लवकर संपवली तरी छानच आहे कथा. पण, तुम्ही कथा अजून पुढे खुलवू शकले असते..! जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुढचा भाग येऊ द्या..!

लवकर संपवली तरी छानच आहे कथा. पण, तुम्ही कथा अजून पुढे खुलवू शकले असते..! जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुढचा भाग येऊ द्या..! --. +11111

@chashmish - धन्यवाद तुमच्या सुंदर आणि मनस्वी प्रतिसादाबद्दल

@रुपाली - धन्यवाद. बघुयात कसं जमतं ते.

@मेघा - थँक्स!!!