लावणी - फुलझडी

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 February, 2021 - 05:32

बारुद अंमळ ठासून भरलय
लावा बिगीबिगी काडी !!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस

हाती घ्या ना सुरसुरबत्ती!
काढा जाळ
ठिणग्या ठिबकती !!
कवाच बसलाय टिकल्या फोडत
लडी म्हागनं लागू दया लडी !!1!!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस

व्हट माजं लक्ष्मीतोटा !
वात काढा
भिडा राया खेटा !
बॉम्ब फोडा ना आवळ -जावळ
आग वकती पेटती भुईनळी !!2!!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस

मी झाड मोहरलं टंच!
फळफळू दे
होऊ दया की खर्च !
नेम धरुनश्यान राकेट उडवा
पाडा दमदार सरीवर सरी !!3!!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस

बारुद अंमळ ठासून भरलय
लावा बिगीबिगी काडी
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users