हसत हसत लपवू तू नको दुःख ओले

Submitted by द्वैत on 23 February, 2021 - 10:20

हसत हसत लपवू तू नको दुःख ओले

हसत हसत लपवू तू नको दुःख ओले
सजल नयन दोन्ही सांगती सोसलेले

जनपरिजन सारे झाकती भेद येथे
विसर विफल चिंता जी तुला त्रास देते

वदन उघड आता भांड तू ह्या जगाशी
भिडव नजर त्यांना आड जे कोण येती

बदल सकल चर्या धीट हो निश्चयाने
सरल विहर गगनी तोडुनी तावदाने

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users