जगतोच का आपण?

Submitted by मोहिनी१२३ on 17 February, 2021 - 13:37

जगतोच का आपण?
ज्ञानसाधना संपली नाही म्हणून
का
मिळालेले ज्ञान वाटायचयं अजून

जगतोच का आपण?
धनप्राप्ती करायची आहे म्हणून
का
कमावलेले धन उपभोगायचयं अजून

जगतोच का आपण?
खरं प्रेम लाभायचयं म्हणून
का
लाभलेले प्रेम टिकवायचयं अजून

जगतोच का आपण?
जबाबदार्या संपायच्या आहेत म्हणून
का
मागे रडणारं तयार करायचयं अजून

जगतोच का आपण?
नात्यांत गुरफटलो गेलोय म्हणून
का
एकटं जगणं अनुभवायचयं अजून

जगतोच का आपण?
समज-गैरसमज दूर करायचेत म्हणून
का
स्वत:लाच कोसत बसायचयं अजून

जगतोच का आपण?
उत्तर सापडलं आहे म्हणून
का
प्रश्नच संपत नाही अजून

जगतोच का आपण?
मरणाची भीती वाटते म्हणून
का
मागून मरण येत नाही अजून

Group content visibility: 
Public - accessible to all site users