केळस्कर काकी

Submitted by Vaishali Agre on 6 February, 2021 - 08:13

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही वचने नितांत सत्य आहेत.
आई सारखं प्रेम कोणीही करू शकत नाही ..
खरं आहे .... आई सारखं प्रेम कोणीही करू शकत नाही ....
एक आई (स्त्री ) पूर्ण कुंटुंब सांभाळते . आपली मुले ,नवरा , सासू आणि सासरे , प्रियजन सर्वाशी मिळून मिसळून असते .
कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली ही स्त्री जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते तेव्हा तिची मानसिकता बदलते . प्रेमाचे व आदराचे नाते जोपासणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. स्त्री आई ची , बायकोची , मैत्रिणीची , बहिणीची , मावशीची,आत्याची , आजीची भूमिका फार प्रेमाने पार पाडतात मात्र “सासूबाई’ ही उपाधी लागली की त्या कुठली भूमिका कुठे आणि कसे करतील हे एक कोडं आहे.
याउलट सासू, सुना सुज्ञ, समंजस असतील तर घरात “स्वर्ग’ उतरतो व सर्वांचीच वाटचाल अधिक सुलभ व यशस्वी होते. हे जर नसेल तर सुरू होते घुसमट. ज्यात कधी पर्याय सापडतात तर कधी कोंडीपलीकडे वाट्यास येत नाही, सतत ताणात जगावे लागते.
माझ्या आणि माझ्या सासू च पण असेच काही तरी आहे कधी शिमगा तर कधी दिवाळी असो ....
तर झाले असे कि एकदा मी ऑफिस वरून लवकर घरी आले माझ्या मिस्टरांनी कॉल करून सांगितले कि आपल्या नातात्याला
एक काकी ,केळस्कर येणार आहे तर तू घरी जाताना त्याच्या साठी एक सुंदर गजरा घेऊन जा त्यांना फार आवडतो मी तसेच केले.
घरी आल्यावर नेहमी प्रमाणे फ्रेश होऊन मी जेवणाचं करायला लागले एकटीच ... ( माझ्या (सासू) आई बाहेर हॉल मध्ये होत्या एका सोफ्यावर 90 अंशाच्या कोनात ताठ बसलेल्या .... मधेच आत वाकून बघत होत्या असो .)
घराची डोअरबेल वाजली पण आई (सासू ) काही उठल्या नाहीत, 90 अंशाच्या कोनात ताठ बसलेल्या होत्या ना... असो मी दार उघडलं तेव्हा त्या केळस्कर काकी आणि त्याचे मिस्टर दारात होत्या मी त्याना आत बोलावलं आई ना सांगितलं बघा कोण आलंय ... आई नि मोठं हसून त्यांना मिठीच मारली... कितीतरी तरी वेळ त्याच्या मिठीतच होत्या आणि डोळ्यात पाणी .. मला काही समजेना अचानक आई ना काय झालंय .... थोड्या वेळानी आई त्याना अगदीच स्वतःच्या बाजूला बसवलं सोफ्यावर... आणि काकांना बाजूच्या खुर्चीत मी आत वळणार तेवढ्यात माझ्या आई (सासू) बोलायला लागल्या पाहुणे आलेत लवकर चहा पाणी च बघ .. लवकर कर ...
चहापाणी झाल्यावर मी त्याना जेवणाचं विचारून आत आली तेव्हा त्याच्या गप्पा चालू झाल्या ... काका मोबाईलवर बिझी झाले . मला आत त्याचा गप्पांचा आवाज येत होता त्यात त्यांना किती त्रास होतोय , किती सोशिक आहेत आणि आताच्या मुली (सुना) कश्या आहेत, स्वतःचा मुलींना किती त्रास होतो वगैरे वगैरे.... बराच वेळ गप्पा चालू होत्या गावच्या जुन्या आठवणी हि काढून झाल्या पण टॉपिक मात्र तोच सुना .
तेवढ्यात त्याना मोबाईलवर कॉल आला त्यांनी तो घेतला , कॉल घेतल्या नंतर आमच्या आई नि विचारलं कोणचा कॉल होता मुलाचा का ... काळजी करत असेल तो हो ना ... त्या काकी म्हणाल्या कि कॉल मुलाचा नव्हता तर सुनेचा होता लवकर जपून यायला सांगितलं आहे (त्यांना जरा हार्ट चा प्रॉब्लेम होता ना ) . केळस्कर काकू असं म्हणताच आई (सासू) माझ्या कडे बघून बोलायला लागल्या किती नशीबवान आहेस तुम्ही ,सून किती काळजी घेते. त्या काकी चेहऱ्यावर हसू आणत बोलल्या जर आपण म्हणजे सासू नि जर सुने ची अगोदर पासून काळजी घेतली तर सून हि नंतर सासू ची काळजी घेते . जस पेरावे तसेच उगवते . त्या म्हणाल्या कि त्या मुलाबरोबर कमी आणि सुने बरॊबर जास्त जवळ आहे . म्हणजे सुने ला समजून घेतात , सुने ची बाजू घेतात त्यामुळे सून पण खुश , मुलगा पण खुश , घरात आनंद आणि आम्ही पण खुश .

खरच त्याचे वागणं आणि विचार आवडले मला .... (आई च अजून कोडं आहे .... असो ). घरातील स्त्री (सून , सासू ) संतुष्ट असली तर घर संतुष्ट होते. हे मला तरी त्या क्षणी वाटलं ...
मी त्यांना निघताना हळदकुंकू करून मघाशी राहिलेला गजरा दिला...
तुम्हाला काय वाटत ....

(टीप : लिखाणात काही चुकल्यास माफी असावी)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults