मी मराठी - अलक

Submitted by बिपिनसांगळे on 1 February, 2021 - 13:21

मी मराठी - अलक

-------------------

सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मग काय सदरा ?
आणि लहानपणापासून तो मम्मी म्हणत आहे तर आता आई म्हणावे का..
लहान मुलगा काहीतरी करू पाहतोय...

वाचक हो
आभारी आहे .

कथा उलगडून सांगायची म्हणजे ती कुठेतरी फसलीये की काय ?

पण टी शर्ट हा शब्द मराठीच आहे की, बस, रिक्षा, सिग्नल, जीनची पँट सारखा. जी संकल्पनाच मुळात मराठी नाही, तो शब्द इतर भाषेतून उसना घेण्याशिवाय गत्यंतर नाही.

मी मराठी' चे टी शर्ट / टोप्या किंवा इतर काही घालून मिरवायचं . मी मराठी चा घोष करायचा . पण - स्वतःच्या सख्ख्या आईला मात्र स्वतःच्या मायमराठीतील आई या शब्दाने हाक न मारता - मम्मी - म्हणायचं ! ...

>>>पण - स्वतःच्या सख्ख्या आईला मात्र स्वतःच्या मायमराठीतील आई या शब्दाने हाक न मारता - मम्मी - म्हणायचं ! ...>>> प्लीज डोन्ट बी टू जजमेंटल. ते नाव त्या मुला/मुलीच्या आईबापाने त्याला शिकवले. ते अचानक कसे बदलणार. आणि एवढा बाऊ देखील करायचे कारण मला दिसत नाही.