मुक्त .... भाग ५... अंतिम भाग

Submitted by abhishruti on 16 January, 2021 - 12:22

मुक्त.... 5 अंतिम भाग

यावेळी मात्र काही दिवसातच संधी चालून आली. त्याचं असं झालं मला एका कामासाठी सिंगापूरला जावं लागलं. अर्थात मला शरूला भेटायच असलं तरी मी आपणहून कॉन्टॅक्ट करणार नव्हतोच. मी चंदूकरवी तिला कळेल याची व्यवस्था केली. माझ्या अंदाजाप्रमाणे पहिल्याच दिवशी शरुचा फोन आला. "घरीच ये जेवायला, आम्ही तुला न्यायला येतो, जेवणानंतर मस्त गप्पा मारू". मी म्हंटलं... "घरी नको, बाहेरच भेटू आणि हो तूच ये फक्त"... धैर्य कुठून आलं देवजाणे. "ओके no problem! मी तुला रेस्टॉरंट चं लोकेशन पाठवते, will see u at 8 pm sharp" मी आठच्या आधीच पोचलो, अचानक पाऊस सुरू झाला. समोरच्या पोर्चमधून शरूनी सफाईदार पणे वळण घेऊन गाडी दारासमोर आणली. आज ती मोकळ्याढाकळ्या वेस्टर्न आऊटफीटमधे होती. तिने दरवानाकडे वॅलेपार्कींग साठी गाडीची किल्ली दिली. तिने टेबल बुक केलेलंच होतं .Corner Table for two..... Yes it's ready Mam! नेहमीप्रमाणे तिनेच संभाषणाला सुरुवात केली, आईची, मुलीची चौकशी वगैरे ... मी कुठून सुरुवात करावी यासाठी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होतो....

एवढ्यात तीच म्हणाली "बोल बाबा आजतरी मन हलकं कर... ". मी अवाकच झालो. तरी आज बोलायचंच ठरवलं होतं,

"काय मिळतं ग तुला असं करुन?",
"असं म्हणजे कसं?" प्रतिप्रश्न....
"तुला कळतय सगळं, उगाच वेड पांघरू नकोस. प्रत्येक वेळी तूच का म्हणून कुरघोडी करायची, प्रत्येक वेळी मीच का गप्प रहायचं"
"तुला अजून कळलेलंच नाही का ठोंब्या?"
"तू परत तो शब्द उच्चारू नकोस"
"बरं बाबा"
"लहानपणापासून तू सर्वांची लाडकी, तू कसंही वागलीस तरी तुला सात खून माफ..."
"थांब थांब ...कसंही म्हणजे? आणि कुरघोडी तर मला कधीच करावीशी वाटली नाही, तो तुझा प्रांत! खरं तर तू मला मागे टाकून निघून गेलास, वळूनही न बघता."
"अजून तेच धरून बसलीयस का तू? माझा तुला फसवण्याचा हेतू अजिबात नव्हता"
"धरून तू बसलायस, तू मला फसवलं नाहीस पण स्वतःला फसवतोयस, उगाच नसलेल्या दुःखाचा, न झालेल्या अपमानाचा डोंगर रचलायस तू"
"तू समजतेस तसं काहीही नाहीये"
"मग त्रासलायस का? मनमोकळं वागत, बोलत का नाहीस?"
"मी कधी तुझ्यासारखी बडबड करत होतो?"
"मग नक्की होतय काय तुला? कोणाविषयी एवढा राग, द्वेष मनात साठवून ठेवलायस? का कोंडमारा करतोयस स्वतःचा?"
"हे कशावरून म्हणतेयस तू?"
"अरे पदोपदी दिसतय ते बोलतेय, शाळाकॉलेजच्या दिवसापासून बघतेय मी तुला. तू शांत, समंजस होतास असंच इंप्रेशन होतं माझं rather आमच्या सर्वांचं"
"तो तर मी आहेच!"
"मग ही चीडचीड का?"
"कारण तुला सतत मिरवण्याची, पुढेपुढे करण्याची, कौतुक करुन घेण्याची हौस आहे"
"Oh wow and how's that related to ur frustration? Coz u had disconnected urself from me, rather from our entire friend-circle! आणि तू तर एकदाही माझं कौतुक केल्याचं माझ्या स्मरणात नाही."
"मला नॉशिया आहे त्या शब्दाचा!"
"का तुझंही सगळीकडे कौतुक होतं, आम्हाला छानच वाटतं, अगदी ओरडून सांगावस वाटतं सगळ्या जगाला की हा आमचा बेस्ट फ्रेंड आहे"
"काय, गरज काय आहे हे देखावे करायची? आणि बेस्ट फ्रेंडचा मान तर तुलाच मिळतो सगळ्यांकडून"
"देखावे?? अरे असा कसा विचार करतोस तू? आणि फ्रेंड्स मधे कसलं रे मानपान?
"मग काय त्यादिवशी दुःखातिरेकानी मिठी मारुन रडलेली तू खरी का आता जगासमोर मिरवणारी, खिदळणारी तू खरी?"
"Oh My God! तेंव्हापासून हे असं साचवून ठेवलयस का? गेलेल्या हुकलेल्या क्षणांविषयी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले क्षण भरभरून जग! आज साजरा करायला शीक बेट्या! आणि खरं सांगू का?
त्यावेळची ती रडणारी मीही खरी आणि आता दिसतेय ती आनंदी मीही खरीच! मी त्या क्षणी मनमोकळं करुन मुक्त केलं स्वतःला! तू मात्र तिथेच गुंतून राहिला आहेस. मोकळं कर स्वतःला, मुक्त हो"
"काही गुंतून वगैरे राहिलो नाहिये, चांगला संसार करतोय, संशोधन करतोय, तरूण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय!"
"तेच अपेक्षित होतं तुझ्याकडून आणि ते तू यशस्वीरीत्या करुन दाखवलस! महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य तेवढे कष्ट घेतलेस. मग हा रागराग कशासाठी?"
"मला हे सगळं अचीव्ह करण्यासाठी खूप त्याग करावा लागला! स्वतःला खूप रिस्ट्रिक्शन्स घालाव्या लागल्या तेव्हा कुठे हे सगळं करता आलं."
"That's ok that was ur own choice, nobody had forced u to do that, then why regrets?"
"Who said I m regretting?"
"अरे बाबा, मग काsssय बिनसलय?"
"कुठे काय बिनसलय?"
"मग का बोलावलयस मला इथे? तुला अजूनही कोषातच रहायचय का? का सोन्यासारख्या जीवाला यातना देतोस? आणि हो तू आजही माझा बेस्ट फ्रेंड आहेस, म्हणून तर मी धावत आले ना. I never feel unsafe with u. I trust u. मला माहिती आहे की तुला कितीही राग आला तरी तू माझ्या विषयी कधीच वाईटसाईट बोलणार नाहीस. वाईट विचारही मनात आणणार नाहीस. एवढे सगळे चांगले गुण असताना तू स्वतःला का त्रास करून घेतोयस हेच कळत नाहीये मला! एकदा बोल स्पष्ट, बरं वाटेल. जखम उघडी कर, वाहू दे ती! कुठलंही ओझं, गिल्ट, किंवा गैरसमज मनात ठेवू नकोस आज."
ती पोटतिडकीनं बोलत होती ... तिच्या डोळ्यात आता पाणी यायला लागलं, तिच्या मनात आजही फक्त आणि फक्त प्रेमच होतं.... या प्रेमाच्या ओलाव्याशी मी जाणूनबुजून ओळख लपवली होती. माझ्या अगदी आत कुठेतरी हाललं ... घसा कोरडा पडला. मी समोरचा पाण्याचा ग्लास एका घोटात संपवला. ती एकदम गप्प झाली. मला आणखीनच अपराधी वाटू लागलं.
"I m extremely sorry शरू, देवजाणे मी का तुझ्यावर राग धरला, का तुझ्या पासून कटाक्षाने दूर पळत राहिलो? मनात आत कुठेतरी तुझा हेवा वाटत राहिला. मी आखीवरेखीव रस्ता पसंत केला, तुला दाही दिशा मोकळ्या असल्यासारखी तू जगलीस. तू कायमच मला appreciate करत आलीस, मदत करत आलीस. अगदी त्या दिवशी सुद्धा तू एका क्षणात मुक्त केलस मला पण मलाच मुक्त होता आलं नाही ग! आजही तू मला तितकीच आवडतेस पण इतके दिवस मला हे नीट समजलच नाही आणि सांगताही आलं नाही, कधी इगो आडवा आला तर कधी भीती, तर कधी अपराधीपणा!" .... बाहेरचा अवकाळी पाऊस थांबला, सगळं कसं शांत, स्वच्छ झालं .... इतक्या वर्षांच मळभ दूर झालं

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद ....सर्वांनाच..... पेशन्स ठेवून वाचल्याबद्दल.... पण प्रॉमिस केल्याप्रमाणे पटापट पोस्ट केले सर्व भाग

छान झाली आहे कथा.
आणि कबूल केल्याप्रमाणे कथा वेळेत पूर्ण केली यासाठी विशेष धन्यवाद.