स्त्री

Submitted by विनोद इखणकर - श... on 11 January, 2021 - 12:12

शीर्षक - " स्त्री "

आधीच स्त्री जन्म नको कुणाला
आता तर भीती वाटते आईच्या गर्भाला

कुरतडून शरीरे ते रक्तात भिजले
काहींचे तर आयुष्यच विझले

ओरडले ते कंठ, धावले ते तन
तरी पण लोकांचे अंध ते मन

देवा तुझ्या दूनियेतील लोकं शैतान
स्त्री जीवनाच जीनं केलयं हैरान

ओरबडलेलं शरीर त्यावर झालेल्या जखमा
त्या नराधमाने हृदयावर दिलेला चटका

कुठे ना कुठे सोसला, अपमान तो तिरस्कार
आता तरी थांबव देवा हे बलात्कार

स्त्री वरील कसं थांबतील हे अत्याचार
कारण माणूसच बनलायं हैवान

देवा तुझ्या दुनियेतील लोकं शैतान
स्त्री जीवनाच जिनं केलयं हैरान

रस्त्यावर चालणं झालया कठीण
कधी छेडछाड तर कधी फेकतात ॲसिड भयान

हिंमतच वाढत चालीया या गुन्हेगारांची
या गुन्हेगारांना भीतीच उरली नाही कायद्याची

देवा तुझ्या दुनियेतील लोकं शैतान
स्त्री जीवनाच जीनं केलयं हैरान

- विनोद इखनकर
(शब्दप्रेम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users