मन माझे

Submitted by सीमा तुषार on 6 January, 2021 - 06:24

माझिया मनाचे वावर आहे खुप अफाट
चांगल्या विचार- आचरणाचे
वाहवेत तिथे पाट...
मधेच डोकावितो तिथे
स्पष्टवक्तेपणाचा वारा
वाहून गेल्यावर देतो
शांत शितल गारवा....
नांगरणी झाली कि खुणावतात बघून
मातीची ढेकळं
जड पकडण्या आधी काढावी ती
वाईट विचारांची रोपटं....
भिरभिरतात मनावरी कधी
त्रास देणारी पाखरं
खोट्या खोट्या बुजगावण्यानी
पळवून लावावी ती मात्र....
बोचरी नसावी वावरात माझ्या
कोणतेही पाने
उपटुन काढावी मुळापासुन
नकोत दुखरी मने ....
वाऱ्यावरी डोलावी तिथे
पाती सुपिक शब्दांची
हिरव्या -हिरव्या हरिततृणांनी
सजावी शेते आनंदाची ....
प्रेमाच्या वर्षावानी
फुलतयं कसं हे रान
हसुनी बघतेय माझ्याकडे
हि सुखाची हिरवळ छान ...
हसुनी बघतेय माझ्याकडे
हि सुखाची हिरवळ छान !!!
...सीमा तुषार

Group content visibility: 
Public - accessible to all site users