कविता १

Submitted by निखिल मोडक on 2 January, 2021 - 05:45

उमलत्या कलिकेस असा उधळूनी जाऊ नको
उजळल्या वाती आताशा विझवूनी जाऊ नको

दाटले मेघ केवढ्या दिनांतरी, शोषुनी घेऊ नको
येऊ दे उधाण चंद्रबिंबे तू असा मातू नको

तापू दे कितीही किनारा चेतवू वडवाग्नी नको
रोमांच फुलले चंदनाचे उन्मळूनी टाकू नको

लगडले आभाळा चांदणे झाकळुनी टाकू नको
विटलीसे कृष्णपक्षा पौर्णिमा ग्रासुनी टाकू नको

©निखिल मोडक

Group content visibility: 
Use group defaults