सरणाऱ्या वर्षा

Submitted by चंदन सोनाये on 1 January, 2021 - 09:31

सरणाऱ्या वर्षा तू,
नाही येणार परतुनी,
नाही विसरणार रे,
आम्ही तुझ्या आठवणी...

काही गोड काही कटू,
किती प्रसंग गेले सरून,
गेले शिकवूनी आयुष्यात,
नसे कोणी कोणासाठी शाश्वत...

हसलो कधी रडलो कधी,
भेटलो कधी दुरावलो कधी,
थांबलो कधी भटकलो कधी,
तुझ्या सवे सारे अनुभवले आम्ही...

निरोप तुज देताना आज,
दाटले अश्रू डोळ्यात किती,
आठवणींच्या शिंपल्यात आज,
जावे बनुनी त्याचे मोती...

दिवस गेलेला नाही परतत,
सरलेले वर्ष न मागे फिरत,
आहे तो दिवस जगावा आनंदाने,
हीच शिकवण दिली सरत्या वर्षाने...

--- चंदन सोनाये

Group content visibility: 
Use group defaults