विकासकावर बोलू काही....

Submitted by ASHOK BHEKE on 22 December, 2020 - 11:00

मी उगाच मारीत नाही फालतू बढाया
कधीतरी रागातून व्यक्त करतो प्रेमाची भाषा
कंठल्या स्वरात सांगतो,
विकासकावर बोलू काही....!
कोण कुठला आला आणि चाळीचा धनी ( विकासक) झाला
आश्वासनाच्या कढीभातावर बोळवण करीत
नव्या घराचं दिवास्वप्न अंधारात दाखवून गेला
खुणावते नव्या घराचा थाटमाट...
पण वारं उलटं वाहू लागलं
विकासकाच्या बोलण्यात इमाने नेक नाही
यायच्या अगोदर आलबेल होतं
आल्यानंतर त्याने दुहीचे बीज पेरले
त्यास्तव लाचारीचे कोंब उमलले..
सगळ्यानांच हवं असतं नवं घर
सुखाचं आणि समृद्धीचे
कुलस्वामीचे नांव घेत केले गृहदान
सुधारावया आपली चाळ...
मुक्त असूनही बंधनात गेले सारे
राहणारांना न पुसता
धन्याने वाजविला विकासाचा डंका..
सुखाच्या सिमेंवर दु:खाची घरे वसविण्यासाठी...
आला घेउनी डोईवर टोपलीत कुदळ फावडा
गरीबाच्या झोपडीवर हाणावया कुदळ
मुखी नामघोष कुलस्वामीचा
मनी घाट जबरदस्त नफा कमविण्याचा
क्रांतीची ज्योत पेटली, आली तेव्हा शंका
सूर्य प्रगटुनी नाद गुंजले
काही लाचार पैश्यासाठी संगे वाहत गेले
दर्शविती शिष्टाचार करती भ्रष्टाचार
द्र्व्यलोभाने बरबटलेले अशांत हैवान
कळते सारे काही
तरी ठेवी बुद्धी गहाण
विकासकावर बोलण्यासाठी
दांतखिळीचे अवलक्षण दाविले...
आता हसण्याचे कारण ओ कैसे...!
ना जनाची, ना मनाची
सोडलीय यांनी लाज
काय करावे, कसे करावे
आपलेच दांत आणि आपलेच ओठ
विकासकाचे दळती आणि गरीबांचे कुत्रे पीठ खाती
असे म्हणायचे हीच ती जात
विकासकाच्या महाली फुलतील बागा
रंक मात्र घराच्या अवशेषावर
जडावल्या पापण्यांनी रडतील बघा....
विकासक गरीबांचा आतंकी
तुम्ही करता प्रेम
त्याच्या मनी तुमचा तिरस्कार
रावणाने धूम माजविली
कुद्कुदकर वानर सेना दौडत आली.
तेव्हा त्याची लंका भस्मसात केली
भले आले आणि गेले
रंक असले म्हणून काय जाहले
एकमेकांच्या विचाराने घ्या
कसंही गुणा आणि कसंही भागा
उत्तर शून्य येणार असेल तर
जरा विचार करा
शून्य येणार हे माहिती असून देखील
विकासकाच्या दबावाखाली वावराल
तर लाखमोलाचे सर्वस्व गमवाल...
अरं गड्या तुझं तुलाच सावराया हवं
उघडं डोळं ठेऊन जागृत राहायला हवं
गरज पडली तर हक्कासाठी लढायला हवं
तुमच्या मनातली व्यथा मज दिसली
तेव्हा थोडं विकासकावर बोलू काही....!
ही कल्पना मनात रुजली....!

अशोक भेके
९९६९०१७१७९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users