नातीगोती! - भाग ९ - जुनी नाती!

Submitted by अज्ञातवासी on 14 December, 2020 - 11:26

भाग ८
https://www.maayboli.com/node/77427

"छान नाव आहे काकू तुमचं." सायली कशीबशी म्हणाली.
"धन्यवाद!"
मागून हेमंत अक्षरशः गयावया करत होता.
सायली थोड्यावेळ गप्पच बसली, आणि अचानक म्हणाली.
"काकू, काका तुम्हा दोघांची लवस्टोरी सांगत होते. सांगा ना तुम्ही"
"अगबाई, काहीही!" चेतना लाजली.
"या लाजण्यावरच पप्पा फिदा झाला असावा बहुतेक." सायली मनाशीच म्हणाली.
"नाही हो काकू, लाजताय काय? काका तुम्ही दुकानात जा बरं. काकू लाजताय." सायली उपहासाने म्हणाली.
तिच्या आवाजातील गर्भित धमकी हेमंतला जाणवली.
"जातो!" त्याच्या आवाजातला कंप सायलीला स्पष्ट जाणवला.
हेमंत दुकानात गेला.
"अग, काहीही लव स्टोरी वगैरे नाही. मोहन, हेमंत आणि मी, एकाच वर्गात होतो. दररोज शाळा सुटली, की आम्ही एकाच रस्त्याने यायचो.
मला सुरुवातीला वाटलं, की मोहनच माझ्या प्रेमात पडलाय की काय? पण तो दहावीनंतर बाहेर शिकायला निघून गेला. नंतर कळलं, हेमंत होता."
"म्हणजे, तुम्हाला असं वाटलं, पप्पा तुमच्या प्रेमात होता?"
"हो ग. ते वयच वेडं असतं. तुझ्या पप्पासारखा हँडसम माणूस आपल्या प्रेमात असावा असं कुणाला नाही वाटणार?"
सायली तिच्याकडे बघतच राहिली.
"असं का बघतेस?"
"काही नाही काकू?"
"तुला बघून खूप बरं वाटलं. खरंच." चेतनाने सायलीच्या गालावरून हात फिरवला.
"एक सांगू?" चेतना सायलीकडे बघत म्हणाली.
"सांगा ना!"
"आयुष्यात माझं पहिलं प्रेम असेल ना, तर तो मोहन होता!"
सायलीला तर आता भोवळच यायची बाकी होती.
"सॉरी, असं बोलू नये, पण मोहन वारला हे ऐकलं ना, प्रचंड रडले होते. खूप कमी आयुष्य मिळालं ग त्याला."
सायली तिच्याकडे बघतच राहिली.
"हे दोन्ही मागे असायचे ना आमच्या, मी प्रचंड खुश असायचे. मोहन माझ्या मागे आहे, भाव असायचा मला मैत्रिणींमध्ये."
"मग?" सायली म्हणाली.
"मग काय? नंतर कळलं तो हेमंतबरोबर असायचा, सोबत म्हणून."
"अच्छा," सायली स्वतःशीच हसली.
"चला काकू, उशीर झाला. मी निघते. काळजी घ्या." सायली उठली.
"येत रहा ग, तुझंच घर आहे."
"नक्की." सायली म्हणाली आणि बाहेर पडली.
बाहेर महेश उभाच होता.
सायलीला घराबाहेर पडताना बघून हेमंतही घाईघाईने बाहेर आला.
"सायली, तू तिला काही सांगितलं नाही ना???"
"तू गप रे," महेशचा पारा चढला. "तुला तर चपलेने हाणायला पाहिजे."
"महेशदादा गप रे."
"अग काय गप, हा तर कटप्पा निघाला...डायरेक्ट दोस्तीत कुस्ती?"
सायलीच्या चेहऱ्यावर त्याही परिस्थितीत हसू उमटलं.
"मी काहीही सांगितलं नाहीये, आणि तुम्हीसुद्धा काही सांगू नका."
"अग अगदी खरं सांगतो, जोपर्यंत मोहन होता ना इथे, तोपर्यंत मी तिच्याकडे त्या नजरेने..."
"आणि नंतर तुझी मती फिरली ना!" महेश अजूनही घुश्यात होता.
"नाही रे, सायली समजाव याला."
"दादा चल. झालं गेलं गंगेला मिळालं. तसंही, थँक गॉड, पप्पा आणि हिची लव स्टोरी पुढे सरकली नाही."
"का?" हेमंतने विचारले.
"तू देवदास बनून फिरला असता ना म्हणून, हरामी!" महेश अजून चिडला.
"माझी ममा बघितली आहे का कधी? तिच्यासारखी सुंदर वूमन मी अजून बघितली नाहीये. पप्पा लकी होता माझा. चल रे महेशदादा."
"चल. पण तुला सोडून याच्याकडे बघतोच."
सायली पुन्हा हसली.
"पण, काकांनी तुला मारलं तर असेलच ना तेव्हा?"
"मारलं? माझा जीव घेईल असं वाटलं मला..."
"मग?"
"त्याने तसं काहीच केलं नाही. फक्त एक वाक्य म्हणाला. आणि घरी निघून गेला."
"कोणतं वाक्य?" सायलीने विचारलं.
"नवीन नाती बनवण्यासाठी जुनी नाती तोडायची नसतात...."
सायली त्याच्याकडे बघतच राहिली.
◆◆◆◆◆
"सायली आज तू नसतीस ना, याने मार खाल्ला असता."
"सोड! पप्पाने अजून खूप काही बघितलं असेल. हा तर फक्त एक धक्का होता. बदलाची सुरुवात."
"म्हणजे? मला नाही कळलं."
"मला पप्पाच्या आयुष्यातल्या सगळ्या व्यक्तींना भेटायचंय. सगळ्या. मला पप्पाच्या आयुष्याचा शोध घ्यायचाय."
"म्हणजे तू आता दहावीपर्यंत पोहीचलीस. बरोबर?"
"येस."
"मग पुढच्या शोधासाठी तुला नाशिकला जावं लागेल."
"म्हणजे?" सायली त्याच्याकडे बघतच राहिली.
"म्हणजे काय. काका पदवीपर्यंत नाशिकला होते."
"नाशिकला?"
"हो. भोसला मिलिटरी कॉलेज."
"अरे देवा... आता तिथे जाऊ? पण तिथे पप्पाच्या ओळखीचं कुणी असेल?"
"सगळं कॉलेज. पण काकांच्या कॉलेजच्या दिवसातला एकच माणूस तुला भेटू शकेल.
कोण?"
"जोशी मास्तर!"

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग छोटा झाला याची जाणीव आहे. आज प्रचंड गडबडीत हा भाग लिहिला.
पुढील भाग मोठा लिहिण्याचा प्रयत्न करेन! धन्यवाद!

मस्तच!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....!

भाग छोटा आहे.... पण नेहमीप्रमाणे छान आहे.. मला तर बेफिकीरजी यांच्या बरोबरच तुमचे लेखन आवडतेय.....

@मृणाली - बघुयात पुढे काय होतं. धन्यवाद Happy
@मेघा - धन्यवाद! होप पुढच्या सोमवारी जास्त वेळ मिळेल.
@गार्गी - धन्यवाद आणि तुम्ही आठवण केली, म्हणून भाग पटापट लिहिला गेला.
@लावण्या - धन्यवाद
@मन्या - धन्यवाद
@च्यवनप्राश - धन्यवाद

पण, काकांनी तुला मारलं तर असेलच ना तेव्हा?"
"मारलं? माझा जीव घेईल असं वाटलं मला..."
"मग?"
"त्याने तसं काहीच केलं नाही. फक्त एक वाक्य म्हणाला. आणि घरी निघून गेला."
"कोणतं वाक्य?" सायलीने विचारलं.
"नवीन नाती बनवण्यासाठी जुनी नाती तोडायची नसतात...."
सायली त्याच्याकडे बघतच राहिली.

>>>> हे कोण कुणाला बोललं ???

आता नाशिकला काय होतय याची उत्सुकता!

म्हणजे याच आठवड्यात टाकेन.
Happy >>> मला वाटले की पुढच्या डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल की काय..! :S
लवकर आणि मोठा भाग टाकावा. Happy
Now be happy >>> हो Lol