जिवन

Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 12:42

*जिवन*
उंच आकाशी उडताना
माझे पंख का घाबरले ?

थकले असेल मन त्याचे
जुनाट झाले शरीर त्याचे
केले असतील वार पंखावर
ओले असतील घाव शरीरावर
सहन झाला नसेल उन्हाचा पारा
सहन झाला नसेल पावसाच्या धारा
सहन झाला नसेल गारठ्याचा वारा
दुःख सहन करता करता
संपणार सारे आयुष्य
आयुष्याच्या शेवटी मिळणार
जिवनाचे खरे रहस्य..........

विनोद इखनकर
(शब्दप्रेम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users