कुठे तरी चुकतोय मी

Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 12:38

कुठे तरी चुकतोय मी

कुठे तरी बसावं असं वाटतं
पण कुठे बसलच जात नाही
कुठे तरी जावं असं वाटतं
पण चालच जात नाही
मनातील विचार कुणाला तरी सांगावं वाटतं
पण कुणी ऐकतच नाही
म्हणून असं वाटतं की,
कुठे तरी चुकतोय मी

प्रेमाच्या दुनियेत नवीनच पाऊल टाकलंय कि काय
कुणी प्रेमाने बोलत सुद्धा नाही
माझा चेहरा नकोसा झालाय कि काय कुणाला
कुणी माझ्याशी हसत सुद्धा नाही
म्हणून असं वाटतं की,
कुठे तरी चुकतोय मी

मोकळा श्वास घेणं सुद्धा कठीण झाले
थकलेल्या या मनाला
कुणी चिंता करू नकोस असं सुद्धा म्हणत नाही
म्हणून असं वाटतं की,
कुठे तरी चुकतोय मी

काय लिहू तुला काही लिहिलेच जात नाही
काय बोलू तुझ्याशी काही बोलेच जात नाही
शब्द संपले कि कलमातील शाई
मला पडलेले एक कोडं च उलगडत नाही
म्हणूनच असं वाटतंय
कुठे तरी चुकतोय मी

कवी - विनोद इखणकर
(शब्दप्रेम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users