आर्जव

Submitted by निखिल मोडक on 11 December, 2020 - 13:04

बोल गं काहीतरी बोल काहीतरी कळेलसे बोल
हृदयातले जळणारे उसासे विझेलसे काही बोल

सोड सखे सोड गं तुझे छळणारे कचपाश सैल
दाटल्या काळोखातून दिसू दे नक्षत्रगणांचे पैल

उकल सखे उकल तुझे अधर, होऊदे काही उकल
युग युगांतरीच्या कोड्याने माझी जन्मांतरे विकल

देई गं देई मजला तुझ्या हृदयातली जागा अमल
एकदा तरी रिझवण्याचे बहाणे होऊ देई सफल

©निखिल मोडक

Group content visibility: 
Public - accessible to all site users