सावलीचे वजन

Submitted by उमेश दत्तात्रय ... on 9 December, 2020 - 06:40

सावलीचे वजन

दिवसाचा उजेड असो वा रात्रीचा अंधार,
तुझ अस्तित्व अजरामर हाच तुझा आधार

प्रश्न पडावा तशी पडतेस तू,
उत्तराप्रमाणे नकळत वाटेने रोजरोज सापडतेस तू

तुझी भेट दुर्मिळ असते
असे वाटसरुंना वाटते,
पण तुझी एक दिवसाची भेट 
ही त्यांच्या त्या दिवसाची शिदोरी ठरते

जन्माला आली तू अस्तित्वाचा दिवा झाली,
पहिल्याच दिवशी तू समाधानाचा शिक्का झाली

सहज उजेडात पाहिल अर्धवट आहेस तू,
अर्धवट असून किती सुंदर दिसतेस तू

जमिनीला पडलेल्या भेगा ऐन दुपारी तुझी वाट पाहतात,
गुरे,पाखरे तुझ्या छायेची आस धरतात

उन्हात तुझ्यासोबत चालावे,
प्रश्न असा पडावा,की तुझे वजन किती असावे?

दिवसाप्रमाणे रात्र ही अगदी नवीन नसते,
अंधारापेक्षा रखरखत्या उन्हात तू हवीहवीशी वाटते

तुलाही आराम मिळावा,तुझे म्हणणेही ऐकावे,
तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न असा पडावा की तुझे वजन किती असावे?

रामायणातले लंकादहन असावे,
महाभारतातील गीता असावी,
प्रश्न असा पडावा,की तुझे वजन किती असावे?
पण हा उन्हातली सावली जरूर असावी

कोण कोणाचे नसावे,ढग आकाशांचे नसावे,
अश्रू डोळ्यांचे नसावे,
फक्त एवढेच उमगले जावे की
'सावलीचे वजन' किती असावे?

तुझे आणि उन्हाचे हे गुपित
नको वाटाड्याला सांगू,
सावलीचे वजन किती हे पुन्हा पुन्हा रंगू

उमेश दत्तात्रय पोपळघट

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults