आज जेवायला काय करू?

Submitted by Admin-team on 5 December, 2020 - 14:17

मस्तच!!! लै उपयोगी.
"वाल टॅब" मध्ये घेवडा पण आहे! ( घेवडा भाजी टीपेत अशी भाजी वालपापडीची करा दिलेले आहे म्हणून घेवडा-वाल एकच संयुक्त टॅब सयुक्तिक आहे. पण जिच्याकडे घेवडा उरला तर आता तिला मायबोलीवर वाल टॅब वापरायचा ते कसं कळणार?? )

हे छान केलंय admin team!
मूळ संकलनाकरीता अवलदीचे पुन्हा एकदा धन्यवाद.

हे छान केलंय admin team!
मूळ संकलनाकरीता अवलदीचे पुन्हा एकदा धन्यवाद.>>>>>+१.

सीमंतिनी,
Lol

आहे ते तर फिक्स करू दे आधी, मग वांग . दह्यातले पिठलं मेथी टॅब मध्ये आहे आणि त्यात वापरला आहे पालक.
(अ‍ॅडमिन टीम, मी खिटखिट करते वाटलं तर सांगा तसं. गप बसेल, तशी गुणाची आहे बरं मी. Wink Happy मदत हवी असेल तर तसं ही सांगा, नाताळच्या सुटीत सर्व त्रुटी तपासून देवू शकते.)

धन्यवाद @सीमंतिनी , वालाच्या टॅब मधून घेवडा काढला आहे. ती एकच पाककृती होती. दह्यातले पिठलं यातून मेथी काढली आहे. मूळ लेखकाने या सगळ्या शब्दखुणा दिल्या आहेत त्या ९०% वेळेस बरोबर आहेत. अजून काही राहिलं असेल तर इथेच सांगा.
@BLACKCAT इतर भाज्या येत आहेत , थोडी कळ काढा.

तंदूरी गोभी मध्ये फ्लॉवर आहे ते कोबी टॅब मध्ये गेले आहे. (म्हणजे फ्लॉवर मध्ये आहे पण कोबी मध्ये पण आहे! लेखक म्हणतो 'फुलकोबी' पण टॅब आहे 'कोबी')

धन्यवाद.
अजून एक शेवटचे - बटाटा मध्ये दिनेश. यांच्या अनेक पाककृती आहेत पण त्यांनी काढून टाकल्याने क्ष दिसत आहे. ही विनंती खरं तर दिनेश. यांना की- टाका त्या पाककृती परत. प्री-कोव्हीड मधलं झालं गेलं विसरता आलं तर बघा. अजूनही कुठे कुठे लॉकडाऊन आहे. लोक्स करोनाकाळात खातील जरा चांगलं काही.
(पालकं इ मध्ये पण तुमच्या पाककृती आहेत. तसलं पौष्टीक नाही टाकलत परत तरी चालेल Wink Lol बटाटे इ चमचमीत टाका.)

'वांग्यावर' काम सुरू आहे का अजून? काही पाककृती दिसत नाहीत.
का फक्त शब्दखुणांत 'वांगी' लिहिले असेल तरच दिसेल?

@प्राची, होय काम सुरु आहे कारण सगळ्या शब्दखुणा सारख्या नाहीत. त्यामुळे त्याचे प्रमाणीकरण होण्यात थोडा वेळ लागेल. पण सगळे एकदम संपूर्ण होईपर्यंत थांबण्यापेक्षा जसे जमेल तश्या पाककृती सुविधांमधे देत आहोत. एखादी भाजी/पाककृती तुमच्या साठी लवकर हवी असेल तर इथे कळवा.

शेपू इ टॅब वाढणार असतील तर ते वर्णमालेनुसार (अल्फाबेटीकली) करता येतील का? म्हणजे शेपू तळाकडे जाईल आणि कुणाला वाईटही वाटणार नाही...... Wink Happy

मिश्र भाज्यांचाही एक गट असावा.
म्हणजे २-३ किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या वापरून केलेले सूप, पराठे, भाजी, रस्साभाजी यांची पाककृती शोधायला सोपे होईल.