उद्योग

Submitted by द्वैत on 3 December, 2020 - 12:25

उद्योग

शिल्प घडवावे वाटते
दगडाला ठोकून ठाकून
मग बोली लावावी त्याची
माणसाचे रक्त फासून

सजीवतेच्या त्याची मग
खूप वाहवा होईल
चार दमड्या मोबदल्यात
कुणीतरी नक्की देईल

विकत घ्यावा त्यातूनही
पुन्हा एक दगड नवा
इंद्रियांच्या लालसेला
काहीतरी उद्योग हवा

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !