तृषार्थ तो

Submitted by दिनेशG on 26 November, 2020 - 17:06

तो तृषार्थ तगमगलेला
चिंब ओल्या शब्दांसाठी
खोल गहिऱ्या स्पर्शासाठी
नजरेतल्या ओळखीसाठी

तो पावले टाकीत राहिला
सावलीच्या शोधासाठी
रीती झोळी भरण्यासाठी
एका मोकळ्या श्वासासाठी

तो संचिताचा उत्तरदायी
ओझे हेच वाहण्यासाठी
डोह पार हा करण्यासाठी
जे आहे ते तुज देण्यासाठी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान