थांबा

Submitted by निखिल मोडक on 25 November, 2020 - 05:49

वसले डोंगर नदी काठावर
लेवूनी निळसर भरजरी अंबर
खिडकीतूनी थांब्याच्या दूरवर
नदी थांबली दिसे वळणावर

तिथेच तू पण मधले अंतर
व्यापुनी आहे जरी निरंतर
आयुष्याच्या निज वाटेवर
विसाव्याचे हे क्षण पळभर

खिडकीतूनी थांब्याच्या दूरवर
नदी थांबली दिसे वळणावर

आता ठेवुनी तसेच अंतर
वाहत जाऊ पुढे समांतर
जसे नदीचे दोन्ही तीर
अन विसावलेले त्यावर डोंगर

खिडकीतूनी थांब्याच्या दूरवर
नदी थांबली दिसे वळणावर

Group content visibility: 
Use group defaults