एकमेवाद्वितिय

Submitted by सामो on 24 November, 2020 - 07:54

आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावरती त्याच ऐकलेल्या गाण्याचा, कवितेचा कसा वेगळा अर्थ समजुन येतो पहा.'रुपर्ट होम्स' यांचे 'पिनॅकोलाडा' गाणेच घ्याना. या गाण्यातील प्रसंग आधी सांगते. अवीट चालीचे गाणे आहे. त्यामधील कविताही खूप गोड आहे. सहजीवनाचा वेगळाच पैलू मोठ्या मिष्किलपणे उलगडून दाखवते.

गाण्याची सुरुवातच होते ती एका नवरोजींच्या तक्रारीने. की आमच्या लग्नाला बरीच वर्षे झालेली आहेत आणि आता आम्हाला एकमेकांचा किंचीत म्हणजे तीळभर कंटाळाच येउ लागलेला आहे म्हणा ना. जणू काही एकच कॅसेट मग ती कितीही मधुर असेना, परत परत ऐकल्यावर, तिच्यातली कशी मजा जाते तसे काहीसे. आणि म्हणुन ...
हा गीतनायक काय करतो, तर पत्नी झोपलेली आहे याची खातरजमा करुन घेतो व पेपरात एक 'निनावी' जाहीरात टाकून देतो.
I was tired of my lady
We'd been together too long
Like a worn out recording
Of a favorite song
So while she lay there sleeping
I read the paper in bed
And in the personal columns
There was this letter I read
.

"If you like piña coladas
And getting caught in the rain
If you're not into yoga
If you have half a brain
If you like making love at midnight
In the dunes on the cape
Then I'm the love that you've looked for
Write to me, and escape"
.
की अमुक एक गोष्टींमध्ये तुम्हाला रस असेल तर मला भेटा. न जाणो आपल्या तारा जुळतीलही. आपण भेटू , आपले ऑप्शन्स एक्स्प्लोअर करु. आता या जाहीरातीत नमूद केलेल्या गोष्टी देखील कशा तर अगदी साध्या साध्या, रोजच्या जीवनातल्या. त्यांची तो एक यादीच बनवतो.
त्याला थोडी गुन्हेगारीची भावनाही आहे बरं का. की आपल्या बायकोच्या नकळत आपण करतो ते बरे नव्हे असे एक मन म्हणते आहेच. तर ही आहे रस्सीखेच २ मनांमधली.
.

I didn't think about my lady
I know that sounds kind of mean
But me and my old lady
Had fallen into the same old dull routine
So I wrote to the paper
Took out a personal ad
And though I'm nobody's poet
I thought it wasn't half bad
.
सर्वच गाण्याचे बोल लिहीत नाही तुम्ही ऐकाच - https://www.youtube.com/watch?v=TazHNpt6OTo
.
पुढे काय होते तेही फोडत नाही.आधी ऐका मग वाचा. गाणं भारी गोड आहे.
सांगायची गोष्ट ही, की तीशीत जेव्हा मी हे गाणे ऐकले तेव्हा मला उलगडलेला अर्थ अगदी सरळ होता - हां त्याला, तिचा कंटाळा आलेला आहे व तो बाहेर मैत्री आणि हरवलेला चार्म शोधायचा प्रयत्न करत आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर होत असेल ब्वॉ असं. आणि तिने त्याला रंगेहाथ पकडले. यापलिकडे मला त्यात अर्थ दिसलेला नव्हता.
पण आता परत जेव्हा ते गाणे ऐकते तेव्हा मला वेगळा अर्थ लागतो. विवाहामध्ये नवरा बायको एकमेकांच्या मनानेही इतके निकट येतात, की जणु त्यांचा स्वभाव, आवडी-निवडी, विचार सर्व एकसारखेच होउन जातात. अनेक ५० शी पुढच्या सदस्यांनाही अनुभव असेलच की - आपल्याला अक्षरक्ष: जोडीदाराचे विचार वाचता येतात. शब्दांचीही गरज बरेचदा पडात नाही Happy आणि मग एका पॉईंटला अशी वेळ येते की - जिथे आपल्याबरोबर आपल्या जोडीदाराखेरीज अन्य कोणाचे तितके जमूच शकत नाही. अक्षरक्ष: एकात एक फिट बसणाऱ्या जिगसॉ पझलसारखे आपण अनुरुप बनून जातो. त्याला जे आवडते ती आपली आवड बनते, त्याला आवडत नाही ते आपल्यालाही आवडत नाही. म्हणजे आयुष्यभर जी अस्मिता जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो. अगदी युद्धपातळीवरती स्व जपण्याचा बाणा,आपण दाखवत असतो.तो कापरासारखा भुर्र झालेला असतो. आता त्याला जे आवडते तीच आपली आवड झालेली असते. ॲण्ड व्हाईसे व्हर्सा. आता हे उत्तम झाले की नाही हे प्रत्येकाने आपले आपण ठरवायचे. आणि मग होते काय आपल्या चेकलिस्टवरती उतरणारी एकमेव व्यक्ती आता सर्वांना पुरुन उरलेली असते ती आपलाच जोडीदार. Happy
खूप पदर आहेत या गाण्याला. जसा नवरा ती जाहीरात बायकोच्या नकळत पेपरात देतो तशी त्याची पत्नीही त्याच्या नकळतच त्या जाहीरातीला प्रतिसाद देते. आता हे ती त्याला धडा शिकवण्याकरता मुद्दाम करते की तीदेखील 'एस्केप' शोधत असते ते परत गीतकाराने तुमच्या इन्टरप्रिटेशनवरती, सोडलेले आहे आणि तीच गंमत आहे.
महामिष्किल, खट्याळ गाणे आहे. सर्वांनीच जरुर ऐकावे असे. तुमचे इन्टरप्रिटेशनही मांडा. अजुन अशी खट्याळ गाणी सुचवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान . इंग्रजी गाणी अजिबात समजत नसल्यामुळे त्यांच्या वाटेला गेलेले नाही .. ( पुस्तकात तरी सरळ काय म्हणायचं आहे हे समजतं ) बरं एखाद्या गाण्याचा meaning गुगलवर शोधावा तर तोही धड मिळत नाही ... असं सोपं कोणी करून सांगितलं तर ऐकायची आवड लागू शकते ... कॅरी ऑन माय वेवर्ड सन आणि हीट ऑफ द मोमेन्ट आणखी एक अशी मोजून 2 - 3 च इंग्रजी गाणी मी ऐकलीत आणि ती आवडतात .. त्यांचे मी माझ्यापरीने अर्थ लावलेत पण ते अचूक आहेत का किंवा तेच गीतकाराला अभिप्रेत होते का माहीत नाही ... जे मी लावलेत तेच डोक्यात ठेवून ऐकते ...