मधुकण शोधताना

Submitted by दिनेशG on 23 November, 2020 - 21:08

मधुकण शोधताना मन झाले फुलपाखरी
गंध लेऊन गंधीत मी येथल्या फुलांपरी

ऊन पांघरे गारवा खुले आकाशाची कळी
मनी दाटला मारवा गुंफून अवीट ओळी

हिरवी लवती पाते म्हणती अबोध गाणी
का ऐकू येते मजला जोग्याची आर्त विराणी

दावी वाकुल्या सावली तळपे सूर्य मध्यानी
ओंजळ रितीच माझी  पण आकांक्षा अस्मानी

कडेकपारी झिरपली क्षितिजावरली लाली
कुणी एक तारा मला परतीची साद घाली

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults