देवमाणूस

Submitted by _गार्गी_ on 18 November, 2020 - 00:25

सत्य घटनेवर आधारित आहे.
वेगवान कथा मांडणी आहे. सर्व नवोदित कलाकारांचे अभिनय उत्तम.
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर!

Group content visibility: 
Use group defaults

डॉक्टर च्या चांगल्या वागणुकीमुळे गोंधळलेली डिंपल आपल्या परीने डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे मंजु येते आणि डॉक्टरांना तिच्या जमीनीच्या व्यवहाराचे साक्षीदार होण्याची विनंती करते. तेव्हा डॉक्टर तिला म्हणतो की त्याच्या दवाखान्यात प्रचंड गर्दी असते परंतु तिच्या मैत्रीसाठी ( Wink ) तो साक्षीदार व्हायला तयार आहे! डॉक्टरांचे मंजुसोबतचे वागणे बघून डिंपलची खात्री पटते की डॉक्टर बदलले नाहीत आणि बदलणार ही नाहीत.

मंजु टोण्याला आंघोळीचे महत्त्व समजावत असते तेव्हा तिला डॉक्टर दवाखाना बंद करून बाहेर जाताना दिसतात. ( आणि आपल्यालाही प्रश्न पडतो की हे नक्की कुठे निघाले) इकडे डॉक्टर बज्याची गाडी घेऊन सुरेशबापुंच्या ( मंजुची जमीन विकत घेणारे) शेतात पोहोचतात आणि त्यांना सांगतात की मंजुची जमीन डॉक्टर विकत घेणार होते पण मंजुने त्यांना जमीन तर दिली नाहीच पण त्यांची बदनामी सुध्दा केली ( आणि आपल्याला डॉक्टर बदलले नाहीत याचा प्रत्यय, याचा अनुभव येतो! Wink ) परंतु सुरेशबापुंना फक्त जमीनच महत्वाची असल्याने ते डॉक्टरांना धुडकावून लावतात. ( ईथे डॉक्टरांना नक्की वाटले असेल की बज्याला सोबत आणायला हवं होतं) . तेव्हा अपमानित डॉक्टर तिथून निघून जातो.

रात्री डॉक्टर विठ्ठलला सांगतो की तो कसा बदलला आहे, मंजुने त्याच्याशी कशी मैत्री केली आणि उद्या तो मंजुच्या जमिनीचा साक्षीदार म्हणून जाणार आहे. परंतु मंजु गाव सोडून जाणार ही अशुभाची चाहूल आहे आणि तसे होऊ नये म्हणून तो सहीच करणार नाही असेही तो विठ्ठलला सांगतो.
दुसऱ्या दिवशी सगळे जण जमिनीच्या व्यवहारासाठी निघालेले असतात. संजु सुरेशबापुंना फोन करतो . फोन वाजत असतो पण तो उचलण्यासाठी सुरेशबापुच तिथे नसतात.........

इथे वाचून मी काही भाग बघितले Happy विठ्ठल कोणाचा मुलगा आहे आणि तो मुका आहे का. डिंपल डॉक्टरकडे काय म्हणून काम करत असते. बजा कोण असतो डॉक्टरचा.
त्या आजीला मी बहुतेक त्यादिवशी होम स्वीट होम या चित्रपटात बघितले, हृषीकेश जोशीची आई असते. मंजूला या आधी मोलकरीण बाई मालिकेत बघितलंय. डॉक्टरलाही बघितलंय कशाततरी पण आठवत नाही.

चला हवामध्ये येऊन गेली ना ही टीम, तेच परत दाखवणार का.
डॉक्टरने बहुतेक सुरेशला मारून टाकले. कुदळ दाखवली आणि मग डॉक्टरचा चेहरा. डेंजर आहे डॉक्टर.

विठ्ठल कोणाचा मुलगा आहे आणि तो मुका आहे का. डिंपल डॉक्टरकडे काय म्हणून काम करत असते. बजा कोण असतो डॉक्टरचा.
त्या आजीला मी बहुतेक त्यादिवशी होम स्वीट होम या चित्रपटात बघितले, हृषीकेश जोशीची आई असते. मंजूला या आधी मोलकरीण बाई मालिकेत बघितलंय. डॉक्टरलाही बघितलंय कशाततरी पण आठवत नाही >>>> विठ्ठल अनाथ असतो. त्याला बोलता आणि ऐकता येत नाही. डिंपल डॉक्टर कडे मदतनीस म्हणून काम करते पण तिला डॉक्टरचा खरा चेहरा माहित असतो. डॉक्टर कोणतेही वाईट काम डिंपल च्या मदतीने करत असतो. बज्या डॉक्टरांना खूप मानत असतो ( डॉक्टरने त्याच्या आईला जिवंत केलेले असते.) तो डॉक्टरांविरूद्ध काहीही ऐकून घेत नसतो. मंजु छोटी मालकीण मधे होती नायिकेची वहिनी. Happy

@गार्गी - Thanks for update Happy
(माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इतके मोठे अपडेट टाकतात, खूप खूप आभार!)

माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इतके मोठे अपडेट टाकतात, खूप खूप आभार! >>>> Happy मलाही तुमच्यामुळे लिहीण्याचा हुरूप येतो! तुमचेही खूप धन्यवाद!!! Happy

मंजु आणि अमर ( तिचा नवरा) तयार होऊन संजयची वाट पाहत असतात. संजु तिथे येतो आणि सुरेशबापुंना फोन करतो. तेव्हा ते तिकडेच येण्यासाठी निघालेले असतात. डिंपल आणि बाबू दादाही व्यवहाराचे साक्षीदार होणार असतात . निघण्यासाठी डिंपल डॉक्टरांना फोन करते तेव्हा डॉक्टर तिला सांगतो की तो काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आला आहे.

सुरेशबापु व्यवहारासाठीचे पैसे मोजत असतात तेवढ्यात तिथे डॉक्टर येतो आणि पुन्हा सुरेशबापुंनी त्या जमिनीचा नाद सोडावा असे त्यांना सांगतो. ( समजावनीच्या सुरात Wink ) पण सुरेशबापु डॉक्टर चे काहीही ऐकून घेत नाहीत. हे बघून डॉक्टर सुरेशबापुंच्या डोक्यात कुर्हाड घालून त्यांना संपवतो आणि त्यांचा मृतदेह कोंबड्यांच्या खुराड्यात टाकतो.
ईकडे मंजु डॉक्टर ची वाट पाहत बसलेली असते आणि सुरेशबापुही अजुन आलेले नसतात त्यामुळे मंजु चांगलीच वैतागलेली असते.

थोड्या वेळाने डॉक्टर ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचतो. ( तोंडावर उडालेले रक्ताचे शिंतोडे धूवून) . डॉक्टर आले तरी समोरच्या पार्टीचा काही पत्ता नाही हे बघून कंटाळून सगळे निघून जातात. डॉक्टरांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी डिंपलला त्यांच्या पायावर पडलेला रक्ताचा डाग दिसतोच.
समोरच्या पार्टीने धोका दिलाय असे समजून मंजु डॉक्टरांना घेऊन पोलीस ठाण्यात जाते.

गेले तीन दिवस या सिरियलचे कलाकार चहाद्या मधे आले होते.. याच सिरियलचं विडंबन स्कीट चहाद्याने केलं होतं. हसुन हसुन मुरकुंडी वळाली Rofl

कालच्या भागात काहीही नविन नव्हते.
बाबुराव आणि मंगल पैश्यांबद्दल बोलत असतात तेवढ्यात तिथे डिंपल येते आणि डॉक्टरांकडून घेतलेले पैसे मंगलला देते हे बघून बाबु आणि मंगल दोघेही खुष होतात.
मंजु काल डॉक्टरांच्या गाडीवरून वाड्यात आली हे बघून टोन्या चिडलेला असतो. आज ती डॉक्टरांच्या गाडीवरून वाड्यात नाही आली ना हे तो मुलांना विचारत असतो तेवढ्यात मंजु मुलांना नविन कविता शिकवू लागते. ( हि फक्त कविताच शिकवते. Angry )
तेव्हा तिथे डॉक्टर येऊन बसतात. मंजु त्यांना तिथून निघून जाण्यास सांगते पण डॉक्टर तिला सांगतात की त्यांनी आजपासून ट्युशन जॉईन केलीये. मंजुला यावर काहीही बोलता येत नाही.
मंजु मुलांना प्रश्न विचारतो असते तेव्हा ती डॉक्टरांना ही विचारते. डॉक्टरांना प्रश्नाचे उत्तर येत नाही तेव्हा सगळी मुले त्यांना शिक्षा करण्याचा हट्ट करतात. तेव्हा मंजु डॉक्टरांना छडीने मारते . डॉक्टर तो हात कितीतरी वेळ हातात घेऊन बसतात.
नाम्या वाणसामान घेऊन वाड्यात येतो आणि डॉक्टरांना तिथे बसलेला पाहून तोही बसतो. ते पाहून मंजु त्याला तिथून हाकलून लावते. हे सगळे मगाचपासुन बघत असलेल्या डिंपल ला मात्र डॉक्टरांचा राग येत असतो.
डॉक्टर दवाखान्यात परत आल्यानंतर मंजु तिथे येते आणि डॉक्टरांनी उद्यापासून ट्युशनमधे येऊ नये अशी विनंती करते. तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की ते टोन्यासाठी हे करत आहेत.
रात्री डिंपल डॉक्टरांच्या खोलीत येते आणि मंजुपासुन लांब राहण्याचा सल्ला देते.

खरे तर मला वेळच नाही मिळत आहे मालिका बघायला. कारण exams आणि ते ही proctored!!
आता पुढचा अपडेट exams झाल्यानंतरच टाकेन. Happy

I can totally understand!
(and relate too). Lol
Wish you all the best for exams!!

Wish you all the best for exams!! >>> Thank you! This means a lot to me. Happy

डॉ. अजितने मंजूच्या जमिनीबद्दल ज्या अफवा पसरवल्या त्याचा संजूला सुगावा लागल्याचं कळतं. अजित संजूचा खून करुन त्याला खड्ड्यात पुरायला जात असताना तिथे सरु आज्जी येते. सरु आज्जीचं येणं आणि निघून जाणं अजितला संशयास्पद वाटू लागतं. सरु आज्जीला खरंच दिसतं का..तिने काही पाहिलंय का हे त्याला कळत नाही.

सरु आज्जी सुद्धा वाड्यामागे काहीतरी पुरलंय याबद्दल बोलू लागते. मी पाहिलंय असं सांगते. पोलिसांना बोलवण्यापर्यंत प्रकरण जातं. अजितला सरु आज्जी आता डोईजड झालेय असं वाटू लागतं. तो सरु आज्जीचा काटा काढायचं ठरवतो.

कोणीच बघत नाही का. शेवट जवळ आलाय. एव्हडी माठ पोलीस बाई असते का. त्यापेक्षा सरूआज्जीला घ्या पोलिसात. पोलीस बाई आज म्हणतात की मी कायद्याच्या बाहेर काहीच करत नाही, त्या डॉकला येता जाता सगळी माहिती पुरवत असते, ते कुठल्या कायद्यात बसतं Angry माठ कुणीकडची, त्यापेक्षा तो देखणा पोलीस परवडला, काहीतरी लॉजिकल बोलतो.

राजू सावंत दिग्दर्शक असूनही ही सीरियल रात्रीस खेळ चाले सारखी उंची गाठू शकली नाही याचच आश्चर्य वाटतं.

सीरियल ची हिरोईन सरु आज्जी च वाटते इतक्या बाकीच्या व्यक्तिरेखा ढेपाळल्या आहेत. आजीच्या व्यक्तिरेखेचा काहीही अभ्यास नाही (नुसत्या सातारी गावरान शिव्या दिल्या म्हणजे झालं असं नाही त्याही त्या कलाकार बाईंना ठसक्यात देता येत नाहीत..) कथा, पटकथा, व्यक्तिरेखा, वेशभूषा, वाडा सगळंच सुमार दर्जाच आहे हे बघताना जाणवतं.

वाई सारख्या निसर्गरम्य ठिकाणचं शूटिंग असूनही नाही म्हणायला महाबळेश्वरला एकदा ओढून ताणून आऊटडोअर शूटिंग केलं तेवढंच.. गाजलेला खून खटला असूनही अगदीच बाळबोध पणे कथानक पुढं सरकत आहे.. रात्रीस खेळ चाले३ जोपर्यंत सुरू होत नाही तोवर देवमाणूस चा गाडा ओढायच काम सुरू आहे बाकी काही नाही.

डीजे अगदी बरोबर बोललात, बाळबोध म्हणजे काही विचारूच नका. पोलासांच्या माणसाने काढलेले चित्र डॉक्टर साध्या खोडराबराने खोडतो आणि त्यावर फेरफार करतो. खाडाखोड केल्याचं काहीच नामोनिशाण नाही Uhoh ती सिंग (नाव आठवत नाही तिचं) सकाळी छोटे कपडे घालून धावायला जाते त्यामागे काहीतरी कारण असेल असं मला वाटलं होतं, पण कसचं काय, तिची फिगर दाखवण्यापलीकडे काहीही उद्देश नव्हता. डॉक्टरला कोणीही चालते, फिगर असली काय नसली काय.
डिंपलने संजूचा मृतदेह कसा हलवला एकटीने. डॉक्टर तर किती वेळ खणत होता. डिम्पलने एवढं खणून जड संजूचा मृतदेह एकटीने दुसरीकडे नेला यावर विश्वास बसत नाही. तसं विश्वसनीय काहीच नाहीये म्हणा. मुळात ती मृतदेह हाताळण्याइतकी सराईत गुन्हेगार असते का. तिची आई तर सतत तिच्या मागावर असते, मग ती हे उद्योग करते कधी.

Pages