Depression मधुन बाहेर येण्यासाठी काय करावे

Submitted by amulgirl001 on 14 November, 2020 - 05:08

आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कधीही भरून न निघाणार्या जखमेमुळे मनाला खुप ञास होतोय
तर त्यासाठी काय करावे.

Group content visibility: 
Use group defaults

सुख दु:ख मित्र मैत्रिणी हितचिंतक यांच्या बरोबर शेअर करा. बोलते व्हा! असे अनेक मानसतज्ञ सांगतात. ते आचरणात आणा.

लोकसत्ता मध्ये डॉ. अंजली जोशी यांनी या दोन लेखांमध्ये छान मार्गदर्शन केले आहे -

सायक्रोस्कोप : अपराधीपणाचं ओझं!
https://www.loksatta.com/chaturang-news/burden-of-feeling-guilty-psychro...

सायक्रोस्कोप : विस्मरणाची कला
https://www.loksatta.com/chaturang-news/art-of-forgetting-psychroscope-d...

लोकसत्तातील डॉ. अंजली जोशी यांची पूर्ण लेखमाला या लिंक वर उपलब्ध आहे -

https://www.loksatta.com/author/dr-anjali-joshi/

डॉक्टरांची मदत घ्या कटू आठवणींचे विस्मरण होउ शकते.
मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.

आवडीच्या गोष्टींची लिस्ट तयार करा व त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.मनाला आनंदी ठेवण्यासाठी आनंददायक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

माणसाच्या हातून चुका होतात. घोड चुकाही होतात. पण त्यावरून सतत स्वतः: ला दोष देत राहू नये. अनेक संधी - कदाचित वेगळ्या प्रकारच्या - येत राहतात आयुष्यात. त्यांच्यावर झडप घालण्यासाठी तयार ठेवा स्वतः: ला. एक मोठे काम फसले तरी अनेक छोटी छोटी कामे यशस्वी ठरण्यातही आनंद असतो. असेच क्षण आपल्याला सतत आनंदी राखतात.

मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते.

हे पूर्णतः निःसंशय सिध्द झालेले आहे?
अजुन सुद्धा किती तरी लोक आत्महत्या करतात निराशेतून.
आयुष्यात त्यांना काहीच आनंद वाटतं नाही.
आणि उपचार घेवून सुध्धा तो व्यक्ती ठीक होईल ह्याची शाश्वती खूपच कमी आहे.
हा मानसिक आहे आहे असे मला वाटत.
गोळ्या खावून असे लॉक उघडत नसतात.

>>>आणि उपचार घेवून सुध्धा तो व्यक्ती ठीक होईल ह्याची शाश्वती खूपच कमी आहे.
हा मानसिक आहे आहे असे मला वाटत.>>>> जगात शाश्वती म्हणजे गॅरंटी कशाचीच नसते, परंतु गरज असताना औषधे न घेणे म्हणजे स्वतःला त्रास व जवळच्या लोकांची साडेसाती.
>>>>गोळ्या खावून असे लॉक उघडत नसतात.>>> लॉक उघडतत- हे माझं वाक्यं नाहीये डॉक्टर पेरी(https://en.wikipedia.org/wiki/Bruce_D._Perry) नावाच्या मानसशास्त्राच्या अतिशय विद्वान व्यक्तीचे अभ्यासपूर्ण नीरीक्षण/मत आहे.

अमुलगर्ल,
परफेक्ट कुणीच नसते. निर्णय चुकतात, चुका होतात. काही वेळा दुरुस्तीची संधीही नाही मिळत. जी हानी झाली त्याबद्दल दु:ख , खेद वाटणे साहाजिक आहे पण त्यातच गुंतून पडू नका. स्वतःला माफ करायचा प्रयत्न करा. इतरांशी दयाळूपणे वागतो तसे स्वतःशी दयाळूपणे वागा. काळासोबत घावही हळूहळू भरुन येतील. विश्वासाने मन मोकळे करावे असे हक्काचे कुणी नसेल, आपल्याला समजून घेणार नाहीत, जज करतील असे वाटत असेल तर काउंसेलरची मदत घ्या.

>>उपचार घेवून सुध्धा तो व्यक्ती ठीक होईल ह्याची शाश्वती खूपच कमी आहे.>>
शारीरिक आजारांबाबतही उपचार घेवून सर्व ठीक ठाक होईल याची शाश्वती नेहमीच असते असे नाही. तरीही आपण उपचार घेतोच ना? ५०-५० चान्स असे डॉक्टरांनी सांगितल्यावर बरे व्हायच्या आशेने ऑपरेशनचा निर्णय घेतो तर मग मन आजारी असताना उपचारांबाबत इतका नकारात्मक दृष्टीकोन का? उच्च रक्तदाबासाठी उपाय म्हणून डॉक्टर रोज गोळी घ्यायला सांगतात तेव्हा तक्रार नसते. मनाच्या आजारासाठी मात्र दीर्घकाल औषध घ्यावे लागणार असेल तर नाराजी का? शारीरिक व्याधींबाबत जर का आजार आटोक्यात रहाण्यासाठी औषध हे मान्य करतो तर तसेच मानसिक व्याधीबाबत आजार आटोक्यात रहाण्यासाठी औषध हे का पटत नाही?

<< सुख दु:ख मित्र मैत्रिणी हितचिंतक यांच्या बरोबर शेअर करा. बोलते व्हा! असे अनेक मानसतज्ञ सांगतात. ते आचरणात आणा. >>

----- सहमत... लोकांशी बोलल्यावर त्यांनी पण कधीतरी मोठ्या घोडचूका केलेल्या असतात हे लक्षात येईल. चूक केली नाही, करणार नाही तर तो मनुष्य कसा?

मन रमवण्यासाठी आवडीच्या विषयातले वाचन, गाणे एकणे , पेंटिंग, लिखाण, कला.... असे काही छंद असतील तर त्याला थोडा अधिक वेळ द्या. आवड ( आसपास चा परिसर स्मुदाय यावर अवलंबून आहेस्कोप असेल) असेल गरजू लोकांना मदत करा.

हेमंतजी
>>>आणि उपचार घेवून सुध्धा तो व्यक्ती ठीक होईल ह्याची शाश्वती खूपच कमी आहे.>>>
त्या मदत मागत आहेत !!!!!!!

तज्ज्ञांना भेटा.. कुटुंबातील सदस्यांची व प्रियजनांची मदत घ्या. मोकळेपणाने बोला.
या मी गोळा केलेल्या टिप्स ... पटल्या नाही तर दुर्लक्ष करा.

१. Don't focus on anything else except for the 24 hours in front of you, and do what you can to get closer to where you want to be.

२. Most people barely know themselves,
So what does it matter what they think of you.
~ Jmstorm

३.Sometimes it takes an overwhelming breakdown to have an undeniable breakthrough.

४.Your diet is not only what you eat,
It is what you watch, what you listen to,
What you read, the people who surround you.
Be mindful of what and who you allow into your space, emotionally, spiritually and physically. Your environment influences your experience.

५.Do the things you used to talk about doing but never did. Know when to let go and when to hold on tight. Stop rushing. Don't be intimidated to say it like it is. Stop apologizing all the time. Learn to say no, so your yes has some oomph. Spend time with the friends who lift you up, and cut loose the ones who bring you down. Stop giving your power away. Be more concerned with being interested than being interesting. Be old enough to appreciate your freedom, and young enough to enjoy it.

६.One day you will realize that material things mean nothing. All that matters is the well being of the people in your life.

७.Sometimes the universe shows you what people from your past are doing now, so you can see how far you have grown. Those who were once a frequency match, are now energetically a million miles away. Evolution and truth is a beautiful thing.

८.We either make ourselves miserable or we make ourselves strong. The amount of work is the same.

९.Apocalypse (ἀποκάλυψις, apokálypsis) is a Greek word meaning "revelation", "an unveiling or unfolding of things not previously known and which could not be known apart from the unveiling".
the complete final destruction of the world, as described in the biblica book of Revelation.

शिवाय हे खास स्वक्षमेसाठी (हा शब्द आहे की नाही माहिती नाही. )
d05887ce56fb20fca88f4093b36176eb.jpg

**स्वतःला मनात असे बोलत राहू नका जे आपण जवळच्या मैत्रिणीला कधीही बोलणार नाही. प्रयत्न करा.

तुम्हाला शुभेच्छा. Happy

तुम्ही इथे मोघम सांगितलेय (सर्वकाही इथे सविस्तर सांगणे शक्य नाही, अपेक्षीतही नाही आणि advisable ही नाही) आम्ही मोघम उत्तरे देणार.
सकारात्मक विचार करा म्हणुन सांगु, चार सकारात्मक सुविचार सांगू.
तुम्हाला तुमचं मन पूर्ण उघडं करता येईल आणि तुम्हाला समजून घेईल अशा कुणाची गरज असेल, मार्गदर्शन करण्याची गरज असेल. चांगले समुपदेशक हे काम करू शकतील. सुरवातीला थोडे वैतागवणे वाटू शकते, काय ते सगळं त्यांना सांगायचे, नकोच त्या आठवणी वगैरे पण एकदा सुरवात केली की पुढचे सोपे जाईल. चांगल्या, अनुभवी समुपदेशकांची माहिती काढुन त्यांना भेटा.

रोते कायको हम, हे रोते कायको हम ?
होना है जो हो सॅड होते कायको हम ?
हां रातोकों ना सोते कायको ?

व्हाय व्हाय ऐसा व्हाय वैसा क्यूँ होता
युं होता तो क्या होता, जो होता है वो होता !
फ्लाय फ्लाय बेबी फ्लाय देखे आ उडके
देखे बादल से जुडके, देखे फिरना मुडके

चार पल का है, सांसो का किस्सा
कितना है हिस्सा इसंमे आसुओं का, सोच लो तुम
बचपन बिता एक, इक बुढासा पल
किसने देखा कल तो इस
पल कि किंमत जोड लो तुम
रोते कायको हम हे रोते कायको हम

आमच्या "झूटा हि सही" नावाच्या आवडत्या सिनेमातले गाणे. सिनेमा पण छान आहे, याच विषयावर आहे. मदत होवो न होवो, चार घटका करमणूक तर खासच होईल. वाटल्यास बघा.
https://youtu.be/VobHJuka-Wc

>> आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कधीही भरून न निघाणार्या जखमेमुळे मनाला खुप ञास होतोय

मानव यांच्या प्रतिक्रियेशी सहमत. मोघम माहितीवर नेमके उपाय मिळणे कठीण आहे.

अस्मिता व अन्य मायबोलीकरांनी अत्यंत चांगल्या प्रतिक्रीया वर लिहल्या आहेतच. याशिवाय अन्य एका धाग्यावर सुद्धा या विषयावरच तपशिलात चर्चा झाली आहेच. तेथील प्रतिक्रियांतून सुद्धा काही मार्गदर्शन मिळते का पहा.

परंतु नेमक्या उपायांसाठी घटना, परिस्थिती, पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. अन्यथा मोघम सल्ले निरुपयोगी ठरतील.
उदाहरणार्थ:
१/ मित्रांशी, नातेवाइकांशी, जवळच्या व्यक्तींशी बोला. मन मोकळे करा.
....आणि....
२/ भूतकाळाची आठवण होईल त्या सर्वापासून (नातेवाईक, मित्र, व्यक्ती, ठिकाणे) दूर व्हा. नवीन ठिकाण, नवीन ओळखी, नवीन जगात प्रवेश करा.

हे दोन विरुद्ध टोकाचे सल्ले आहेत. दोन्ही आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत पण ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लागू पडतील. म्हणून योग्य ते मानसोपचारतज्ज्ञ गाठून त्यांच्याशी सल्लामसलत केल्यास जास्त उपयोग होईल.

मित्र, नातेवाईक, जवळच्या व्यक्तींशी बोला हा उपाय उलटू शकतो. मानसिक आरोग्याबद्दल त्या व्यक्तीला पुरेशी कल्पना नसेल, तुमची समस्या समजत नसेल तर ती क्षुल्लक आहे, रिकामपणाचे चोचले आहेत, तुला काय धाड भरलीय, मागचं विसरून जा, नवं काही सुरू कर इ. सल्ले, दटावण्या, दमबाजी काहीही मिळू शकेल. सगळ्यांकडे कान असतोच असं नाही. बहुतेकांकडे नसतोच. नुसती तोंडचं असलेलेच जास्त.

<आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कधीही भरून न निघाणार्या जखमेमुळे मनाला खुप ञास होतोय> याला क्लोजर मिळणं आवश्यक आहे. मी तरी समुपदेशकाकडे जाण्याचेच सुचवेन.

जर आकलनशक्ती, विचारशक्ती चांगली असेल तर पुस्तके वाचून किंवा मानसोपचार तज्ज्ञांचे व्हिडियो इ पाहून स्वतःला मार्ग शोधता येऊ शकेल.

amulgirl001, तुम्हाला या वेदनांमधून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.
समुपदेशकाकडे गेल्याने वेदांनातून सुटका, आजचा दिवस चांगला जाणे आणि पुढच्या लढायांसाठी मनाची तयारी या गोष्टी लवकर होतील. रिकव्हरी प्रोसेस लवकर सुरू होईल.

###

@Sparkle,
वरच्या लोकसत्ताच्या लिंक बद्दल धन्यवाद.
मला स्वतःला एका गोष्टीचं क्लोजर मिळत नव्हतं, मिळण्याची काहीच शक्यता नाही, घटना, अपमान विसरता येत नाही, सोडूनही देता येत नाही असा त्रास होत होता.
लोकसत्ता मधला तो लेख वाचल्यावर एकदम काहीसं चमकलं. इतरांना ही वाक्य साधी वाटतील , पण मला खूप वेगळा ऍस्पेक्ट देऊन गेली.

"समीर विचार करतोय, की त्या घटनांचं स्मरण करून मी माझ्या कोंडमाऱ्याला वाट करून देत आहे. समीरनं जर या विचाराची छाननी केली तर त्याला कळेल की त्या घटनांचं स्मरण त्याचा कोंडमारा कमी न करता उलट सूड, राग अशा विघातक भावनांची पदास करत आहे. इतकंच नाही तर अशा प्रसंगांशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारा त्याचा आत्मविश्वासही खच्ची करत आहे."
तुमचे मनापासून आभार.

काही घटना विसरण्यासाठी काळ जाऊ द्यावा लागतो. मात्र तो काळ कसा घालवावा कुढत की आनंदाने हे आपल्या हातात आहे.

जवळची काही लोक अशीही असतात जे सतात तुमच्या चुका उगाळत बसतात. विसरुन जायचेय ठरवले तरी विसरु देत नाहीत. परत परत जखमेवरची खपली काढत रहातात. अशा लोकांपासून चार हात लांबच राहावे.

लोकसत्ता लेखमाला वाचत आहे .. अस्मिता छान सल्ला .

Amulgirl चुका या माणसांच्याच हातून होतात ... दुसऱ्याच्या चुकांना कठोर होऊन जज करणारे खूप असतात , तुम्ही कोणत्या मानसिक परिस्थितीतून गेला आहात किंवा जाता आहात याची त्यांना पुसटशीही कल्पना नसते .. एखाद्याची फक्त चूकच पाहून त्याच्यावर दोषी असा ठपका ठेवण्यात लोक क्षणभराचाही विलंब लावत नाहीत , ती चूक कोणत्या मानसिक - भावनिक परिस्थितीत झाली याची त्यांना कल्पना नसते ... तुमच्या आयुष्यात असे कोणी लोक असतीलच असं म्हणत नाहीये पण जर असले तर साफ दुर्लक्ष करता यायला हवं .

दुसरी गोष्ट स्वतःचंच मन खातं .. त्यासाठी विचार करा , आयुष्य फार लहान आहे .. आता 30 - 35 वर्षंच ऍक्टिव्ह असणार आहेत , एकदा म्हातारे झालो की मनात असलेल्या गोष्टी करता येणार नाहीत , काही साध्य करता येणार नाही .. गिल्टचं ओझं घेऊन आपल्याला आणखी किती दिवस चालायचं आहे हे स्वतःला स्पष्टपणे विचारावं .. आपल्याकडे एकच आयुष्य आहे , ते गिल्ट मध्ये फुकट घालवणार का .. हातात खूप जड पिशव्या असल्या तर मनमोकळेपणाने फिरता , धावता , चढता , उडी मारता काहीच करता येत नाही , रस्ता सपाट असेल तर धड चालता तरी येतं , जरा जरी खाचखळग्यांंचा असेल तर धडपडायला होतं ... आयुष्याचा स
रस्ता सपाट असेलच हे नक्की नाही ... त्यामुळे त्या पिशव्या खाली ठेवणं हाच शहाणपणा आहे ... आणि कसल्या पिशव्या आहेत त्या ? चक्क कचऱ्याच्या - अपराधीपणा , राग , अपमान , द्वेष , जेलसी .. सगळा सगळा कचरा आहे .. यातलं काहीही जपून ठेवण्याच्या योग्यतेचं नाही ... आपल्याला खूप चालायचं आहे , हुंदडायचं आहे , खूप काही शोधायचं , अनुभवायचं आहे या आयुष्यात ... त्या पिशव्या कॅरी करत राहिलं तर कसं करणार हे सगळं ? ..

लेखमाला वाचा तुम्हीही , सुंदर आहे .

मला स्वतःला एका गोष्टीचं क्लोजर मिळत नव्हतं, मिळण्याची काहीच शक्यता नाही, घटना, अपमान विसरता येत नाही, सोडूनही देता येत नाही असा त्रास होत होता.
लोकसत्ता मधला तो लेख वाचल्यावर एकदम काहीसं चमकलं. इतरांना ही वाक्य साधी वाटतील , पण मला खूप वेगळा ऍस्पेक्ट देऊन गेली.>>>>> मलाही
राधानिशा, छान वाटलं प्रतिसाद वाचून....

मित्र, नातेवाईक, जवळच्या व्यक्तींशी बोला हा उपाय उलटू शकतो. मानसिक आरोग्याबद्दल त्या व्यक्तीला पुरेशी कल्पना नसेल, तुमची समस्या समजत नसेल तर ती क्षुल्लक आहे, रिकामपणाचे चोचले आहेत, तुला काय धाड भरलीय, मागचं विसरून जा, नवं काही सुरू कर इ. सल्ले, दटावण्या, दमबाजी काहीही मिळू शकेल. सगळ्यांकडे कान असतोच असं नाही. बहुतेकांकडे नसतोच. नुसती तोंडचं असलेलेच जास्त.>> लाखमोलाचं बोललात

जवळची काही लोक अशीही असतात जे सतात तुमच्या चुका उगाळत बसतात. विसरुन जायचेय ठरवले तरी विसरु देत नाहीत. परत परत जखमेवरची खपली काढत रहातात. अशा लोकांपासून चार हात लांबच राहावे.

Submitted by सियोना>> +100

राधानिशा, तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद वाचून खूप छान वाटले.>>>>> +१.
धन्यवाद सामो,अतुल, राधानिशा.
मानवदादा यांच्या प्रतिसादाशी सहमत. वरचे सगळेच प्रतिसाद चांगले आहेत.
amulgirl , तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटो , आनंदी वाटो या शुभेच्छा.