बाप माझा...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 13 November, 2020 - 21:29

चाल:- ये बंधन तो...प्यार का बंधन है

बाप माझा ... घराला आधार ,
त्याच्यावरी ... उभा हा संसार ..,

करीतसे कष्ट अपार , नाही रात्र ना दुपार
आमुच्या जिवनावरती , किती आहेत त्याचे उपकार

रात्र आणि दिवस , होई कासाविस
मज सुख देतील पोर , मनी एकच असे आस
हि आस मनी ठेवुन , काम करीतो रात्रं दिन

सळसळत्या उन्हात , अन कष्टाच्या वनात
राबराब राबतो , नाही वाहन चरणात
सांडुनी स्वतःचे दुःख ,आम्हास देई तो सुख

उपकारांचा तु देव , किती आहेत तुझे उपकार
या बैमान दुनियेत , मला हावा तुझा आधार
धरुनी तुझा मी हात , करीन संकटी मात

मजला कशाचे दुःख , आई वडील मजला सुख
स्वर्गही नकोसे वाटे , पाठता तुमचे मुख
तुम्हीच माझे दैवत , नमवितो तुम्हा अनिकेत

आईवडिल माझे थोर , करितात कष्ट अपार
माझ्या या जिवनावरती , किती आहेत त्यांचे उपकार

- अनिकेत बालाजी येमेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users