भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण ओड्याला छळतो असा कधीकधी

त्याला म्हणतो मी जातो बाहेर,आणि मग मी आणि बुलेट आणि एक मांजर मिळून चिकन खाणार आणि आईस्क्रीम आणि मग गाडीवरून चक्कर

झालं एवढं वाक्य म्हणलं की तो इतका चवताळतो ना
त्याच्या आवडीनिवडी चे सगळे शब्द यात कोंबलेले असतात
मला तो अक्षरशः खाली लोळवतो उड्या मारून मारून Happy

मला तो अक्षरशः खाली लोळवतो उड्या मारून मारून Happy >>>> : हाहा: cute

आम्ही एक जुनी लीश (पपी असतानाची) एका सॉफ्ट toy dog ला लावुन ठेवली आहे. त्या toy ला ती prfect बसली आहे. आमच्या बिगलने हट्ट केला किंवा त्रास देत असेल तर आम्ही toy dog ला लिश पकडुन भुर नेण्याचं नाटक करतो, तेव्हा आमचा बिगु सुध्दा त्या soft toy dog बरोबर कुस्ती करून त्याला परत घरात आणतो. आणि आम्हाला विशिष्ट प्रकारे भुंकून रागवतो. मजा असते.

मी बिझी असले तर बाकी काही वाचत नाही, पण कितीही बिझी असले तरी इथली प्रत्येक पोस्ट वाचते. Stress buster.
प्रतिसाद दिले नाही तरी सगळ्यांचे लाडू आणि लाडल्या चांगलेच माहित आहेत. Loads of love, hugs n kisses to all the fur babies :heart:

आपण सगळ्या पुणे पालकांनी एक dog गटग करूया का? बोपदेव घाट, कात्रज किंवा मग माझ्या घरासमोरची आर्मीची टेकडी. हात वर करा बरं जरा.

आपण सगळ्या पुणे पालकांनी एक dog गटग करूया का? बोपदेव घाट, कात्रज किंवा मग माझ्या घरासमोरची आर्मीची टेकडी. हात वर करा बरं जरा.>> मी पण येइन

मुंबई भुभु गटग करायच असेल तर आय एम इन. ऑस्कर क्यूट आहे. ओडिन तर भारी आहे नेहमीच ..

तर हॅरीचा एक किस्सा

हॅरीचे मित्र मैत्रिणी कॉलोनीत आहेत .एक आहे बॉनी जो बिगल मेल आहे तर दुसरी आहे पर्ल जी गोल्डन रीत्रिव्हर फिमेल डॉग आहे. पर्ल ला पिरियडस आलेले मध्यंतरी.
तर हॅरी आणि बॉनि दोघेही देवदास बनलेले त्या काळात . चित्र विचित्र आवाज काढन, खाली जाऊया म्हणून हट्ट करणे, पर्ल ला जेव्हा तिचे पालक फिरवायला घेऊन यायचे तेव्हा मोठ्याने भुकुन घर डोक्यावर घेणे वगैरे प्रकार हॅरी करायचा Biggrin आणि माझा नवरा अजिबात ऐकायचा नाही त्याच्या विनवण्या.
तेव्हा मग तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय
मेरी जान का दुश्मन हाय हाय असा सीन पाहायला मिळायचा .. Proud Wink

आम्ही अक्षरशः हसत होतो की ह्याला कसली घाई लागलीय म्हणुन. खरंतर त्याला मेटींगला अजून एक वर्ष आहे डॉक्टरच्या मते. पण हॅरी साहेब फुल दिवाणे मोडात होते त्या काळात ...

आपण सगळ्या पुणे पालकांनी एक dog गटग करूया का? बोपदेव घाट, कात्रज किंवा मग माझ्या घरासमोरची आर्मीची टेकडी. हात वर करा बरं जरा.>>>
चालेल की
तिकडे भुभ्याना मोकळे खेळता येईल मस्त

तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय
मेरी जान का दुश्मन हाय हाय असा सीन >>> Lol डोळ्यासमोर आला सीन!
भुभू गटग ला कसली मज्जा येईल! फोटो मस्ट आहे केलेत तर.

अरे वा, तुमचा सगळ्यांचा उत्साह बघुन मस्त वाटलं. एका शनिवारी किंवा रविवारी करू. आता इतक्यात बोपदेव घाट नको, गवत अतिशय उंच वाढलं आहे, या पोरांनी excite होवुन धावाधाव केली तर सापडणार नाहीत. त्यापेक्षा सगळ्यांना जवळ पडेल म्हणुन पुण्यात (कॅम्प जवळ) एक अर्मीची टेकडी आहे, तिथे भेटू. आता तर मस्त हिरवीगार झाली आहे. सगळ्या पोरांना बागडायला मजा येईल. आशुचॅम्प आपण FB friends आहोत, मी तुम्हाला डिटेल्स मेसेंजर वर लिहु का?

अमा, तुम्ही पुण्यात माझ्याकडे राहु शकता. मला अतिशय आवडेल. सगळ्यांना एकत्र टेकडीवर जायलाही सोयीचं होईल.

हो मैत्रेयी, हे गटग खरोखर झालं, तर चिक्कार फोटो काढू. मला मोबाईल फोन वरून फोटो टाकायला काही तांत्रिक अडचण आहे, नाही तर तेकडीचे फोटो शेअर केले असते.

जाई, तु पण प्रयत्न कर ना. अमा आणि तू बरोबर येऊ शकाल.

जाई, तु पण प्रयत्न कर ना. अमा आणि तू बरोबर येऊ शकाल.>> टेक्सी करू किंवा वंदना वरून एस्टी. शोधून ठेवते. मला जेन्युइनली काहीही सोशल लाइफ नाही त्यामुळे ही एक नवीच भुंकणारी कळी उमलली आहे.

पाउस पाणी सण वार बघून काय ते करा. मी काय चोविस्तास रिकामीच आहे. मीरा धन्यवाद. इगली बिगली पू.

आशुचॅम्प आपण FB friends आहोत, मी तुम्हाला डिटेल्स मेसेंजर वर लिहु का?>>

हो चालेल की

टेक्सी करू किंवा वंदना वरून एस्टी. शोधून ठेवते.>>>
वेलकम Happy

माझ्या लेकीला इथले फोटो बघून सगळे आधीच ओळखीचे झालेत,so आम्ही पेट नसलेले हौशी मंडळी चालत असेल तर आवडेल, सगळ्यांना भेटायला

>>>>>>>>>पुण्यात (कॅम्प जवळ) एक अर्मीची टेकडी आहे, तिथे भेटू.
नेताजी नगरची टेकडी?
माझी बालपणीची सखी आहे ती. घट्ट मैत्रिण Happy

OMG.... हे गटग खरंच ठरतं आहे. I am so excited.
अमा, thank you. Thank you. तुमचा उत्साह आणि तुमची भुंकरी कळी कायम अशीच राहु दे.
आशु, आज रात्री फोन नंबर आणि बाकी डिटेल्स लिहिते.
तेजो, हे काय विचारणं झालं. Most welcome. एकदा आलीस की परत परत येशील, म्हणजे तुझी लेक तुला खेचुन आणेल. मी तुला contact कसं करू. माझी माबो Gmail कधीच वापरली नाही, त्यामुळे माबो संपर्क वर लिहु शकत नाही. प्लीज येच.

सामो, नाही नेताजी नगर नाही. आणि तिथली टेकडी आता अस्तित्वात नसल्यासारखी आहे. अर्धं construction आणि अर्धा भाग कुंपणाने बंद. माझी टेकडी awesome आहे. नंतर फोटोत पाहशील. Happy

अरे वा , भु भु गटग ठरतंय का ? आम्ही आलो तर चालेल का ? पेट नाहीयेत आमच्याकडे , पण मुलीला जाम आवडतात सगळी इथली पेटस.

अरे वा मस्त प्लानिन्ग चालू आहे.

बरेच दिवस स्वीटीची नखे कापणे पेंडिंग होते. आता हा मेजर इशू का होतो. तर मी भटक्या कुत्र्यांचे पाहिले त्यांची नखे इतकी वाढत नाहीत. पण हिची तीन महिन्यात पार गोल गोल होउन आतल्या पॅडला टोचण्या इतकी वाढतात. एप्रिल मध्ये नेले होते. मग काम आमची व्यवधाने ह्यात राहुनच गेले. परवाच्या शुक्रवारी हिला घेउन गेले अशीच विदाउट अपॉइन्ट मेंट तर क्लीनिक बंद. व्हेटी बाई बाहेर गावी गेलेली. मग चुपचाप घरी आलो.

आटोवाल्याने मदत करायचा प्रयत्न केला जिम के सामने एक क्लिनिक आहे म्हणे बघितले तर हे जिम फारच हाय टेक व आत कुठे तरी कोपर्‍याद दाखवले. ते काही मला फार विश्वासार्ह वाटले नाही. आल्यावर व्हेटीला मेसेज केला तर तिने आज पहिले साडेआठाची अपॉइन्ट मेंट दिली. आता मी म्हणजे रोज साडे आठ ऑन दडॉट झोपुन टाकते. पन क्या करते. आपलीच नखे वाढली आहेत. पण मग तिने साडे सहाला बोलावले.

लगेच गेलो तिथे एक प्रेमळ दादा होता त्याने तिला धरले व दहा मिनिटात काम झाले. व्हेटी बिचारी एका किटन ला कुठे तरी प्लेस करायच्या धांदलीत होती. मग लगेच तिने चॉकोलेट फ्लेवर्ड डीव्रमिन्ग गोळी, सिंपारिका स्किन साठी, दर पाच दिवसांनी आंघोळ घाला वगैरे सूचना दिल्या
हिला तर आंघोळ आजिबातच आव्ड्त नाही.

सांधेदुखी साठी पण औषध दिले आहे.

आता घरी दोघींच्या औषधांचे कप्पे झाले आहेत. व पाव डर. ओटमिल च्या वासाच्या सूदिन्ग वाइप्स व्गैरे पण इथे तिथे पसरले आहे.

परत येताना आमचा काजोल व गंगा दिसले त्यांना खाउ दिला लपून छपून.

लिफ्ट पाशी वाट बघत होतो तर गंगा आत आल्यावर एका लिफ्ट ची वाट बघत असलेल्या स्त्रियेने लगेच तिला हाकलायला सांगितले. घाण करतात म्हणे. ( ही काय सोन्याची आहे वाट्ते) पण आजकाल डाँट एंगेज पॉलिसी.

आज वीकेंड म्हणून आम्ही बेडरूम मध्ये शिफ्ट झालो. लगेच ताईचा फोन आला आजच येते म्हणे. त्या आधी हे उरक ल्या ने मला फारच
एफिशिअंट वाटत आहे.

>>>>>>अर्धं construction आणि अर्धा भाग कुंपणाने बंद.
अर्र ४० वर्षांपूर्वी तिथे मेंढपाळ पावसाळ्यात मेंढ्यांचे कळप चरायला आणत. लश ग्रीन होती. माझं बालपण इतकं रम्य केलं त्या टेकडीने. function at() { [native code] }इशय सुंदर सूर्योदय/सूर्यास्त पाहीलेले आहेत. सुंदर गिधाडे, घारी, विंचू , सापसुरळ्याही Wink

आम्ही आलो तर चालेल का ? >>>> चालेल का काय विचारतेस? अगदी आवडेल. पहाटे जाणं जास्त योग्य, पण सध्या ऊन नसल्यामुळे संध्याकाळी सुध्दा चालेल. तुला आणि तेजोला पहाटे येणं अवघड होईल का? तुला contact कसं करू?

मामी, मला तुमच्या पोस्ट्स डायरीचं पान वाचल्यासारख्या वाटतात. आणि छान वाटतं.

सामो, परत पुण्यात आलीच नाहीस का? त्या मैदानावर मेंढपाळ अजुनही येत होते. गेल्या 2-3 वर्षात बंद झाले. माझ्या टेकडीवर मात्र दर वर्षी मेंढपाळ असतातच. आताही आहेत.

(मला फोटो टाकणं का शक्य होत नाही. इमेज सिलेक्ट केली की Insert option नाहीच दिसत. )

सॉरी भरत. मी आशुचॅम्पशी बोलणं झाल्यावर आम्हा 4-5 जणांचा WhatsApp grp तयार करणार होतेच. इथे गटगच्या गप्पा अवांतर आहेत हे माहित होतं.

नाही. अवांतर होतंय म्हणून नव्हे,
पण कम्युनिकेशनला सोयीचं, मायबोलीने उपलब्ध करून दिलेलं साधन वापरता येईल आणि मायबोलीची परंपराही पाळली जाईल म्हणून सांगितलं.

इथल्या गप्पा जमेल तशा वाचत असते.
आत्ता रेको द्यायला आले - सगळ्या पेट-प्रेमींनी नेटफ्लिक्सवर ‘द हिडन लाइफ ऑफ पेट्स’ सिरीज आली आहे ती आवर्जून बघा.

गटगला शुभेच्छा! Happy

आमचं ओडू बाळ अगदीच आजारलंय

दोन दिवस झाले मलूल होता, जेवण नकोच म्हणत होता, पाणी पण अगदी घोटभरच प्यायले तर प्यायले आणि नुसता पडून राहत होता. मला अंगात त्याच्या ताप वाटत होता. कारण त्याचं काहीही बिनसलं की लगेच जाणवतंच मला. घरचे म्हणे त्याचं अंग गरम असतेच, पण मला हे वेगळं वाटत होतं.

दोन दिवस असेच काढल्यावर मात्र जाणवलं की हे सिरियस आहे, मग लगेचच व्हेट कडे नेलं, त्यांनी पाहिलं तर १०२ होता ताप. म्हणाले टीक फिव्हर असू शकतो. म्हणलं नाहीये त्याच्या अंगावर एकही टीक, मी नेहमी चेक करतो. ते म्हणे, पावसाळ्यात हे कॉमन आहे. अंगावर नसली तर चावून गेलेली असू शकते.आपल्याला डेंग्यू होतो तसाच.

मग त्यांनी ब्लड टेस्ट केली, दोन इंजेक्शन दिली. ओडू बाळ इतका गुणाचा की कुई सुद्धा केल नाही. व्हेट चा असिस्टंट होता तो म्हणे तोंड धरून ठेवा त्याचे. पटकन चावेल. म्हणलं नाही चावणार. आणि खरोखरच अजिबात त्यांने हिसका दिला नाही, अंग अखडून घेतलं नाही. भूभूचे ब्लड पहिल्यांदाचा घेताना पाहिले मी. दुसरे इंजेक्शन खूप पेनफुल होते असे त्यांनीच सांगितले. पण त्यालाही ओड्याने अजिबात त्रास दिला नाही.

रिपोर्टमध्ये टिक फिव्हरच आलाय. प्लेटलेटस् पण कमी झाल्यात. पण गाडीवरून फिरायला नेल्याने गडी खुषीत आलेला. आल्यावर लगेच पाणी प्यायला. डॉ ना विचारलं काय पथ्थ्य वगैरे तर म्हणे काहीही नाही.

त्याला सगळं द्या, ते आपणहूनच ठरवतात काय खायचं काय नाही ते. दोन दिवसात ताप उतरून नॉर्मलला यायला पाहिजे. नाही आला तरच परत या नैतर काही गरज नाही. सिरप आणि अँटीबायोटिक्स दिले आहेत.

रात्री चिकन भाकरी दिली तर भाकरी जिभेने बाजूला करून फक्त चिकनचे पिसेस तेवढे खाल्ले. आई म्हणे, त्याला शरीराला प्रोटिन हवं आहे हे कसं कळलं बघ. म्हणलं उगाच कौतुक, त्याला चिकन आवडतं हे खरे कारण आहे.

ऑ!! ओडू बाळाला लवकर बर वाटू दे
आई म्हणे, त्याला शरीराला प्रोटिन हवं आहे हे कसं कळलं बघ. म्हणलं उगाच कौतुक, त्याला चिकन आवडतं हे खरे कारण आहे.>>> आजिच प्रेम

Pages