![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/02/02/IMG-20200714-WA0003.jpg)
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
झोप प्यारी.
झोप प्यारी.![20200717_181617.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u42136/20200717_181617.jpg)
खुपाच फोटोजेनिक आणि
खुपाच फोटोजेनिक आणि सेलेब्रिटी मांजरे आहेत.
कसली क्युट आहेत पिल्लं
कसली क्युट आहेत पिल्लं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरभर हुंदडत असतील मस्ती करत
कापसाचे गुंडे
(No subject)
दिपाली, दुसरा फोटो तर फारच
दिपाली, हा फोटो तर फारच सुंदर आहे. .
धनयवाद. खरंच खूप छान वाटत आहे
धनयवाद. खरंच खूप छान वाटत आहे हे फोटो शेअर करुन
दीपाली देशमुख , मस्त फोटोज
दीपाली देशमुख , मस्त फोटोज
एका मार्जारपालक मैत्रिणींच्या मते मांजरी स्वतःची स्वच्छता स्वतःच करतात , त्यांच्यासाठी फार श्रम करावे लागत नाहीत. आणि मुळातच त्यांचा कल स्वच्छतेकडे असतो.
मांजरी स्वतःची स्वच्छता
मांजरी स्वतःची स्वच्छता स्वतःच करतात , त्यांच्यासाठी फार श्रम करावे लागत नाहीत.हे अगदी खर आहे. पण तरीही त्याना monthly अंघोळ, रोज कोंबिंग केल्यान त्या छान सुंदर दिसतात.
तुमच्या इतक्या छान मांजरी
तुमच्या इतक्या छान मांजरी पाहून मला सुद्धा एक छोटीसी माऊ आणू वाटतं आहे घरी
कसल्या गोड आहेत
कसल्या गोड आहेत
पण आमच्याकडे कधी पेट नव्हत
पण आमच्याकडे कधी पेट नव्हत त्यामुळे थोडी भीती वाटते जमेल का
<<एका मार्जारपालक
<<एका मार्जारपालक मैत्रिणींच्या मते मांजरी स्वतःची स्वच्छता स्वतःच करतात , त्यांच्यासाठी फार श्रम करावे लागत नाहीत. आणि मुळातच त्यांचा कल स्वच्छतेकडे असतो.>> खरे आहे जाई ..
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण स्नोईला अंघोळ घातली की मुद्दाम मळून येतो. . टीन एज बोका...
मैत्रेयी, आशूचॅम्प, मीरा
मैत्रेयी, आशूचॅम्प, मीरा
माहितीबद्दल खूप धन्यवाद
मी देखील त्याच मताचा आहे की मांसाहार हे त्यांचं नैसर्गिक अन्न आहे.
पण घरात कोणत्याही स्वरूपातील मांसाहारी अन्न अजिबातच चालत नाही.
त्यामुळे शाकाहारी भुभू बद्दल शंका होती.
==========================================
दिपाली मांजराचे फोटोज् आवडले
फारच छान मेन्टेन केले आहेत माऊ बाळे
अगदी अनिमेशन सिनेमात असल्यासारखी वाटत आहेत...गोंडस माऊ बाळे
हो ना फारच क्युट आहेत
हो ना फारच क्युट आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही आणावी वाटतीय एक यातली उचलून
तसं तर मला इथली सगळीच बाळं घेऊन घरी जावं वाटतंय
पण मग मायबोली वरून आणि घरातून काढून टाकतील मला
किती गोड बाळं आहेत सगळी!
किती गोड बाळं आहेत सगळी!
मन्या तरं स्नोबॉल आहेत...
मन्या तरं स्नोबॉल आहेत... खूपच गोड !! प्रिन्सेसेस स्नोव्हाइट...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा धागा फारच गोड आहे. आम्ही
हा धागा फारच गोड आहे. आम्ही लहान असताना आमच्याकडे सतत मांजरी असायच्या. आत्ता मात्र बिचार्या लेकाला तू १६ वर्षाचा झाला की जिराफ पाळलास तरी चालेल म्हणून त्याची बोळवण करतेय.कुठं फेडील हे मी पाप!
कसली गोड फॅमिली आहे, रुपाली.
कसली गोड फॅमिली आहे, रुपाली. मी शाळेत होते तेव्हा आमच्या ओळखीत एक जणांकडे अशी शुभ्र माऊ आणि तिची बाळं होती. मी रोज घरी जायच्या आधी त्यांच्याकडे चक्कर टाकायचे.
दीपाली, वॉव! पांढरी शुभ्र
दीपाली, वॉव! पांढरी शुभ्र पिल्लं कसली क्यूट दिसतायत! एकदम फोटोजेनिक!
धनयवाद सर्वांना. लय छान वाटू
धनयवाद सर्वांना. लय छान वाटू लागलय.
दिपाली, एक छान लेख लिहू शकता
दिपाली, एक छान लेख लिहू शकता या माऊ आणि पिल्लांवर. आवडेल वाचायला. .
दिपाली - तुझी सग बाळं मिस /
दिपाली - तुझी सग बाळं मिस / मिस्टर WORLD/UNIVERSE आहेत खूपच क्युट
मी लहान असताना आमच्या
मी लहान असताना आमच्या शेजार्यांकडे ससे होते पाळलेले. मध्ये मोठा रिकामा पॅसेज होता तिथे त्या पिंजरा आणून ठेवायच्या, ऊन दाखवायला कदाचित. घरी पिंजऱ्यातून बाहेर काढायच्या की नाही माहिती नाही. अजून दुसऱ्या शेजाऱ्यांनी पांढरा उंदीर पाळला होता. ती मुलगी आमच्याकडे यायची तर तिच्या हातावर वगैरे असायचा, अगदी छोटासा होता. त्या मुलीच्या अंगाला विचित्र वास यायचा, उंदरामुळे की काय माहिती नाही.
शाळेत असताना अनिल अवचट यांचा धडा होता, मुक्ता नाव होतं बहुतेक. त्यांच्या मुलीने आणलेल्या भूभूवर होता वाटतं तो धडा. आठवी-नववीत चाळीसगावच्या डॉक्टरांनी पाळलेल्या सिहिणींवर धडा होता. पाळीव प्राण्यांशी संबंध एवढाच.
आमच्याकडे २ गिनीपिग्स होते.
आमच्याकडे २ गिनीपिग्स होते. पण त्यांच्यामुळे अंगाला बिंगाला वास येत नाही. त्यांची दोघांची अगदी भिन्न पर्सनॅलिटी होती. आल्फी न्यु यॉर्क मधला पॉश बँकर होता तर पाँचु हार्डी कंट्री बॉय होता. एकदा दोघांना उन्हात ठेवले तर आल्फीचे ब्लडप्रेशर लो होउन, चक्कर येउन पडला. १ रात्र बिचारा पेट क्लिनिकमध्ये होता. नंतरही रिकव्हर व्हायला वेळ लागला त्याला. पण झाला बाई.
आठवी-नववीत चाळीसगावच्या
आठवी-नववीत चाळीसगावच्या डॉक्टरांनी पाळलेल्या सिहिणींवर धडा होता. पाळीव प्राण्यांशी संबंध एवढाच >>> पूर्णपात्रे ना? सोनाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला लेखन छान जमेल अस वाटत
मला लेखन छान जमेल अस वाटत नाही।पण मी येथे अनुभव नक्की शेअर करते.
व्हेला ची झोप आणि झोपेचे
व्हेला ची झोप आणि झोपेचे angle हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो.![20200725_162715.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u42136/20200725_162715.jpg)
आमच्या झोपण्याची पण वेगळी
आमच्या झोपण्याची पण वेगळी पद्धत आहे बरं.......
I will always woof you.......
I will always woof you.......
My FUNTRU is smarter Than....
My FUNTRU is smarter Than..............
Pages