भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. जुन्या शेजारणीची भलीमोठी कुत्री आनंदाने अंगावर उडी घ्यायची तेव्हा धडपडायला व्हायचे Happy

वरचे ससे फार गोंडस आहेत.

1. एकाग्रतेने जेवण - आमचा अपवाद असेल मग .... थोडं खा इकडेतिकडे जा मग पार्ट थोड्या वेळाने थोडे
2 वेळ पाळणे - सहसा भुभु त्यांच्या वेळा चुकवत नाहीत आणि आपल्यालाही चुकवू देत नाहीत. ऊन वारा पाऊस थंडी रविवार सोमवार दिवाळी दसरा काहीही असू दे त्यांचं फिरणे, जेवण आणि झोप अगदी वक्तशीर .... आम्ही रविवार म्हणून ८ ला उठलो तर आमचा पण पठ्या ८ वाजता उठ,,,, ऑफिसला जायच्या आधीची चक्कर , जेवण झाल्यावरही चक्कर मात्र चुकवू देत नाही ,,, हात धुतला कि लगेच पाऊल बाहेर पडल पाहिजेच

आम्ही गेल्या वीकेन्ड ला कँपिंग (खरं तर ग्लँपिंग) ला गेलो होतो. माउई चा हा पहिलाच अनुभव. सोबत अजून २ फॅमिलीज होत्या. त्यातल्या एकांचा लॅब "लिओ" ही होता . माउई ची मजा आली. आधी त्या लिओ वर भुंक भुंक भुंकला ५ मिनिटे. मग नंतर आले बहुतेक लक्षात, की आपल्या ग्रुप मधे तोही असणार आहे. मग केली दोस्ती. त्याच्या मधे मधे आजू बाजूला लहान भावंडासारखा करत होता. तिथे कँप साइट वर इतरांकडेही भरपूर भुभूज होते. लिओ ला त्यातला कोणी लांबून येताना दिसला तर तो भुंकायचा, माउई ला अजून दिसला नसला तरी लिओ भुंकला म्हणून तोही न बघताच भुंक मारायाचा. Happy फ्रीज्बी खेळताना तो लिओ माउई हून दुप्पट उंच आहे, त्यामुळे तो उडी मारून हवेत फ्रीज्बी पकडायचा . माउई ला कुठून चान्स मिळणार ती पकडायला पण तरी नुसताच त्याच्या मधे मधे करत जोरजोरात धावत होता Lol "शिंगरू मेले हेलपाट्यांनी" म्हणतात ना तसं. आमची फार करमणूक झाली!
leo maui.jpg

क्युट आहेत दोघे.
बाप मुलगा वाटत आहेत साईझ मुळे (मागे कुठेतरी वाचलं आहे असं वाटतं, हे भाऊ आहेत ना जुळे?)

नाही अनु, हे दोघे रिलेटेड नाहीत. माउई चे भाउ बहीण इन्स्टा वर सापडले असे लिहिले होते मी मागे पण तो हा नव्हे. हा लिओ आपल्या ओडिन सारखा लॅब्राडोर जातीचा आहे. हे ब्रीड मोठेच असते आकाराने. माउईच्या दुप्पट तिप्पट तरी असेल Happy

कसले क्युट दिसत आहेत दोघेही
लिओ पण मस्त आहे
माऊई ची स्टाईल पण भारी, पिटकुला असला तरी एकदम ऐटीत उभा आहे, उगाच दादागिरी करायची नाही असे म्हणत

"आपल्या ओडिन" सारखा लॅब्राडोर जातीचा आहे>>>>
हे खूप आवडले Happy

हा धागा वाचून इतकं रिलॅक्स वाटतं. हा धागा वर आला की आवर्जून वाचते. ओडिन ,माऊई, ससे त्रिकुट, सॅमी च्या गंमतीजमती वाचायला आवडते. बाकीच्या मंडळींचेही किस्से येऊ दे.

हा धागा वाचून इतकं रिलॅक्स वाटतं. हा धागा वर आला >>>>अगदी अगदी हो,,खरं तर ओडिनच्या गमती जयंती मी घरी मुलांना पण सांगते,मागे ती मांजर अचानक घरात शिरली तेव्हाच ओडिन च वागणं ऐकून मुलं खूप हसली होती Lol
मला आधी पेट ची खूप भीती वाटायची, आता बरीच कमी झालीये

सॅमीला खरंच टीव्ही फार आवडतो. ते चॅनल बदलतानाचं टिंगटिग म्युजिक ऐकलं की लगेच येते कुठेही असली तरी. आधी खाली फ्लोअर्वर बसून राहते काय लावतात बघते. तिला नेहेमी वाटतं की ते पक्ष्यांचे विडीओ सुरू होतील Lol मग आम्ही पण आमचे चॅनल सोडून आधी तिचंच लावून देतो मग एकदम टीव्हीसमोर उडी मारुन बसते. फार क्यूट वाटतं ते. मजेत आम्ही म्हणत असतो तिला हिला चष्मा लागेल. Proud

ओडीनची अजून एक गंमत
कॅनाल च्या इथल्या पायवाटेने जाताना त्याला मोकळा सोडलेलं असतं आणि तो मस्त याचा वास घे त्याचा वास घे करत बागडत असतो पुढे पुढे
आणि मध्येच वळून मी मागून येतोय ना हे चेक करत असतो
मी माझ्या स्पीडने चालत असतो आणि तो त्याच्या
फार पुढे गेला तर मी उलट दिशेला वळून चालायला सुरू करतो की मग तो लगेच पळत माझ्याजवळ येतो आणि शिस्तीत चालायला लागतो
काल मी वळण्याऐवजी तोंड समोरच ठेऊन उलटा चालायला लागलो.
त्याने मागे वळून पाहिल्यावर मी त्याच्या दिशेने चालल्यासारखा दिसत होतो त्यामुळे थोडा वेळ निवांत राहिला. पण अंतर कमी व्हायच्या ऐवजी वाढत आहे ही उशिराने ट्यूब पेटली Happy
त्यावेळी असा काही ठोंब्या सारखा चेहरा करतो की बस

परवा युरो कप फायनल बघून रात्री उशीरा झोपलो
सकाळी जाग आली तरी छातीवर दडपण आल्यासारखे वाटलं म्हणून
डोळे उघडले तर आमचा केसाळ बाळ आणि त्याच जीभ बाहेर काढून असलेलं तोंड एकदम डोळ्यासमोर
दचकून उठलो
एरवी ओडीन ला सकाळी सात ला पॉटी ला न्यावे लागतं आणि रात्री उशीरा झोपल्याने जाग आलीच नाही
आणि त्याने कुई कुई करून पाहिलं असेल तरीही उठत नाही म्हणल्यावर नाईलाज झाला आणि त्याने चक्क छातीवर पाय ठेऊन मला उठवायचा प्रयत्न केला
बिचारा इतका घाईला आला होता की दरवाजा उघडताच पळत पळत गेला बाहेर आणि अंगणात मोकळा झाला Happy

हो ते एक बेस्ट आहे त्याचे
लहानपणापासून त्याला बाहेर जाऊन करायची सवय आहे
त्यामुळे आम्हला पॉटी ट्रेनिंग वर कष्ट घ्यावेच लागले नाहीत
त्याची आई ट्रेन होती, आणि ती बाहेर गेली की हे सगळे लोकरीचे गुंडे पण मागे मागे जाऊन बाहेर शुशी करायचे
हे मी प्रत्यक्ष पाहिलं होतं फार कॉमेडी प्रकार होता तो
पण तेव्हा आम्ही ओडीन ला घेतलं नव्हतं म्हणून व्हीडिओ नाही काढला
आता वाटतंय काढायला हवा होता

ईथे नविन puppy ची चेकलिस्ट देता येइल काय? म्हणजे नविन बाबु घरी आल्या आल्या लागणार्या गोष्टींची लिस्ट. खुप उपयोग होइल नविन पालकां करीता.

त्या आधी ब्रीड सिलेक्षन वर पण लिहा. सर्व ब्रीड फ्लॅट किंवा शहरी वातावरणास योग्य नाहीत. हस्की व इतर परदेशी ब्रीड जास्त पैसे देउन घेउ नका. लोकल ब्रीड जास्त चपळ निरोगी व हार्डी असतात. इथल्या वातावर्णात फिट होतात. अ‍ॅग्रेसिव चावरे ब्रीड घेउ नका फार्म व मनु श्य बळ असल्या शिवाय. बाकी लिहितीलच.
१) व्हेट शी पपी घ्यायच्या आधी बोला. त्यांच्याकडे चांगला चॉइस उप लब्ध असतो.
२) तुमच्या घरच्यांचे व सोसायटीची नियमावली अभ्यासून घ्या.
३) लोकल पालिकेचे नियम व पपी रेजिस्ट्रेशन कसे करायचे ते बघून घ्या.
४) घरात घ्यायच्या वस्तू: डॉग बेड त्यावर टाकायच्या चादरी. पपीला शू शी करायला शीट्स किंवा आपले पेपर पण चालतात
पाण्याची डिश, खायची डिश, लीश बेल्ट. थोडी खेळणी चावायची. पण घरातले काहीही त्याला चालते.
५) नव्या पपीचा आहार इ कान्युबा ग्रन्युल्स. व मग पपी पेडिग्री. शिवाय त्याच्या आवडीचे ओले अन्न.
६) व्हॅक्सि नेशन साठी व्हेट चा सल्ला घ्यावा.
७) नखे व केस कापायची सुविधा.
८ ) घरातील मांजर व लहान मुले ह्यांना आधी पासून तयार करणे.

खरोखरच स्ट्रेस बस्टर धागा. सगळ्यांचीच बाळं लोभस आहेत. मागे इथे लिहिलेली एक मोठी पोस्ट save नाही झाली काही कारणाने. मग परत काही लिहिणं झालं नाही.
वर अमांनी छान यादी केली आहे. त्यात माझी दोन पैश्यांची भर Happy
लहान पिलू आपली आई क्वचित आपली भावंडेही सोडून आपल्या घरी येतं. तेव्हा शक्य असेल तर त्याची आई, भावंडं वापरत असलेली एखादी लहान चादर किंवा टॉवेल त्याच्या आसपास किंवा बिछान्यात ठेवावा सुरवातीला. त्या वासाने पिल्लाला बरंच आश्वस्त वाटू शकतं.
आमचं भू भू ( त्याविषयी पुन्हा केव्हा तरी. सध्या याचं वास्तव्य मुलाकडे आहे ) घरी आलं तेव्हा पहिले ४-५ दिवस रात्र झाली कि खूप अस्वस्थ होऊन बारीक आवाजात कुई कुई करत राही. अशा वेळी नवरा त्याला मांडीवर घेऊन गोंजारत राही. सकाळी नवरा खुर्चीत / सोफ्यावर झोपलेला आणि पिल्लू त्याच्या पोटावर असं दृश्य दिसत असे.

काल रात्री एकजण परत घाबरून थरथरत बसलं होतं खूपच वेळ खूप पाउस व विजा गडगडा ट. मग आज उशीरा उठून आता वॉक उरकून परत गाई गाई चालू आहे. मी शेजारी संडे टाइम्स वाचत पडले आहे. हॅपी टाइम्स.

माणसे मुले दत्तक घेतात हे बघितले होते पण प्राणीही मुले दत्तक घेतात हे बघितले आमच्या स्पॉटीमुळे.

गेले तिन आठवडे ती एका महिन्याचे असावे इतके मोठे एक कुत्र्याचे पिल्लु घेउन फिरतेय. ते पिल्लु कधी तिच्यासोबत बाहेर फिराय्ला जाते, कधी स्पॉटि दिवसभर् गडप असते आणि हे पिल्लु बाहेर व्हरन्ड्यात कोपर्यात पडुन असते. आधी मी जवळ गेले कि भिन्तीकडे तोन्ड करुन बसायचे, मी तुला बघितले नाही व तुही मला बघितले नाही अशी बॉडी लन्ग्वेज करत चुळबुळ करायचे. मी एकदा डोक्यावरुन हात फिरवुन त्याच्याशी बोलले. आता मी बाहेर जाताना त्याला लाम्बुन नुसते चल फिरायला जाउ असे बोलले तरी धावत पार गेटपर्यन्त येते.

साया स्पॉटीबरोबर चान्ग्ले खेळाय्चा, दोघेही एका ताटात जेवायचे. पण हे पिल्लु आल्यापासुन सायाने दाराबाहेर पाउल टाकलेले नाही. आता तो बेडरुमच्या खिडकीतुन ये जा करतो.

मी बाहेर चालाय्ला गेले तर सोबत स्पॉटी येते. मी गाडी घेउन बाहेर पडले तर गाडिच्या बाजुने स्पॉटी धावते. धावता धावता कधी गाडीच्या समोर येते, कधी उजव्या बाजुने धावते, मला बघत. इतकी भिती वाटते मला.... आता रस्त्यावर गाड्यान्ची वर्दळ वाढलिय, आपटेल अशी भिती वाटुन माझा जीव टान्गणीला लाग्तो.. जास्त धावायची क्षमता नाहीये तिची. तरी जे तिनचारशे मिटर धावते ते बाहेर रस्त्यावर धावते. गळ्यात साखळी बान्धली कि हैदोस घालते, त्याम्र्ळे तेही करता येत नाही.

आई बाबांनी अमेरिकेहुन येताना ओडीन ला एक स्टफ टॉय आणलं
त्याच नाव आम्ही टोटो द turtle ठेवलं
ओडीन ला लै म्हणजे लैच आवडलं, इतकं की झोपताना पण घेऊन झोपला जवळ
सगळ्यात मज्जा आली ते तो ते चावत बसला होता आणि अचानक ते कुई करून वाजला.
बापरे, असली तंतरली त्याची, पहिले तर पळून दाराकडे गेला
मग हे आपल्या मागे येत नाहीये जागीच पडून आहे म्हणल्यावर मग भुंकून राग व्यक्त केला
मग धीर चेपला तसा हलवून पाहिलं, आवाज येईना, मग पंजाने त्याला दाबला तर परत आवाज आला
अरेरे इतका बिचाऱ्याचा केविलवाणा चेहरा झाला होता
हे काय भुताटकी आहे त्याला कळेना
अजुनही तो आता त्याच्याकडे संशयानेच बघतोय

Pages