भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
हाच मेसेज बदल करून आपल्याकडे दिवाळीत खपला असता
Happy
ओड्याने लाडू, चकली, करंजी लै आवडीने खाल्ली
एकदा श्रीखंड चाटवलं तेही प्रचंड आवडलं

So so true.... कुणाला 'कुत्रा' म्हणून का हिणवतात की... त्यांच्या इतकं निष्ठावान व निर्व्याज प्रेम मनुष्याला करताच येत नाही. मुलीने हे टिव्हीवर ऐकले तर म्हणे स्तुतीच आहे. मला चालेल कुणी मला 'डॉग आहेस तू' म्हणलं तर Happy

माऊईने पण शेवेची चव घेतली आणि फारच आवडली. एकूण ह्यूमन फुड मधे इंटरेस्ट असतोच पण त्यापेक्षाही त्याला सगळ्यांसोबत सामील केल्याचा आनंद फार असतो. सगळ्यांना रात्री जेवताना गरम पोळ्या वाढत असते तेव्हा त्यालाही अर्धी पोळी दिली की भयंकर खूष होतो. गॅस वर तवा ठेवल्याचा आवाज आला की घरात कुठेही असला की बरोबर पळत येतो. Happy पण सगळी पानं वाढली की मग शेवटची पोळी मिळणार हेही माहित असतं त्यामुळे इतरांना वाढताना पेशन्स ने अगदी ते पपी आईज ने माझ्याकडे बघत शांत बसून असतो माझ्या पायाजवळ. Happy

ती हीनाची आणि जॉनीची स्टोरी आवडली . शेवटी अगदी डोळे ओलावले.

असं एक धर्मांतर आमच्या नात्यात बघितलं आहे. आधी अगदी 'एकतर ते कुत्रं घरात राहील नाहीतर मी" अशी सुरुवात करून त्या काकू नंतर एकदा मला त्यांच्या लॅब भूभूला उकडीचा मोदक फार आवडतो म्हणून त्याच्या बर्थडेला कसा मोदकांचा घाट घातला हे सांगत होत्या.

भुभू कुटुंबात आणायची फार इच्छा आहे पण त्याच्या मांसाहारा वर सगळं अडतं.

आम्ही सर्व पक्के शाकाहारी (vegetarian, not even eggs)

ह्यावर तुमचे काही अनुभव की मी कधी भुभुबाबा होऊच शकणार नाही?

भुभूंचे किबल तसे दिसायला मांसाहारासारखे दिसत नाहीत पण वास असतो मात्र. घरात कुणा एकाला ते डॉग ला २ वेळेस सर्व्ह करण्याइतपत सहन होत असेल तर जमेल Happy माझ्या ओळखीत २-३ शाकाहारी कुटुंबांनी आणला आहे डॉग. एकांचा डॉग खाण्याच्या बाबतीत पिकी आहे जाम. नुस्ते किबल अजिबात खात नाही. किबल सोबत दर वेळी चमचा भर त्याला चिकन अथवा तत्सम चविष्ट वेट फूड दिले तरच तो लबाड कुत्रा जेवतो. Happy हे लोक पण स्वतः शुद्ध शाकाहारी, मग आता त्या लाडोबासाठी म्हणून घरातल्यांनी एका बाईला पैसे देऊन काम दिले आहे, आठवड्यातून एकदा बिना मिठाचे बॉइल्ड चिकन घरपोच आणून द्यायचे Happy या लोकांना बाकी काही नाही तरी ते चिकन किबल सोबत त्याला थोडे थोडे वाढायचे काम करावे लागते. तितपत इम्युनिटी डेवलप केली आहे त्यांनी!

पुण्यात असाल तर मागे एका धाग्यात केदार दीक्षित च्या श्वान फूड चा उल्लेख झालाय
तो एकदम रेडिमेड पॅक मध्ये चिकन देतो
त्याला काहीच करावं लागतं नाही पॅक ओपन करून रूम टेम्प्रेचर ला आणून भुभु ला द्यायचा
त्याला टिपिकल नॉनव्हेज चा वास पण येत नाही
उलट हर्ब्स असलयाने छान मस्त पुदिना टाईप्स वाटतं

फ्रीज मध्ये ते महिनाभर टिकत तयामुळे एकदम 5 किलो आणून लावलं की सारख आणायची पण गरज नाही
जेवायचा आधी अर्धा एक तास फ्रिजर बाहेर काढून ठेवायचं

ओळखीत काही जण आहेत ज्यांनी लहानपणापासून पूर्ण शाकाहारी ठेवले आहेत भुभु
पण मला व्यक्तीशः ते योग्य वाटत नाही, त्यांचं नॅचरल फूड हे मांस च आहे
कमी द्या पण देणारच नाही असे करू नका

कल्पक व्यवसाय आहे. >>> हो ना सामो. माझं तर स्वप्न आहे डॉग होस्टेल चालू करावं आणि खूप सारे पेट्स प्रेमाने संभाळावेत. Happy

मला त्यांचा सम्पर्क द्याल का
मी ओडीन च्या वाढदिवसाला प्लॅन करतोय भुभु स्पेशल केक चा >>> अनिष भट - 87669 51985 बाकी पुण्यात अजून बरेच जण आहेत, पण भटांसारखा पॅशनेट आणि प्रामाणिकपणे योग्य डॉग फूड देणारा कोणी असेल तर मला माहित नाही. त्यांचा डॉग केक आपण सुद्धा टेस्ट करू शकतो (एवढी स्वच्छता आणि एवढे प्युअर ग्रेड पदार्थ वापरतात. ताजेपणाबद्दल तर शंका नाही, बेक करून वॉर्म असताना कित्येकदा डिलिव्हरी दिली आहे)

अरे ही तर माझ्याच बिरादरीतील भुभु आणि माऊप्रेमी जनता. >>> हो, पेट्सचे आईबाबा ही एक वेगळीच बिरादरी असते. नेहमीच्या वॉकच्या ठिकाणी, व्हेटकडे किंवा पेट फ्रेंडली रेस्टॉरंटमध्ये अशा लोकांची पटकन मैत्री होते.

सामो, सिंड्रेला, फोटो मस्त आणि मेसेज apt :thumbs up:

एकूण ह्यूमन फुड मधे इंटरेस्ट असतोच >>> माझा बिगल चिकन राईस, फिश, डॉग फूड या व्यतिरिक्त पालक आणि कोथिंबीरीच्या काड्या फक्त आवडीने चावत बसतो. बाकी ह्युमन फूडमध्ये कणभरही इंटरेस्ट नाही. अगदी काहीच वेगळं try करत नाही. माऊईची पोळी आवड किती गोड Happy

सनव, माझ्या आईचीच गोष्ट वाटते आहे. फक्त डॉग ऐवजी आईने माकड पाळलं होतं.

फ से जु, माझ्या माहितीत काही शुद्ध शाकाहारी डॉग्ज आहेत, पण आशुचॅम्प म्हणाले त्याप्रमाणे ते करणं कितपत योग्य ते माहीत नाही. एखाद्या चांगल्या व्हेटशी बोलून निर्णय घ्या. आवड असेल तर तुम्ही नक्कीच पेट आणावं.

आशुचॅम्प, ओडिनचा व्हेट कोण? डॉ तुळपुळे का?

माकड? घरी? हे भन्नाट आहे

धन्यवाद मीरा संपर्कासाठी

ओडीन चे व्हेट डॉ आमोद काळे, कोथरूड
ज्यांच्याकडून आणला त्यांचं डॉ महेश राऊत होते कात्रज ला
सुरुवातीला त्यांच्याकडे नेत होतो फॅमिली हिस्ट्री माहिती आहे म्हणून
पण फार लांब पडायला लागलं
म्हणून मग आता हेच

20200603_224025.jpg

<<आमची Vhela माऊ >> खूप खूप खूप भारी आहे. .
खाऊ-मनीआहे का?
स्नोई ला फोटो दाखवते आणि सांगते की शांतपणे स्वच्छ अंघोळ करून घेतलीस तर तू पण असा भारी दिसशील. Wink
एरवी लोळून मळून माकडू दिसतो पक्का Happy

माझ्या ओळखीत दोन जणांनी घरी माकड पाळले होते. ती tv remote ची बटणे काढून टाकत असत. एका घरातली कोळीष्टके साफ करायचे ते माकड. Happy इथे माकडाचा विषय निघाला तेव्हा आठवण झाली.

ओह ओके
छान रिन ने धुतल्या सारखी पांढरीशुभ्र स्वच्छ माऊ आहे.ही स्वतःला नेहमी इतकं स्वच्छ मेंटेन करते का?

वा
व्हेला ची पिल्लं पण देखणी
सर्व फॅमिली एकदम मॉडेल आणि पोस्टर फॅमिली आहे.

Pages