कळलंच नाही

Submitted by मिरिंडा on 10 November, 2020 - 04:13

घराचं घरपण कधी हरवलं
कळलंच नाही
दरवाजाची दारं कधी एक होऊन
बंद झाली कळलंच नाही
आधार देणारा दादा कधी
वेगळा झाला कळलंच नाही
सांभाळणारी ताई कधी
परकी झाली कळलंच नाही
आई बाबांचे हात कधी
थरथरु लागले कळलंच नाही
फुलपँट घालून कधी कॉलेजला
जाऊ लागलो कळलं च नाही
संसाराचा व्याप कधी वाटू लागला
कळलंच नाही
आईबाबा कधी आठवणीत
जाऊन बसले कळलंच नाही.
आता फक्त आमच्या वेळी
यांव होतं त्यांव होतं एवढंच म्हणतो
पोरंबाळं आता दात काढून कधी
म्हणू लागले उगाचंच टेपा लावतायत कळलंच नाही।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults