| मिट्टी का ग़मला |

Submitted by अक्षता08 on 7 November, 2020 - 23:22

वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ह्यांना समान महत्त्व असतं तसच आपल्याला एखादं झाड लावायच असल्यास कुठे, कोणत, आणि कोणत्या कुंडीत या तिन्ही गोष्टींनाही तेवढंच महत्त्व आहे.

एखाद झाड हे वेगवेगळ्या कुंडीत ( प्लास्टिक, माती, कापड, सिरॅमिक, काँक्रीट, इ.) वेगळी प्रतिक्रिया देतं. म्हणजेच आपण कोणत्या प्रकारच्या कुंडीत झाड लावत आहोत त्यानुसार झाडाच्या वाढीत फरक दिसू शकतो.

मातीच्या कुंडीची जागा प्लास्टिकच्या कुंडीने घेतली आहे. त्याचं मुख्यत्वे कारण हेच आहे की प्लास्टीकची कुंडी ही easy to handle आहे आणि वजनाला अतिशय हलकी आहे. ग्रील मध्ये आपण जास्त वजनाच्या कुंड्या नाही ठेवू शकत. त्यामुळे, तिथे प्लास्टिकच्या कुंडीला प्राधान्य द्याव लागतं. परंतु, ही नकारात्मक बाब सोडल्यास मातीची कुंडी ही कोणत्याही झाडासाठी उत्तम आहे. मातीच्या कुंडीतून aeration (हवा खेळती राहते) उत्तम होतं. ज्यांचा पाणी देण्यावर अधिक हात आहे त्यांनी मातीच्या कुंडीत झाडं लावण उत्तम. कारण, माती काही अंशी पाणी शोषून घेते त्यामुळे root rotting होत नाही आणि मूळं सुद्धा खुप निरोगी राहतात. Indoor झाडांसाठी मातीची कुंडी खूप उपयोगी ठरते. घरात हवा कमी खेळती राहते (air ventilation) त्यामुळे aeration हे मातीच्या कुंडीत खूप छान होतं.

मातीच्या कुंडीला प्लास्टीकची कुंडी हा पर्याय आहे. परंतु, झाड हे "मिट्टी के ग़मले में" जास्त खुष असतं.

IMG_20201108_091737.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ಅದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಓದಲಾಗಲಿಲ್ಲ.
ಇನ್ನೊಂದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಶೀರ್ಷಿಕೆಯನ್ನು ಬಳಸುವ ಮೂಲಕ ಅದು ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಯಲು ನಾನು ಬಯಸುತ್ತೇನೆ?
ಈ ಲೇಖನದ ಗುಣಮಟ್ಟವನ್ನು ಅದು ಹೇಗೆ ಸುಧಾರಿಸಿದೆ?
ಮರಾಠಿ ಶೀರ್ಷಿಕೆಯನ್ನು ಬಳಸಲು ನೀವು ಏಕೆ ನಾಚಿಕೆಪಡುತ್ತೀರಿ?
ನಿಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆಗೆ ನೀವು ನಾಚಿಕೆಪಡುತ್ತೀರಾ?

छान , थोडी आणखीन माहिती चालली असती . म्हणजे कुठल्या झाडांना साधारण किती साईझ ची कुंडी वगैरे. पण माहिती नेहमीप्रमाणे छानच.
अभिनव कुठल्या मायबोलीत लिहिलंय Uhoh

अभिनव कुठल्या मायबोलीत लिहिलंय Uhoh
नवीन Submitted by वर्णिता on 8 November, 2020 - 17:53
>>
वर्णीता Google ಅನುವಾದ "ಸೇವೆಯನ್ನು ಬಳಸಿ
ಈ ಲೇಖನದ ಶೀರ್ಷಿಕೆಯನ್ನು ಅರ್ಥಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ನಾನು ಅದೇ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದೇನೆ.
ನನಗೂ ನಿಮ್ಮಂತೆಯೇ ಆಶ್ಚರ್ಯವಾಯಿತು. ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಏಕೆ ಶೀರ್ಷಿಕೆ ಇಲ್ಲ?
ಹಿಂದಿ ಬಳಕೆಯಿಂದ ಯಾವ ರೀತಿಯ ಕಲಾತ್ಮಕ ಮೌಲ್ಯವನ್ನು ಸುಧಾರಿಸಲಾಗಿದೆ?

वर्णीता, ದಯವಿಟ್ಟು ಶೀರ್ಷಿಕೆಯನ್ನು ಭಾಷಾಂತರಿಸಲು ಬರಹಗಾರನನ್ನು ಕೇಳಬಹುದೇ? ಧನ್ಯವಾದಗಳು.

ಹಿಂದಿ ಶೀರ್ಷಿಕೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಕನ್ನಡ ಕಾಮೆಂಟ್‌ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಏಕೆ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ?
ನೀವು ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಜನಾಂಗೀಯರಾಗಿದ್ದೀರಿ? ನೀವು ಭಾರತವನ್ನು ಏಕೆ ಡೈವಿಂಗ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ?

बरोबर आहे. मातीच्या कुंडीत लावली झाडे जास्त दिवस पाण्याशिवाय तग धरतात. तसेच उन्हाल्यात फारसा त्रास होत नाही.

ओह, वाचलं कन्नड , बरोबर आहे तुमचे पण काही धागे इंग्रजी टायटल मध्ये पण आहेतच ना. धागाकर्त्या वाचून घेतील योग्य तो निर्णय.

ईंग्रजी जागतीक संपर्काची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची व व्यवसायाची भाषा आहे. त्यामुळे ती वापरली तर काही हरकत नाही. काही विशिष्ट विषयांमधे तर इंग्रजीमधुन जास्त चांगली माहिती देता येते.

@मनिम्याऊ, @किशोर मुंढे
सहमत !

@सामो
धन्यवाद Happy

@वर्णिता
धन्यवाद Happy
पुढील लेखात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेन Happy

@अभि_नव

माती ची कुंडी असा ह्या शीर्शकाचा अनुवाद आहे

(हिंदी मध्ये शीर्शक असण्याच कारण की, मध्ये एक हिंदी लेख वाचताना मला "मिट्टी का ग़मला" ही ओळ दिसली व हा विषय सुचला त्यामुळे ह्या लेखाच शीर्शकही तेच ठेवलं)