गर्ल्स कॅन नॉट प्ले आबादुबी ! बॉईज कॅन नॉट डू शिवणकाम !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 November, 2020 - 16:50

गर्ल्स कॅन नॉट प्ले बास्केटबॉल !

जेव्हा पहिल्यांदा हे ऐकले तेव्हा हसायला आले. कारण मुलींशी अशीच चिडवाचिडवी खेळायचे वय ते. त्यात शाहरूख आपला बालपणीपासूनचा क्रश. तो जे बोलेल तो आपला डायलॉग, आणि मग याची मालिकाच सुरू झाली. गर्ल कॅन नॉट प्ले फूटबॉल, गर्लस कॅन नॉट प्ले क्रिकेट, गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी.. लंगडी… खोखो. पत्ते, गोट्या. आबादुबी, वगैरे वगैरे काहीही शब्द घालून उगाच मुलींना चिडवणे सुरू झाले…. वयच होते ते तसे करण्याचे..

पण गर्लस कॅन प्ले विषअमृत ! आणि गर्लस कॅन प्ले लपाछुपी!
हे विष-अमृत आणि लपाछुपी हे खेळ आमच्या ईथे भयंकर हिट. कारण हेच दोन खेळ होते जे मुलेमुली एकत्र खेळायचे.

तर ते एक असो,
शारीरीक क्षमतेचा विचार करता ओवरऑल कित्येक मैदानी खेळात मुलांपेक्षा मुली मागे असतात असे म्हणू शकतो.

पण मला वाटते शारीरीक क्षमता हे एकच कारण नसते. कारण बॅडमिंटन वा टेनिस हे देखील कमालीचे दमछाक करणारे खेळ मुलींना आवडीने खेळताना पाहिले आहे. किंबहुना बॅडमिंटन तर आमच्याकडे मुलीच जास्त खेळायच्या.

पण त्याचवेळी कॉलेजला असताना डिपार्टमेंटची मुलींची क्रिकेट टिम बनवायला आम्हाला किती कष्ट पडायचे त्या गोड आठवणी आजही ताज्या आहेत. अकराची टीम, त्यातल्या सहाजणी चटकन मिळून जायच्या उरलेल्या पाच मुली त्या आधीच्या सहा मुलींसाठी हातापाया पडून गोळा कराव्या लागायच्या. फूटबॉलची टीम तर कधीच बनली नाही.

कारण मुळातच या काही खेळांची मुलींना तितकीशी आवड नसणे
जी आवड मुलांमध्ये उपजत असते.
अन्यथा या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट खेळो न खेळो पण बघणारे करोडो आहेत, आणि त्यावर तावातावाने चर्चा करणारेही लाखो आहेत. पण मुलींमध्ये हे प्रमाण फारच नगण्य. आणि ते देखील मुलामुलींचा एकत्र ग्रूप असेल तरच. अन्यथा निव्वळ मुलींच्या ग्रूपमध्ये मी कधी क्रिकेटची चर्चा ऐकलीच नाही. (आता प्लीज तू कुठे ऐकायला गेलेलास विचारू नका, ईंजिनीअरींगची सात वर्षे माझी अश्याच ग्रूपच्या आजूबाजूला घुटमळण्यात गेली) नाही म्हटल्यास तो राहुल द्रविड काय क्यूट दिसतो हे कानावर पडायचे, पण त्याला मी क्रिकेटची चर्चा मानत नाही.

आजही ऑफिसातील महिला बघतो. मुलींच्या आवडी, गप्पा, छंद, त्यांचे बोलण्याचे, गॉसिपिंग करायचे विषय मुलांपेक्षा वेगळेच असतात, त्यांना नटायची, छान दिसायची, शॉपिंग करायची आवड उपजतच असते. ते आपले विणकाम शिवणकाम वगैरे गोष्टी जमवायचे झाल्यास स्त्री पुरुष दोघेही करू शकत असले तरी एखाद्या पुरुषापेक्षा एखादी स्त्रीच लोकरीचे झबले वगैरे विणताना दिसण्याची शक्यता जास्त असते. या आवडी असतात, हे छंद असतात, या गोष्टी काही स्त्री पुरुष असमानतेने लादलेल्या नसतात.

मुलांच्या आवडीनिवडीबाबतही अशीच एक लिस्ट बनवता येईल.

तर हाच आपला धाग्याचा विषय आहे.

जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात ज्या पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांच्यावर लादलेल्या नाहीत तर ती लिस्ट ईथे बनवा.

तर ज्यांना असे काही नसते हे वाटते, त्यांनी ईथली लिस्ट खोडून दाखवा Happy

जे छंद दोघांत कॉमन असतात, असू शकतात, उदाहरणार्थ गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, पुस्तक वाचणे वगैरे तर त्यांना या धाग्यापासून दूर ठेवा.

जर पाणीपुरीवर पुरुषांपेक्षा महिला जास्त तुटून पडतात असे निरीक्षण असेल तर जरूर नोंदवा Happy

धागा स्त्री पुरुष दोघांसाठी समसमान खुला आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर शाळेत असल्यापासून आत्तापर्यंत जेन्ट्स टेलरकडूनच ड्रेसेस शिवून घेते.. Proud
>>>
व्यवसाय म्हणून ठिक आहे हो.
पण मी कधी ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले.

डिप्लोमाला असताना सर्व्हेचे प्रॅक्टीकल लवकर संपले आणि आमचा ग्रूप कॉलेजच्या आवारातच आबादुबी खेळू लागला. आमचे काही ईतर डिपार्टमेण्टचे वाया गेलेले मित्रही यात सहभागी झाले. ईतके रंगलो की भानच विसरलो. आणि ज्याची भिती तेच घडले. सर्व्हेच्या सरांनी पकडले. माझ्यावर आधीपासूनच त्यांची खुन्नस. थेट मुख्याधापकांकडे नेले. आणि म्हणाले सर हे प्रॅक्टीकल चालू असताना खेळत होते आणि नुसते खेळत नव्हते तर आबादुबीसारखा वाह्यात खेळ खेळत होते.

हे ऐकातच प्रिन्सिपॉल भडकले.. काय आबादुबी.. जसे काही आम्ही कॉलेज आवारात चरस गांजाच विकायला काढलेला असे संतापले आणि आम्हाला आमच्या कल्पनेबाहेरची कठोर शिक्षा झाली. ती पुन्हा कधीतरी.. पण ईतका वाह्यात समजला जाणारा खेळ नक्कीच मुली खेळत नसतील असे वाटते.
मी तरी नाही पाहिले

तुम्ही खरंच मुंबईत रहात होता का? .. आबादुबी आणि
त्यासारखेच इतर खेळ म्हणजे धप्पांडी (पाठीत जोरात धप्पा मारून आऊट करणे), बैठ्या खेळात ‘टिचकी मारून जावे‘ सारखे कपाळावर जोरात टिचकी मारण्यासारखे बरेच खेळ आम्ही मुलं मुली एकत्र खेळायचो Happy अजून आठवलं तर लिहीन.

मुंबईत नाही.. दक्षिण मुंबईत..
कदाचित तुमच्याईथे कचकचून मारत नसतील आबादुबीत..
आमच्याईथे प्लास्टीक आणि मोज्यात चिंध्या भरलेल्या बॉलने तर खेळायचेच. पण रबरी बॉलनेही आबादुबी खेळायचे. जीव तोडून लांब लाब पळायचे सारे दोन तीन ग्रूप पाडून पास पास करत मारणे. कोणालाही दयामाया न दाखवणे. फार वाईट प्रकारे खेळला जायचा. मुलींनी खेळणे तर दूर त्या बघायलाही घाबराव्यात अशी खेळली जायची आबादुबी.

पण मी कधी ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले.>>>>>>>
मी पण नाही पाहिले... मग शिवणकाम का म्हणताय??विणकाम म्हणा ना.... Proud

ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले.>>>>>यात नैसर्गिक आवड नावड कुठे येते?हा फक्त सामाजिक दबाव झाला, की असं केलं तर लोक काय म्हणतील,नावं ठेवतील म्हणून आवड असूनही पुरुष ही काम चारचौघात करत नसतील
लोक काही म्हणू दे who cares मला वाटलं तसेच मी करणार याला जो बाणेदारपणा लागतो तो अर्थातच सगळ्यांमध्ये नसतो
या आधीच्या पिढ्या मध्ये बाबा मुलांमध्ये जास्त रमायचा नाही हल्ली तस दिसत नाही याचा अर्थ असा नाही की पुरुषांच्या नैसर्गिक पितृत्व भावना आता हल्लीच उफाळून येत आहेत उलट या आधीच्या पिढीत पण ते प्रेम होतंच पण समाज काय म्हणेल म्हणून ते तितकंसं दाखवलं जात नव्हते
ते पैसे लावून रमी खेळणं असो की वजन उचलणे असो या पुरुषांच्या सामाजिक मक्तेदाऱ्या आहेत यात सरसकट फक्त पुरुष किंवा फक्त स्त्रीच नैसर्गिकरीत्या एखादे काम करू शकते असे काही नाही
कदाचित लहानपणापासून जशी रफ किंवा नाजूक प्रकारे वागवले जाते त्यामुळे आपण हे करूच शकत नाही/हे आपणच व्यवस्थित करू शकतो अशा भावना विकसित होत असतील(असं मला वाटतं, अभ्यास काहीही नाही)
मी स्वतः 25 30 किलो चे पोते सहज उचलून आणते जे नवऱ्याला व्यवस्थित जमत नाही,
वर कुठेतरी मोठे मोठे वजन उचलणे हे फक्त पुरुष कामगार करतात असं काहीतरी ओझरते वाचले आहे,तर बायका सुद्धा ते उचलू शक्यतातच पण पुन्हा तिथे सामाजिक दबाव येतोच म्हणून महिला कामगार संख्या कमी किंवा नगण्य दिसतात,प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रत्येकाचीच इच्छा आणि ताकद असतेच असं नाही मग ती पुरुष असो की स्त्री.

आमच्याकडेही आबाधुबी मुलं मुली एकत्र खेळायचे. आम्ही फक्त रबरी चेंडूनेच खेळायचो, प्लास्टिक चेंडूने तान्हे पोरं खेळत.
रपकन चेंडू बसतो, पार कळवळायला यायचे. एकदा चेंडू सरळ माझ्या डोळ्याला लागला, डोळा सुजला होता चार दिवस.

Submitted by आदू on 9 November, 2020 - 22:41>>>
चांगली पोस्ट आदू. आपण 90% सोशल कंडीशनिंगचे प्रॉडक्ट्स असतो.

असे 'धागे' ऋन्मेशही विणू शकेल की Happy हाकानाका
हे काका रिसायकल्ड लोकर वापरतात.
https://m.youtube.com/watch?v=dBryKSZwb5c
हा मुलगा क्रोशे विणतो. क्रोशे प्रोडेजी....
https://youtu.be/23_4vwsFdGY

ओओ , आता पुन्हा शीर्षक बदलावे लागेल.

सीमंतिनी फोटो टाकून उपयोग नाही,त्याच म्हणणं पडेल आता की तो भारताबाहेर चा फोटो वाटत आहे,इथला फोटो टाकला नाहीत म्हणजे इथे असं होतच नाही,इथे पुरुष स्वेटर विणत नाहीत म्हणजे इथल्या पुरुषांमध्ये त्या कामाची नैसर्गिक आवड नाही,तुम्ही फोटो टाकलाय म्हणजे आता त्याला लिंका,आकडेवारी द्यायची नैतिक जबाबदारी तुमचीच झाली Lol

आता त्याला काय वाटायचं ते वाटू दे. परत कधी हे "पण मी कधी ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले." ऐकायला नको Happy . Sometimes the rate of change is one neuron at a time. पुढे "पण मी कधी ट्रेनमध्ये प्रत्यक्ष कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले" चालेल. किंवा "पण २०२० पूर्वी मी कधी ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले" चालेल.
अटकलेली सुई थोडी तर भटकेल...

असे राजाबाबू सारखे फोटो नको. मी सूटाबूटात लाली पावडर लाऊन लोकर विणतो तू फोटो काढ.
सगळ्यांकडे मोबाईल आहेत. त्यात कॅमेरा असतो. जेव्हा बस वा ट्रेनमध्ये एखादा पुरुष विणताना दिसेल तेव्हा फोटो जरूर काढा.
चला अश्या पुरुषांना हिरो बनवूया Happy

.
तुम्ही फोटो टाकलाय म्हणजे आता त्याला लिंका,आकडेवारी द्यायची नैतिक जबाबदारी तुमचीच झाली
>>>
छे त्याची गरज नाही. पण ट्रेनमधील ८० टक्के पुरुष विणकाम करतात असे विधान कोण करत असेल तर हक्काने लिंक मागणार Happy

@ आबादुबी,
मुले मुली रबरी बॉलने एकत्र खेळायचे अशी आतिशयोक्तीची विधाने नको. याने धाग्याचा सिरीअसनेसपणा जातो.

@ प्लास्टीक बॉल आणि तान्ही बाळं, कदाचित आपल्याकडच्या प्लास्टीक बॉलची क्वालिटी घटिया असेल. किंवा मुलांच्या थ्रोईण्ग आर्म मध्ये ताकद नसेल. आमच्या ईथे प्लास्टीक बॉलने ओवर आर्म क्रिकेट सहज खेळले जायचे. आणि ते संपताच अचानक आबादुबीला सुरुवात. ते देखील गल्ली सदुश्य मैदानात जिथे पळताना डेड एंडला सावज सापडायचे. असे लाल चट्टे उठायचे जे पोरं चार चार दिवस मिरवायचे.

रोज रात्री आमचा पहिल्या माळ्यावर कट्टा भरायचा. पहिल्या माळ्यावर म्युनिसिपालटीची शाळा होती जी रात्री बंद असायची. तीच शाळा जिथे माननीय छगन भुजबळजी शिकले. तिथे मग आमच्या गप्पा रंगायच्या. तेव्हा आज आबादुबीत कोण फुटले याच्या चर्चा झडायच्या. एकमेकांना शिव्या घालून पोरं हलकी व्हायची.

@ आदू,
हा फक्त सामाजिक दबाव झाला
>>>>
यातील फक्त हा शब्द वगळता सामाजिक दबावाचा मुद्दा योग्य आहे आणि मान्य आहे.
नैसर्गिक आवड निवड देखील असते आणि त्या अनुषंगाने सामाजिक दबावही असतो. जी नैसर्गिक आवड प्रामुख्याने भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये आढळते ते चारचौघात करायचा चाचरणे हा तो दबाव.

माझा तो दुसरा धागा जिथे पुरुषाने पूजा करायची आणि बायकोने मम करायचे तो देखील एक सामाजिक कम धार्मिक दबावच.
पण जेव्हा मी तो दबाव झुगारून उलटे करायचे म्हटले तेव्हा अचानक गाडी स्वयंपाकावर कशी घसरली देव जाणे Happy

पण जेव्हा मी तो दबाव झुगारून उलटे करायचे म्हटले तेव्हा अचानक गाडी स्वयंपाकावर कशी घसरली देव जाणे>>>कारण आपण किती मोठेपणा करतोय दाखवण्यासाठी "बस झाल्या गप्पा आता करून दाखवायचे"अशा type चे शीर्षक दिलेस,आरती धार्मिकतेचा तुला कंटाळा आहे म्हणून तू बायको ला पुढे केलेस,no प्रॉब्लम कारण ज्याला जे जमतंय ,आवडतं घरात त्याने ते करावे या लॉजिक ची मी सुद्धा आहे पण तू त्याला समानतेचा मुलामा दिलास, म्हणून मग पूर्ण पूजा बायको करवी करवून तू तिचा नैवेद्य किंवा इतर अवघड भार कमी केला असतास तर कौतुक वाटले असते,पण माझंच बरोबर असं वाटून प्रतिवाद करत बसतो,धागे काढत बसतोस, मी सुद्धा कोकणात शेतीची कामे बायका बरोबरीने करतात हे पाहिलं आहे पण लिंका,आकडेवारी माझ्याकडे नाही
,माझ्या नवऱ्याला सुद्धा आवड नाही धार्मिक बाबतीत,नवरात्र मध्ये सोसायटी आरतीत सुद्धा मी एकटी ताट वगैरे घेते आरतीचे,तो माझ्या मागे थाम्बतो पण त्याचा हिच ती समानता म्हणून बाऊ करता येईल असं आम्हाला वाटत नाही

He are the prettiest girl in the world plays abadhubi hum Dil de chuke Sanam title track

पण मी कधी ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले.
>> My friend (Indian, male) had knitted a scarf along with me. We used to knit in travel, on weekends etc.
My colleague in usa (kannad) had stitching as his passion.
Haven't u read about aurangajeb in school?

We played aabadhubi in school days. All games. Cricket, gotya, dabba aisapais, lokahnd panee, vishamrut, pakadapakadi, cycle, badminton, lagor.

Luckily in our childhood we didn't have any Runmesh telling us what we are not capable of doing, so we did everything a child does. Your poor daughter, she will grow up thinking ki baba ne swaipak karayacha Nasato, Aai la puja karayala milali mhanaje vadilanni tila sanman dilated, its not her right etc.

Please grow up Runmesh! We also need to grow up and stop responding to nonsense. (Noted this as point for myself).

त्यांना ऐश ची एन्ट्री वाला ट्रॅक म्हणायचेय.
(एवढा मोठा भारी पडदे वाला बंगला असून आकाश कंदील घ्यायला वाळवंटातून चालत का जावं लागतं काय माहित.
शिवाय घरात इतके दिवे आणि आरसे वाले पडदे आणि मंडप टाईप पडदे आहेत की वेगळ्या विकतच्या दिवाळी डेकोरेशन ची गरजच काय? Happy )

मायबोलीकर कॅन नॉट स्टॉप कन्व्हिंसिंग ऋन्मेष की त्याची पाठ जमीनीला टेकून तो चारी मुंड्या चीत झालाय
आणि ऋन्मेष कॅन नॉट स्टॉप सेयिंग (पडलो तरी) माझं नाक वर आहे.

अरे ती काय दिसते. हो हा अ‍ॅश चा इंट्रो सीन आहे. आबा धुबी का डब्बा ऐसपैस का दोन्ही एकच माहीत नाही. ती राज नंदिनी आहे. तो कंदिल प्लस तो ड्रेस ती खुदच दिवाळी आहे. घरकी रोशनी.

आपण किती मोठेपणा करतोय दाखवण्यासाठी "बस झाल्या गप्पा आता करून दाखवायचे"अशा type चे शीर्षक दिलेस,आरती धार्मिकतेचा तुला कंटाळा आहे म्हणून तू बायको ला पुढे केलेस,
>>>>

हो मला कंटाळा आहे म्हणूनच धार्मिक बाबींमध्येही समानता यायला हवी. उगाच आरतीसाठी पुरुषांना वेठीस धरू नये हेच त्यातून सांगायचे होते.

पण यातून सुटका हवी तर स्वयंपाक तुलाच करावा लागेल. ऑर्डर करता येणार नाही. दुसरया बाईला सांगता येणार नाही. त्याबदल्यास स्वयंपाकच करावा लागेल. नसेल जमत तर बस्स मुकाट्याने पूजेला.

अन्याय नव्हता का हा पुरुषांवरचा?
आवाज उठवला तर चुकले काय?

कि स्त्री पुरुष समानता हि फक्त स्त्रियांच्या वाटेचीच असमानता दूर करण्यापुरते जपायची? पुरुषांना या असमानतेमुळे काही त्रास सहन करवा लागत असेल तर करू द्यावे... असे आहे का?

धन्यवाद म्हाळसा
खरे आहे
हे खेळ मुलांना आवडत नाहीत
ईतक्या लहान वयात सामाजिक दबाव वगैरे संकल्पना त्यांच्या डोक्यात शिरत नसतील. कदाचित खेळांबाबतच्या या आवडी उपजत असाव्यात.

Pages