गर्ल्स कॅन नॉट प्ले बास्केटबॉल !
जेव्हा पहिल्यांदा हे ऐकले तेव्हा हसायला आले. कारण मुलींशी अशीच चिडवाचिडवी खेळायचे वय ते. त्यात शाहरूख आपला बालपणीपासूनचा क्रश. तो जे बोलेल तो आपला डायलॉग, आणि मग याची मालिकाच सुरू झाली. गर्ल कॅन नॉट प्ले फूटबॉल, गर्लस कॅन नॉट प्ले क्रिकेट, गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी.. लंगडी… खोखो. पत्ते, गोट्या. आबादुबी, वगैरे वगैरे काहीही शब्द घालून उगाच मुलींना चिडवणे सुरू झाले…. वयच होते ते तसे करण्याचे..
पण गर्लस कॅन प्ले विषअमृत ! आणि गर्लस कॅन प्ले लपाछुपी!
हे विष-अमृत आणि लपाछुपी हे खेळ आमच्या ईथे भयंकर हिट. कारण हेच दोन खेळ होते जे मुलेमुली एकत्र खेळायचे.
तर ते एक असो,
शारीरीक क्षमतेचा विचार करता ओवरऑल कित्येक मैदानी खेळात मुलांपेक्षा मुली मागे असतात असे म्हणू शकतो.
पण मला वाटते शारीरीक क्षमता हे एकच कारण नसते. कारण बॅडमिंटन वा टेनिस हे देखील कमालीचे दमछाक करणारे खेळ मुलींना आवडीने खेळताना पाहिले आहे. किंबहुना बॅडमिंटन तर आमच्याकडे मुलीच जास्त खेळायच्या.
पण त्याचवेळी कॉलेजला असताना डिपार्टमेंटची मुलींची क्रिकेट टिम बनवायला आम्हाला किती कष्ट पडायचे त्या गोड आठवणी आजही ताज्या आहेत. अकराची टीम, त्यातल्या सहाजणी चटकन मिळून जायच्या उरलेल्या पाच मुली त्या आधीच्या सहा मुलींसाठी हातापाया पडून गोळा कराव्या लागायच्या. फूटबॉलची टीम तर कधीच बनली नाही.
कारण मुळातच या काही खेळांची मुलींना तितकीशी आवड नसणे
जी आवड मुलांमध्ये उपजत असते.
अन्यथा या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट खेळो न खेळो पण बघणारे करोडो आहेत, आणि त्यावर तावातावाने चर्चा करणारेही लाखो आहेत. पण मुलींमध्ये हे प्रमाण फारच नगण्य. आणि ते देखील मुलामुलींचा एकत्र ग्रूप असेल तरच. अन्यथा निव्वळ मुलींच्या ग्रूपमध्ये मी कधी क्रिकेटची चर्चा ऐकलीच नाही. (आता प्लीज तू कुठे ऐकायला गेलेलास विचारू नका, ईंजिनीअरींगची सात वर्षे माझी अश्याच ग्रूपच्या आजूबाजूला घुटमळण्यात गेली) नाही म्हटल्यास तो राहुल द्रविड काय क्यूट दिसतो हे कानावर पडायचे, पण त्याला मी क्रिकेटची चर्चा मानत नाही.
आजही ऑफिसातील महिला बघतो. मुलींच्या आवडी, गप्पा, छंद, त्यांचे बोलण्याचे, गॉसिपिंग करायचे विषय मुलांपेक्षा वेगळेच असतात, त्यांना नटायची, छान दिसायची, शॉपिंग करायची आवड उपजतच असते. ते आपले विणकाम शिवणकाम वगैरे गोष्टी जमवायचे झाल्यास स्त्री पुरुष दोघेही करू शकत असले तरी एखाद्या पुरुषापेक्षा एखादी स्त्रीच लोकरीचे झबले वगैरे विणताना दिसण्याची शक्यता जास्त असते. या आवडी असतात, हे छंद असतात, या गोष्टी काही स्त्री पुरुष असमानतेने लादलेल्या नसतात.
मुलांच्या आवडीनिवडीबाबतही अशीच एक लिस्ट बनवता येईल.
तर हाच आपला धाग्याचा विषय आहे.
जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात ज्या पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांच्यावर लादलेल्या नाहीत तर ती लिस्ट ईथे बनवा.
तर ज्यांना असे काही नसते हे वाटते, त्यांनी ईथली लिस्ट खोडून दाखवा
जे छंद दोघांत कॉमन असतात, असू शकतात, उदाहरणार्थ गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, पुस्तक वाचणे वगैरे तर त्यांना या धाग्यापासून दूर ठेवा.
जर पाणीपुरीवर पुरुषांपेक्षा महिला जास्त तुटून पडतात असे निरीक्षण असेल तर जरूर नोंदवा
धागा स्त्री पुरुष दोघांसाठी समसमान खुला आहे
स्त्री पुरुष यांच्या आवडी
स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात ज्या पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांच्यावर लादलेल्या नाहीत तर ती लिस्ट ईथे बनवा. >> शाहरूख खान.
स्त्रियांना आजिबात आवडत नाही पण काही पुरुषांना आवडतो असे ऐकून आहे.
स्वप्नील जोशी
स्त्रियांना आजिबात आवडत नाही पण काही पुरुषांना आवडतो असे ऐकून आहे.
सई ताम्हणकर
स्त्रियांना आजिबात आवडत नाही पण काही पुरुषांना आवडते असे ऐकून आहे.
आणि मायबोलीवर कोणाला शाहरूख, स्वप्नील, सई आवडत असतील तर ती आवड ईथल्याच एका पुरूषाने त्यांच्यावर लादलेली आहे असे ऐकून आहे.
या धाग्यावर कोणीच प्रतिसाद
या धाग्यावर कोणीच प्रतिसाद नाही दिला अगदी +१ वगैरे पण नाही तर धागाकर्त्याला वाइट वाटेल का? याचे उत्तर द्यायला पण प्रतिसादाची गरज नाहिये.
गर्ल्स कॅन नॉट प्ले
गर्ल्स कॅन नॉट प्ले बास्केटबॉल >>> ???
कुछ कुछ होता है मधे राहुलला अंजलीच हरवते ना?
एरिआप्रमाणे बदलते.
एरिआप्रमाणे बदलते.
पण मला वाटते शारीरीक क्षमता
पण मला वाटते शारीरीक क्षमता हे एकच कारण नसते. कारण बॅडमिंटन वा टेनिस हे देखील कमालीचे दमछाक करणारे खेळ मुलींना आवडीने खेळताना पाहिले आहे
>>
कालचाच अनुभव.. सोसायटीत बॅडमिंटन कोर्ट दोन दिवसांपूर्वीच ओपन झाले..काल मी रॅकेट्स घेऊन खेळायला गेले..कोर्टच्या एका बाजूला दोन पुरूष व दुसऱ्या बाजूला माझी मैत्रिण उभी होती म्हणजे एक जागा रिकामी होती.. मी तीच्या बाजूला जाऊन खेळायला उभे राहीले तर लगेचच दुसऱ्या बाजूचा पुरूष म्हणाला “ये साईड आजाओ.नही तो दोनो हार जाओगे” ..त्याला वाटलं मुली म्हणजे टुकूरटुकूरच खेळणार.. पण त्यांना स्मॅश आणि ड्राॅप्स टाकून २१-१० अशा स्कोअरने हरवलं. खरं तर बॅडमिंटनदेखील मुलींना खेळता येत नाही असे समजणारे बरेच आहेत.
<<<बॉईज कॅन नॉट डू गॉसिपिंग>>
<<<बॉईज कॅन नॉट डू गॉसिपिंग>>>
अशक्य हसले, याबाबतीत तर मला वाटते बायका उगाच बदनाम आहेत
कुछ कुछ होता है मधे राहुलला
कुछ कुछ होता है मधे राहुलला अंजलीच हरवते ना? Wink
>>>>
पिक्चरमध्ये असे दाखवले याचाच अर्थ हे दुर्मिळ चित्र आहे
बाकी शारीरीक क्षमतेची वा स्किल सेटची तुलना नाही करायचीय ईथे..
तर मुळात मुलांची आवड काय आणि मुलींची आवड काय यात भेद असतो का हा धाग्याचा विषय आहे.
काही लोकांना हे मान्य नाही. जे मला पटत नाही.
केक चॉकलेट्स फ्लॉवर कलरफुल ड्रेसेस यांची आवड जशी मी मुलींमध्ये बघितली आहे तशी मुलांमध्ये प्रकर्षाने आढळत नाही.
मुलामुलींच्या जीन्स नुसार त्यांचे आवड आणि छंद यात फरक असतो असे मला वाटते.
खरं तर बॅडमिंटनदेखील मुलींना
खरं तर बॅडमिंटनदेखील मुलींना खेळता येत नाही असे समजणारे बरेच आहेत.
>>>>
आमच्याकडे तर हा मुलींचाच खेळ समजला जायचा. रात्र झाली की नेट लाऊन मुले वॉलीबॉल खेळायची तर मुली त्याच नेटचा वापर करून बॅडमिम्टन खेळायची. यावरून नेहमी लफडे व्हायचे. मग वेळ वाटून घेतला जायचा. त्यात काही मुले मुलींमध्ये बेडमिंटनही खेळायला जायची. ज्यांना आम्ही शिव्या घालायचो
गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी..
गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी.. लंगडी… खोखो. पत्ते, गोट्या. आबादुबी, वगैरे वगैरे काहीही शब्द घालून उगाच मुलींना चिडवणे सुरू झाले…. वयच होते ते तसे करण्याचे..
पण गर्लस कॅन प्ले विषअमृत ! आणि गर्लस कॅन प्ले लपाछुपी!
हे विष-अमृत आणि लपाछुपी हे खेळ आमच्या ईथे भयंकर हिट. कारण हेच दोन खेळ होते जे मुलेमुली एकत्र खेळायचे >> हे काहीही.. वर दिलेल्या खेळाच्या यादीपैकी फक्त कबड्डी एकत्र खेळण्यात प्रॅाब्लेम होता.. इतर खेळ इंक्लुडींग कलर कलर, कांदाफोडी, साखळी, कॅरम आम्ही मुलं मुली एकत्रच खेळायचो
अशक्य हसले, याबाबतीत तर मला
अशक्य हसले, याबाबतीत तर मला वाटते बायका उगाच बदनाम आहेत
Submitted by VB on 5 November, 2020 - 10:37
>>>>>>
बदनाम असे काही नाही. पण पुरुषांची गॉसिपिंगही वेगळी असते. मी लंचला एकटा सात आठ बायकांमध्ये असतो त्यामुळे गप्पा ऐकाव्या लागतात. प्रत्येक जणी आपल्या घरगुती गॉसिप वगैरे करत असतात. प्रत्येकीला प्रत्येकीच्या घरची छोटीमोठी सारी गोष्ट माहीत असते, घरातल्या सर्व सदस्यांची नावेही माहीत असतात..
पण तेच मी जेवण झाल्यावर फेरफटका मारायला पुरुषांच्या ग्रूपमधून जातो तर आमच्याकडे कधी घरगुती गप्पा गॉसिप होतच नाहीत. ते तर मी आहे म्हणून कधीतरी पोरांचा विषय निघतो, अन्यथा त्यांच्याब्द्दलही क्वचित बोलणे होते.
सो, सांगायचा मुद्दा असा की स्त्री पुरुषांचे आवडीनुसार गप्पांचे विषय देखील वेगळे असतात. काही लोकांना हे मान्य नाही. याला शास्त्रीय आधार मागत आहेत. तो कसा देऊ हे लक्षात न आल्याने हा धागा काढला. ईतकेच.
इतर खेळ इंक्लुडींग कलर कलर,
इतर खेळ इंक्लुडींग कलर कलर, कांदाफोडी, साखळी, कॅरम आम्ही मुलं मुली एकत्रच खेळायचो Happy
नवीन Submitted by म्हाळसा on 5 November, 2020 - 14:24
>>>>>>
ती मी अशीच नावे लिहिली.. कलर, साखळी,कॅरम, हाऊजी वगैरे खेळ आमच्याकडेही एकत्र व्हायचे.
कांदाफोडी, आबादुबी, कबड्डी वगैरे खेळ आमच्याकडे मुली खेळायच्याच नाही. गोट्या, भवरे, पतंग उडवणे यापासूनही दूर राहायच्या. आवडच नव्हती त्यांना..
mansplaning .................
mansplaning (the explanation of something by a man, typically to a woman, in a manner regarded as condescending or patronizing.) ................. फक्त पुरुषच करु शकतात गं बाई
शारीरीक क्षमतेचा विचार करता
शारीरीक क्षमतेचा विचार करता ओवरऑल कित्येक मैदानी खेळात मुलांपेक्षा मुली मागे असतात असे म्हणू शकतो. >>
मुंबईमध्ये राहतोस ना? मुंबई मॅरॉथॉन मध्ये मुलांच्या आधी फिनिश करणार्या हजारो मुली बघितल्या नाहीत का कधी?
इतक्या आत्मविश्वासपूर्वक
इतक्या आत्मविश्वासपूर्वक चूकीचे धागे फक्त पुरुष व तेही महापुरुषच काढू शकतात
मुंबईमध्ये राहतोस ना? मुंबई
मुंबईमध्ये राहतोस ना? मुंबई मॅरॉथॉन मध्ये मुलांच्या आधी फिनिश करणार्या हजारो मुली बघितल्या नाहीत का कधी?
>>>>
डेटा बघायला आवडेल
इतक्या आत्मविश्वासपूर्वक
इतक्या आत्मविश्वासपूर्वक चूकीचे धागे फक्त पुरुष व तेही महापुरुषच काढू शकतात Wink
>>>>>
सामो मी कर्क राशीचा आहे
आमच्यात बायकांचे गुणधर्म जास्त असतात
आवडी निवडी समान असू शकतातच की
आवडी निवडी समान असू शकतातच की. जेंडर चा काही संबंध नाही. प्रत्येक ठिकाणी जेंडर घुसवणे हे फक्त सोशल कंडीशनींग झालं मग.
सामो मी कर्क राशीचा आहे>>>>> ते तर मी पण आहे . आणि मला मॅन ली गोष्टी च जास्त आवडतात. ,,Hence proved ki it's not gender biased
आणि मला मॅन ली गोष्टी च जास्त
आणि मला मॅन ली गोष्टी च जास्त आवडतात.
>>>>
चला म्हणजे मॅनली वूमनली गोष्टी असतात...
आता त्या कोणत्या हे देखील लिस्ट बनवूया
शारीरीक क्षमतेचा विचार करता
शारीरीक क्षमतेचा विचार करता ओवरऑल कित्येक मैदानी खेळात मुलांपेक्षा मुली मागे असतात असे म्हणू शकतो. >>
सहमत... वर्ल्ड रेकॉर्ड बघितल्यास हे दिसून येते...
काही बौद्धिक खेळात देखील मुली मागे आहेत.. चेस वगैरे...
1.मुलींना फुटबॉल, टेनिस,
1.मुलींना फुटबॉल, टेनिस, क्रिकेट खेळता येत नाही!
2.गाडी चालवता येत नाही!
3.मुली mechanical and civil engineering झेपणार नाही!
4. So called हाणामारी करता येत नाही!
5. थोबाडीत देता येत नाही!
6. स्त्री रिक्षा चालक असू शकत नाही!
अजून येऊ द्या यादी..
हे सगळे अठराव्या शतकातील पालुपद आहेत. काही काही लोकांना स्त्री किंवा पुरुष, यांना अजून पर्यंत ही पालूपदे योग्य वाटत जोपर्यंत कोणी prove करत नाही.
काही काहींचा इगो हर्ट होतो, आणि जर त्यांना या गोष्टी जमत नसतील समोरील स्त्री व्यक्ती लीलया हाताळत असेल तर... आगयाया त्यांचं तो जिना हराम हो जाता हैं

थोडी मानसिक ताकत वाढवा, अपचन प्रतिबंधक प्रतिकार शक्ती वर्धक काढा, योगा, प्राणायम करा..
अजून एक समोरील स्त्री तुमच्या पेक्षा जास्त पैसे कमवत असेल तर... जळफळाट, त्रागा...
शारीरीक क्षमतेच्या पलीकडे
शारीरीक क्षमतेच्या पलीकडे विचार करा लोकहो
आमच्या कॉलेजमध्ये मी सदानकदा जिममध्येच पडीक असायचो. कारण कॅरमची आवड. दहा कॅरम होते, म्हणजे एकाच वेळी ४० लोकं खेळू शकायचे. जे बोर्ड हरतील ते उठतील या तत्वावर क्लेम चालायचे. तरी ईतके क्लेम लागायचे की पाच सहा नंबर पुढे असायचेच.
या सर्वात मुलींसाठी राखीव असलेल्या दोन कॅरमवर खेळायला मुलीच नसायच्या. मग आम्ही आयड्या करायचो. मैत्रीणींना घेऊन यायचो आणि त्या कॅरमवर बसायचो, मिक्स जोडी चालायची.
अर्थात मुलींच्या आणि मुलांच्या खेळातही बरीच तफात होती. आणि कॅरम आवडीतही बरीच तफावत होती.
असे का?
कॅरमला शारीरीक वा बौद्धिक बळ लागत नाही.
नाजूक बोटांचा खेळ तो. तरीही यामध्ये मुलांचा उत्साह आणि मुलींचा निरुत्साह असे चित्र का?
गर्ल्स कॅन नॉट प्ले कॅरम असे म्हणू शकतो का?
कोणाला काही ऑब्जे क्शन नसेल तर शीर्षकात घेतो हे. पण हे असे का याचे शास्त्रीय कारण जरूर शोधा
हे माझ्यासह सर्व स्त्री पुरुष समानता वादी लोकांना चॅलेंज आहे !!!!!!!!!!!!
पत्त्यांमध्ये त्यातील गेम्स
पत्त्यांमध्ये त्यातील गेम्स खेळण्याच्या आवडी निवडीत सुद्धा प्रचण्ड प्रमाणात स्त्री पुरुष असमानता आहेच नं ! जसे की रम्मी, ३ पत्ती म्हटले की पुरुष..
ह्याचाच अर्थ निव्वळ बौद्धिक आणि शारीरिक निकष सोबत सामजिक रूढ़ि हाही निकष येथे लागू पडेल.
बॉयज कॅन नॉट डू शिवणकाम>>>>>>
बॉयज कॅन नॉट डू शिवणकाम>>>>>>>
काय पण... मी तर शाळेत असल्यापासून आत्तापर्यंत जेन्ट्स टेलरकडूनच ड्रेसेस शिवून घेते..
बरोबर मुद्दा म्हाळसा
कित्येक लेडीज टेलर्स मधील मास्टर टेलर तर बुहुतांशी पुरुषच असतो.
गर्ल्स कॅन नॉट प्ले कॅरम असे
गर्ल्स कॅन नॉट प्ले कॅरम असे म्हणू शकतो का?>> नाही म्हणू शकत असं.
आमच्या घरी तर बायकाच पत्ते आणि कॅरम पुरूषांपेक्षा जास्त खेळतात आणि चांगल्या खेळतात..
पूर्वी चेन्नई ते कोइंबतूर असा ८ तास ट्रेनचा प्रवास मी नाॅनस्टाॅप रम्मी खेळून कापला आहे. माझी आई उत्तम कॅरम खेळते.. तीच्या ॲाफिसमधे कॅरमच्या स्पर्धा व्यायच्या तेव्हा तीने दोनदा पारीतोषिकही मिळवलंय.
आपण पत्त्यांना कैची कोण चांगली मारतं ह्याची स्पर्धा लावायची का?
जे काम मोठ्या प्रमाणावर करावे
जे काम मोठ्या प्रमाणावर करावे लागते, उदा. शिलाई काम किंवा हॉटेल्स आणि जेवणावळी इथले स्वयंपाक, तिथे मुख्य आचारी अथवा शिंपी पुरूष असतात. त्यांच्या हाताखाली महिला काम करतात. मात्र फॅशन डिझाईनिंग मध्ये महिलांचा सहभाग बराच वाढला आहे.
व्हॉट अबाऊट मेण अँड वुमेन?
व्हॉट अबाऊट मेण अँड वुमेन?
पूर्वी चेन्नई ते कोइंबतूर असा
पूर्वी चेन्नई ते कोइंबतूर असा ८ तास ट्रेनचा प्रवास मी नाॅनस्टाॅप रम्मी खेळून कापला आहे
>>>
पण तुम्ही आम्हा पुरुषांसारखे पैसे लाऊन रमी खेळता का?
माझी आई उत्तम कॅरम खेळते..
माझी आई उत्तम कॅरम खेळते.. तीच्या ॲाफिसमधे कॅरमच्या स्पर्धा व्यायच्या तेव्हा तीने दोनदा पारीतोषिकही मिळवलंय.
>>>>
अभिनंदन.. मी सुद्धा याच खेळात काही पारीतोषिके जिंकली आहेत. यावर तर एक धागा निघायला हवा...
असो,
तुमच्या आई ..माझ्या आई.. त्यांचा मान ठेऊन शीर्षक बदलतो
परत ?????
परत ?????
Pages